मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

लोकल डायरी -- २८

http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post.html लोकल डायरी --२६
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_13.html       लोकल डायरी --२७                                                 
" ए ,  चला,  चला .... २०० - २००  रुपये काढा .... "  आम्ही सगळे आमच्या बसायच्या जागेवर स्थानापन्न होण्याच्या आधीच शरद- भरत म्हणाले . भरतच्या हातात एक छोटी डायरी होती .  ते दोघे केबलच्या  वसुलीला आलेल्या पोरांसारखे वाटत होते .
" कसले रे ? " सावंतांनी विचारलं .
" काय सावंत ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती . विसरलात काय ? " भरत विचारता झाला .
" अरे हो .... आलं लक्षात ... काय करु बाबा ... वय झालं आता..." असं गमतीने म्हणत सावंतांनी खिशात हात घातला ,  आणि १००   च्या २  नोटा काढून दिल्या .  त्यांचं बघुन  नायर अंकलनी सुद्धा पैसे दिले .
" सगळ्यांना मागताय ... तुम्ही दिलेत का रे ? "  भडकमकर उवाच .
" बास काय .... आपण नाय देणार तर कोण देणार आधी ... हे बघा आमच्या दोघांची नावं आहेत पहिली … " पुराव्यासकट भरतने त्याच्या हातातली छोटी डायरी दाखवली .
" बरं बाबा ... घ्या " म्हणत भडकमकरांनी खिसा रिकामा केला . मीही न बोलता  २००  रु काढून दिले . जिग्नेसकडे मागावेत की नाही ह्या विचारात असताना त्यानेच २००   काढून दिले . सगळ्यांचे पैसे  गोळा झाले .
" ओके , आता कसं काय नियोजन करायचं ? " शरदने विचारलं .
" नियोजनाचं काय ?  आपण नेहमी करतो तेच ... " मी म्हणालो .
" ओके ,  आपला डबा सजवायला  त्या पताका ,  झिरमिळ्या,   पेढे , नारळ , अगरबत्ती ... आणि मुख्य म्हणजे देवीचा फोटो . " भरतने नेहमीप्रमाणे यादी वाचून दाखवली .
" आणखी एक सरप्राईज असणार आहे ह्या दसऱ्याला .... !  ते त्या वेळेस समजेल … " शरद हे असलं काहीतरी बोलून उत्सुकता ताणत बसतो . तो आता लगेच काही सांगणार नाही हे माहीत असूनही   सगळ्यांनी मग , " कसलं सरप्राईज ... काय ? " वगैरे विचारुन औपचारिकता पूर्ण केली . आमच्या ग्रुपमधे तिघे जण अशा बाबतीत जास्तच उत्साही आहेत . पण  सध्या जिग्नेसची परिस्थिति लक्षात घेता  सगळी  जबाबदारी शरद - भरत या दोघा  खंद्या वीरांनी  आपल्या खांद्यावर घेतली होती . आमचं काम फक्त पैसे ढीले करणं एवढंच होतं , आणि ते आता झालं .
            अँटी व्हायरस  नेहमी प्रमाणे समोर पलिकडच्या डब्यात उभी होती . मी माझी बसायची जागा  सावंतांना दिली आणि उभा राहिलो . माझ्यात कर्णाचा अवतार कुठून शिरला ह्याचं आश्चर्य व्यक्त करत सावंत मी दिलेल्या जागेवर बसले . अँटी व्हायरसकड़े पाहिलं ,  तिचं लक्ष तिच्या मोबाईलमधे होतं . चेहऱ्यावरुन तर काहीच अंदाज येईना . ती मोबाईल पाहण्यात गढुन गेली होती . कानाला इअर फोन लागलेले होते .  अचानक मला आठवलं की  मधल्या काही भेटींमधे मी तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतला होता . तिला मेसेज करावा का ? ह्या विचारानेच एकदम हुशारल्यासारखं झालं . तिच्याकडे स्मार्ट फोन असल्याचं दिसत होतं म्हणजे व्हॉट्स ऍप असावं . मी लगेच माझा फोन काढला आणि कॉन्टेक्टस् मधे जाऊन तिचा नंबर शोधला . तोही अँटी व्हायरसच्या नावाने सेव केलेला असल्याने लगेच सापडला . मी व्हॉट्स ऍप वर  सर्च केल तर  तिच्याकडेही व्हॉट्स ऍप असल्याचं दिसलं . गुप्त  खजिन्याचा शोध लागावा तसा मला आनंद झाला . इतके दिवस आपल्या हे लक्षात कसं आलं नाही ह्याचंच मला आश्चर्य वाटू लागलं . तिचा डी.पी.  सुधा  मस्त होता . सुंदरच दिसत होती त्यात !  कोणत्या तरी समुद्रकिनारी काढलेला सेल्फ़ी डी. पी. म्हणून लावला होता .  तिला मेसेज करावा का ? असा विचार करता करताच hi असा मेसेज टाईप करुन गेलाही .... व्हॉट्स ऍप वर एक बरोबरची खुण उमटली . म्हणजे माझ्याकडून तर मेसेज गेला होता . आता मी दोन बरोबरच्या खुणा होण्याची वाट बघु लागलो . त्या काही लवकर होईनात . कदाचित तिला रेंज नसावी . मी दर दोन सेकंदानंतर फोन चेक करत होतो . पण एकाच्या दोन खुणा होईनात . लहान मुलं जशी झाड़ लावल्यावर ते रोज किती वाढलं हे बघतात तसं माझं झालं .
" काय रे मध्या ? कुणाचा फोन येणार आहे का ? "  शरदने  माझ्याकडे बघत  विचारलं .  
" नाही रे ... असंच ...."
" नेहमी कधी इतका फोन चेक करत नाहीस म्हणून विचारलं . " शरद खोचकपणे विचारत होता . मला कळलं ते , पण दाखवलं नाही . पुन्हा तसाच फोनकडे बघत राहिलो . मी पाठवलेल्या मेसेज वर दोन बरोबरच्या खुणा मला काही दिसेनात .  यांत्रिकपणे नजर पलीकडे लेडीज डब्याकडे वळली . मोबाईल तिच्या हातात होता पण नजर बाहेर कुठेतरी होती . ह्या फेसबुक आणि व्हॉट्स ऍप च्या मेसेजेसचे नोटिफिकेशन अविरत चालू असतात . दर सेकंदाला कुठल्या न कुठल्या ग्रुपवरुन मेसेज , जोक्स , फोटोज येतच असतात . त्यातले बरेचसे पुन्हा पुन्हा येतात त्यामुळे वैताग येतो आणि मग नकळतपणे बरेचसे मेसेज वाचलेही जात नाहीत . पण तिने माझा मेसेज वाचावा असं मला मनापासून वाटत होतं . पण ती कानाला इयरफोन लावून गाणी ऐकत असावी . म्हणजे आता एखादं गाणं संपेपर्यंत ती काही मोबाईल बघायची नाही .
" अंकल आप मेरे एंगेजमेंट को क्यूँ नहीं आये ? " शरद नायर अंकलना विचारत होता .
" आई ऍम वेरी सॉरी ...  मेरेको जरा दूसरा काम ता .. . तोडा फॅमिली प्रॉब्लम चालू है ... " नायर अंकलचा प्रॉब्लेम मला माहित होता . ते त्यांच्या भावांबद्दल जास्त विचार करत होते . आजकाल असा विचार कोण करतं ? शरदची मॅगीशी एंगेजमेंट मागच्या आठवड्यात  झाली . आम्ही सगळे हजर होतो . आमची उपस्थिती  गरजेचीच होती . कारण हे सर्व आमच्यामुळेच तर झालेलं होतं !  शरद - भरत मोबाईलमधले  एंगेजमेंटचे फोटो बघत बसले .  सावंतांनी पेपरच्या चार घड्या करुन पुस्तकासारखा पेपर वाचायला घेतला . खिड़कीतून येणाऱ्या वाऱ्याचा परिणाम भड़कमकारांवर झालेला होता . त्यांच्याबरोबर नायर अंकलही समाधीच्या तयारीला लागले . मी सगळ्यांवर नजर फिरवुन पुन्हा फोनकडे पाहिलं . व्हॉट्स ऍप मधे मेसेजवर दोन बरोबरच्या खुणा झालेल्या होत्या . चला , म्हणजे तिच्या मोबाईल मधे माझा hi  पोहोचला होता तर ! पण ती अजूनही फोन बघेना . गाणी ऐकत ती लोकलच्या  दरवाज्याबाहेर बघत उभी होती . ' ओह , कम ऑन , मोबाईल बघ ...' मी मनातल्या मनात म्हणालो . आणि लगेच तिने मोबाईलमधे पाहिलं . टेलीपथी की काय तरी असं असतं म्हणतात . त्याचा आज अनुभव आला . तिने आलेले नोटिफिकेशन पाहिले . माझा hi तिने बघितला असावा ,  दोन भुवयांच्यामधे चिमुकलं  प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य ह्यांची मिसळ झालेली क्षणभरच दिसली . लगेच तिने आमच्या डब्याकडे कटाक्ष टाकला . नजर मला शोधत होती . मला  तिच्या ह्या हालचालींचं निरिक्षण करण्यात गंमत वाटत होती . अखेर तिने मला शोधलं . आणि तिने उत्तरादाखल  फोनमधे hi  करून   हसरा स्माईली टाकला . मीही प्रतिसाद दिला .
Kashi aahaes ?
                                                         Mast . Ani tu ?
Mi pan .
पूर्वी लोक एस एम एस चा पॅक वापरून चॅटिंग करायचे . पण आता व्हॉट्स ऍपने आणखी चांगली सोय करुन दिली . पण आता काय बोलावे ( लिहावे ) हा प्रश्न पडला . पण जास्त वेळ गेला नाही
" train la navhatis ka 2-3divas ?
                                                                  Ho... mi punyalaa gele hote .
Kkkkk
Mi waat pahili tujhi .   ( हे लिहिल्यावर आपण ज़रा जास्तच  पुढचं  लिहिलं असं वाटलं )
Mhanje train la aali nahis mhanun kalaji watali   ( लगेच कारणमीमांसा करुन टाकली )
                                                                    Oh ..... really ?
Yes    :)  :)  :)
Punyala kon aahe ?
I mean sahaj geli hotis ki office  chya kamasathi ?
                                                            Aniket chya aailaa bhetayala gele hote .
Ohh ...       
Mhanje lagna zalyavar tu punekar honaar tar ... ! ( हे लिहिताना  मला फार कष्ट पडले )
पण हे  वाचल्यावर तिने काहीच रिप्लाय दिला नाही . मी तिच्याकडे पाहिलं . ती औपचारिक हसली . तिच्या चेहऱ्यावरुन तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता . मीही पुढे जास्त काही लिहिलं नाही . मोबाईल खिशात ठेवणार इतक्यात -
" आँखों ही आँखों में इशारा हो गया ....बैठे बैठे जीने का सहारा हो गया .... " शरद - भरत माझ्याकडे बघुन गाणं म्हणायला लागले . ह्याचा अर्थ त्या दोघांना माझ्यावर संशय आलेला असावा. संशय कसला खात्रीच असावी . कारण भरत माझ्याकडे मिश्किलपणे बघुन गालातल्या गालात हसत होता . त्याला अँटी व्हायरसबद्दल आधीही माहीत होतं ,  आणि त्याने शरदलाही हे सांगितलं असावं असं त्या दोघांच्या वागण्यातुन  दिसत होतं . आता काहीही लपवाछपवी करायची नाही असं मी ठरवलं .
" काय रे ?    काय झालं ? "  
" काही नाही ... असंच गाणी म्हणतोय ... तुला काय प्रॉब्लम आहे का ? " शरद चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला .
" नाही ... मला कशाला काय प्रॉब्लम असेल ... " मी पुन्हा अँटी व्हायरसकड़े पाहिलं . ती बाहेर बघत होती .
" तू तिला सरळ विचारुन का नाही टाकत ? " अचानक शरद म्हणाला .
" काय  ? काय विचारायचं  मी ? "
"  हे बघ जास्त शहाणपणा करु नकोस ... मला सगळं माहीत आहे ... जे मनात असेल ते विचार ना .... "
" ते तितकं  सोप्पं नाही रे बाबा ... तिचं लग्न ठरलंय ... "
" ठरलंय ना ... अजुन झालं तर नाही ना ...? मग काय प्रॉब्लम आहे ? "   शरद पक्का फिल्मी आहे ,  आणि तो असलेच काहीतरी सल्ले देणार हे मला माहीत होतं .
" नाय रे बाबा ... ती वेगळी मुलगी आहे ... सध्या थोड़ीफार मैत्री आहे , ती पण तुटायची ...."
" अरे काय नाय होत ... माझं ऐक ,  हे असं लटकत बसण्यापेक्षा विचारुन मोकळा हो …  आपले मोहोबतें मधले शारुखगुरुजी काय सांगतात ?  ”  शरद कीर्तनकारच्या सुरात म्हणाला .
“ काय सांगतात महाराज ? ”  भरतनेही त्याच्या सुरात सूर मिसळला .
 त्याने लगेच आडवे हात पसरून शाहरुखचं बेअरिंग घेतलं  ,  “ अगर तुम किसीको चाहते हो तो जाओ  …. जाओ  ,  जाकर उसे बोल दो कि तुम उसे  प्यार करते हो  …. ये मत सोचो कि वो हां  बोलेगी या ना …. बस बोल दो …. क्या समझे मधु बाबू ?  बघ ,  नायतर आयुष्यभर मित्रच रहाशील ..." शरद बोल्ला ते पूर्ण नाही पण थोडंसं मनाला पटण्यासारखं होतं . मॅगीच्या बाबतीत त्याने जे केलं ते मला माहितच होतं . पण त्याच्या एवढी डेरिंग आपल्यात नाही हेही पटत होतं . पुन्हा अँटी व्हायरसकड़े पाहिलं . काय करु ? च्यायला ,   काही कळत नाही ....
   
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा