रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

लोकल डायरी -- २९

   http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post.html लोकल डायरी --२६
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_13.html लोकल डायरी -२७    
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_20.html लोकल डायरी -२८           
लोकल डायरी -२९        
 आज सकाळी  मी रस्त्यात होतो तेव्हा माझा फोन वाजला .
" अरे कुठे आहेस तू ? लवकर ये "
" हो ... हो... आलोच ... लोकल आली का प्लॅटफॉर्मवर  ? "
" हो आत्ताच आली  ... लवकर ये ...."
" शून्य मिंटात आलो ..." म्हणून मी फोन कट केला  आणि  धावतच रेल्वेचा ब्रिज चढु लागलो . लोकल नुकतीच प्लॅटफॉर्मवर लागली होती . जवळ जवळ सर्वच डब्यांमधुन लोकांनी आपापल्या पद्धतीने सजावट करायला सुरुवात केली होती . आमची अंबरनाथ लोकल सरासरी  दहा मिनिटे प्लॅटफॉर्मवर थांबते . त्यामुळे ह्या दहा मिनिटांत आम्हाला सगळी सजावट उरकायची होती .  गाडी सुटल्यावर पुजा  होणार होती . लोकलमधला हा दसरा खरंच काही औरच असतो . सर्व सणांहुन वेगळा साजरा होतो आणि तोही अगदी उत्साहात !   मी धावत आमच्या डब्यापाशी गेलो . शरद - भरत झेंडूच्या फुलांच्या माळा खिडक्यांना आणि दरवाज्याला लावत होते . सावंत आणि भडकमकर डब्याच्या आत झिरमिळया आणि पताका लावत होते .
" अरे काय यार मध्या , ये लवकर मदतीला .... " भरत म्हणाला .
“ सॉरी … सॉरी … ” म्हणत मी लगेच जाऊन माझी बॅग ठेवली आणि  त्यांना मदत करायला लागलो . माझ्या हातात काम देऊन शरद कुठेतरी निघुन गेला . मी फुलांच्या माळा लोकलच्या  खिडक्यांना गुंडाळू लागलो . आत जिग्नेस देवीचा फोटो खिड़कीच्या वरच्या मोकळ्या जागेत चिकटवत होता . नायर अंकल त्याला मदत करत होते . डोअरवरचा रवीच्या ग्रुपनेही त्यांच्या जागेत सजावट केली होती . डोअरला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले होते . आमची लोकल सोन्याचे दागिने घातल्यासारखी सजली होती .  सर्व डब्यात उत्साहाचं वातावरण होतं . जो तो एकमेकांना ' हॅप्पी दसरा ' करत होता . आमची तयारी होते न होते तोच प्लॅटफॉर्मवर ढोल आणि ताशांचा आवाज यायला लागला . सगळे बाहेर बघु लागले तर शरद  ढोल ताशा घेऊन आला होता ... थेट प्लॅटफॉर्मवर !  तो कधी काय करील काही सांगता येत नाही  ... त्याने आम्हा सगळ्यांना बाहेर बोलावले . त्या ढोल ताशाचा ठेका असा होता की कधी आमची पावले थिरकायला लागली कळलेच नाही . मग रवीचा ग्रुप आणि  बाकीचे ग्रुपही आमच्यात सामील झाले . लेडीज कंपार्टमेंटमधल्या बायका सुधा बाहेर येऊन बघु लागल्या . मग काय आमच्या लोकांना चेवच चढला. वरातीत नाचल्याप्रमाणे सगळे नाचायला लागले . मी सहज बघितलं , अँटी व्हायरस सुद्धा  कौतुकाने आमच्याकडे बघत होती . एकदा माझ्याकडे बघुन 'मस्त' अशी हाताने हलकीशी  खुण पण केली . मला प्लॅटफॉर्मवरचा पत्रा ठेंगणा वाटायला लागला . पाच मिनिटे आमचे नाचकाम चालू होते . अचानक लोकलने हॉर्न दिला . सगळ्यांची गाडीत चढायची घाई झाली . लोकल हलली आणि सगळे गोंधळ करत चढु लागले . गाडीत चढता चढता शरदने ढोलवाल्याला २०० रु. दिले आणि तो आत आला . सगळे त्याच्या ह्या सरप्राईजवर खुश झाले . नाचुन नाचुन सगळे दमले होते पण धमाल आली .
" शरद यार ... एक नंबर ... फुल्ल धमाल ... " डोअरवरचा रवी म्हणाला .
" सही शरदभाय ... मजा आ गया ... " जिग्नेसही  खुश दिसत होता .
" आयला चांगलं सरप्राईज दिलस यार ... मस्त ... "
" जाम भारी ..." सगळे जण त्याचे कौतुक करत होते .
" चला , आता आपण पूजा करुन घेऊ ..." सावंत म्हणाले . मग खिड़कीवरच्या देवीला आम्ही हार घालून देवीची आरती सुरु  केली . जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ... आरती सुरु झाली आणि मी सहज पलीकडे पाहिलं . सर्व बायका आरतीमधे सामील झालेल्या होत्या . अँटीव्हायरस सुद्धा आरती गात  हलक्याश्या टाळ्या वाजवत होती . एक वेगळाच माहोल तयार झाला .  सगळं वातावरण प्रसन्न झालं . आरती म्हणता म्हणता सारखं माझं लक्ष तिच्याकडेच जात होतं . ती मला मिळावी अशी आशा मनात धरुन होतो.  अम्बे तुजवाचुन कोण पुरविल आशा ....
आरती झाली . नंतर प्रसाद वाटपही झाले . थोडा प्रसाद आम्ही पलीकडे लेडीज डब्यातही दिला . देवीची आरती आणि पूजा पार पडली आणि सगळे जण एकमेकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ लागले . शरदच्या ढोल ताशांनी  बहार आणली . भडकमकरांनी खुष होऊन  तर आपली बसायची जागाही त्याला दिली ... विंडो ! हा तर खुपच मोठा बहुमान होता . सगळ्यांनी त्याला विंडोत बळजबरीने बसवलं . आम्ही त्याचं कौतुक करत असतानाच माझा मोबाईलचा मेसेजटोन वाजला .
Mast majaa aali ... baaki tu mast nachatos …   अँटी व्हायरसचा व्हॉट्सऍप मेसेज आला . चेहऱ्यावर नकळत एक हास्याची लेकर उमटली . मी पलीकडे तिच्याकडे  बघितलं . ती मिश्किल नजरेने माझ्याकडेच  पहात होती .
                                                Thanks  :)   मी औपचारिक आभार मानले .
He asa dar varshi karta ka ?
                                                 Ho .... pan hya varshi amchya groupchya sharad ne dhol aanla hota  mhanun jast maja aali .
Gr8.    :)  ती आज चांगल्या मूड मधे दिसत होती . तिने केशरी रंगाचा टॉप आणि जीन्स घातली होती . मस्त दिसत होती . तिला विचारावे का ? तिच्या लग्नाबद्दल ? एक विचार मनात आला . आता तसे बरेच दिवस उलटून गेलेत . त्या दोघांचा काहीतरी निर्णय झाला असेलच ! ती इतकी खुश दिसतेय म्हणजे नक्कीच ते दोघे लग्न करणार असतील . आपण कशाला मधे पडा ? तिने स्वतःहुन विषय काढला तर ठीक ... असा विचार करुन मी मोबाईल बंद केला आणि पुन्हा आमच्या ग्रुपच्या दंगामस्तीत सामील झालो .
" आयला , ही ढोल ताशाची आयडिया कशी काय सुचली रे ? " सावंत विचारत होते .
" तुम्हाला बोल्लो ना परवा ... एक सरप्राईज आहे म्हणून ... ते हे ! "
" धमाल आली ... पण सगळ्यात भारी भडकमकर नाचत होते ... " मी म्हणालो .
" हो ... खरंच भारी आहेत ते ... नाचताना त्यांचा पाय माझ्या पायावर पडलाय तो अजुन दुखतोय ...." भरत म्हणाला . आणि आम्ही सगळे हसलो .
" नायर अंकल पण कड़क नाचले ..."
" हो ना ... मी तर पहिल्यांदा त्यांना नाचताना बघितलं "
" मध्याचा  फेवरेट नागिण डान्स  मस्तच ! "
" सावंत मात्र नाचले नाहीत ... फोटो काढण्याच्या निमित्ताने  लांबच रहात होते . "
" हो ... बरोबर आहे ... तरी मी दोन- तीन वेळा त्यांना खेचून आणलं नाचायला ... पण थोडंसं नाचल्यासारखं करुन परत त्यांची फोटोग्राफी सुरु करायचे .
" अरे बाबा , मला नाही नाचता येत ... काय करु ? "
" आणि आम्ही काय  भरतनाट्यम शिकलोय काय ? आम्हाला तरी कुठे नाचता येतंय ... ? चार उड्या  मारायच्या ! पतंग खेचायची …. नायतर मध्यासारखी नागीण काढायची …. झाला डान्स ! काय त्यात एवढं ? ”
" ये जिग्नेस तो नाचते नाचते गाड़ी के निचे जाने वाला ता ... मैंने कैसा तो संबाला उसको "
" आधी फ़क्त आपला ग्रुप होता , पण नंतर रवी आणि बाकीचे पण नाचायला आले ... फुल्ल टू धमाल आली ..."
" आणखी थोड़ा वेळ लोकल थांबायला पाहिजे होती ... " वगैरे वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला यायला लागल्या . हे सण आणि उत्सव माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचे असतात ह्याची जाणीव झाली . थोडा वेळ का होईना पण  माणसांना  आपापली दुःखे  विसरायला  मदत होते . मनाला  एक विरंगुळा मिळतो . जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते .   नाहीतर जिग्नेस त्याचे दुखः विसरून , आज इतका आनंदी होऊन नाचला नसता  आणि  नायर अंकल त्यांच्या भावांच्या भांडणाच्या  विचारांतून बाहेर पडले नसते . दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात ह्याचा नवीन प्रत्यय आला ... सुखाने दुःखावर विजय मिळवला होता .

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा