मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

लोकल डायरी २७

                                                                      
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post.html लोकल डायरी --२६
 
  लोकल डायरी २७
" मधु .... अरे मधु .... हॅलो ... मधु ...."  मागून कोणीतरी हाक मारत होतं . मी मागे वळून पाहिलं तर मागून अँटी व्हायरस धावत येत होती . ती जवळ आली आणि धापा टाकू लागली . थोडा दम खाल्ल्यानंतर म्हणाली , " अरे तुला किती हाका मारल्या ? लक्ष कुठे आहे तुझं ...? "
" सॉरी,  मी  ज़रा वेगळ्या विचारात होतो ... बोल ना काय झालं ? "
" मधु ... मला तुला काहीतरी सांगायचं आहे . "
" हा ,  बोल ना ...."
" आपण इतके दिवस भेटतोय ... पण मला आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली .... " ती सरळ  माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. मला एकदम हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं .
" कसली गोष्ट ? " कसेबसे शब्द माझ्या तोंडुन निघाले. घशाला कोरड पडल्यासारखं वाटू लागलं .
" तुझ्या-माझ्या बाबतीतली  गोष्ट  ...."
" काय ... बोल ना ..." माझा सगळा जीव कानात गोळा झाला .
" मला ....  मला तू आवडायला लागलायस ..." तिने नजर खाली करत हे वाक्य उच्चारलं ,  आणि मी काय ऐकतोय ह्यावर माझा विश्वासच बसेना ...
" काय ? परत बोल .... परत बोल ..."
" मला तू आवडतोस ...."
" ओ माय गॉड ... खरंच ... म्हणजे तू ... म्हणजे आपण .... म्हणजे तुला ... मी ... खरंच ....  " मला काय बोलवं आणि काय करावं  तेच सुचेना  आणि मी त्या  आनंदात जोरात ओरडलो .... तिने मला मिठीच मारली . मग मीही तिच्या मिठीत विसावलो . विरघळून गेलो , चहात साखर विरघळते तशी !  थोड़ा वेळ तसाच गेला , सहज  पलीकडे पाहिलं तर समोर तिचा होणारा नवरा अनिकेत उभा होता ... आमच्याकडे रागाने पहात ...!  तो झपाझप पावलं टाकित आमच्या जवळ आला  आणि माझ्या हाताला धरुन ओढू लागला . मला कळेना,  हा अँटी व्हायरसला सोडून मला का ओढतोय ...? त्यानंतर  अचानक काय झालं कुणास ठाऊक ,  अनिकेत बाईच्या आवाजात बोलायला लागला , " अरे काय चाल्लय तुझं ? किती मोठ्याने ओरडतोयस ? उठ .... जागा हो ..." अनिकेतच्या जागी मला आता माझ्या आईचा चेहरा दिसू लागला ...  हे असं काय होतंय ? " अरे ए मध्या .... जागा झालास का नीट ? " मी डोळे किलकिले करुन पाहिलं तर समोर खरंच आई हातात झाड़ू घेऊन उभी होती . मी सरळ पाहिलं ... समोर सीलिंग फॅन फिरत होता . थोड्या वेळासाठी मला कळेना की मी नक्की कुठे आहे .
" ओह ... शीट ... कशाला मला उठवलंस ? "  मी आईवरच डाफरलो.
" उठवू नको तर काय करु ? ओरड़त होतास कसला ! आणि घड्याळात बघा ज़रा ... आज ऑफिसला जायचं नाही का ? " मी  बघितलं तर ७.३० झाले होते . धडपडत उठलो... आणि तयारीला लागलो .
स्टेशनच्या रोडवर जातानाही माझ्या डोक्यात त्याच स्वप्नाचा विचार चालु होता . काय मस्त वाटत होतं म्हणून सांगू  ! स्वप्नात का होईना पण अँटी व्हायरसने मी तिला आवडतो असं सांगितलं होतं . पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात असं म्हणतात , पण हे स्वप्न तर मला सकाळी पडलं होतं . आईने झोपेतून उठवलं तेव्हा साडे सात झालेले मी पाहिले . म्हणजे मग हे स्वप्न पहाटे पडलं नाही ? मग आता  काय होईल ? हे स्वप्न खरं होईल की नाही ?  थोडं फार इकडे तिकडे चालतं ... पहाटे आणि सकाळ मधे वेळेचं जास्त अंतर कुठे आहे ?  म्हणजे हे स्वप्न खरं व्ह्यायला काही हरकत नाही ... मी उगाचच  माझ्या मनाची समजूत घालत रस्त्याने चाललो होतो . गेले ३-४  दिवस ती गाडीला आली नव्हती . काय झालं असेल कुणास ठाऊक ? मागे भेटली तेव्हा ती द्विधा मनस्थितित होती .  तिच्या  होणाऱ्या नवऱ्यासोबत तिचे काही मतभेद झाले होते . त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी वेळ घेतला . अँटी व्हायरस तर म्हणाली की तिचा १५  दिवसांचा प्रोबेशन पिरियड चालू आहे ... पुढच्या काही दिवसांनी तिचा होणारा नवरा जर्मनीहुन येईल . तेव्हा ते दोघे काय निर्णय घेतील ? अँटी व्हायरस सगळं विसरुन पुन्हा त्याच्याशी लग्न करायला तयार झाली तर ? छे ... !  विचारही नको वाटतोय . मी स्टेशनला  पोहोचलो तेव्हा गाडी प्लॅटफॉर्मला आधीच लागली होती . डोअरवरच्या रवीच्या ग्रुपने दरवाज्यातच आपापले मोर्चे बांधले होते .
" काय मध्या भाई ... ? उशीर झाला काय ? " रवीने विचारलं .
" हो रे ... थोडासा ... " म्हणत मी आत शिरलो . आमचे सर्व जण हजर होते , जिग्नेस सकट ! आज तो नेहमीप्रमाणे डाऊन करुन आला होता . म्हणजे साहेबांची गाडी हळू हळू रुळावर येत होती .पण त्याचा नेहमीचा खेळकर स्वभाव मात्र राहिला नव्हता . त्याची नेहमी इज्जत काढणारा  शरदसुधा त्याच्याशी इज्जतीत वागत होता . मी सगळ्यांना नमस्कार,  चमत्कार ... हाय हॅलो केलं , माझी बॅग वर रॅक वर टाकली आणि सीट्सच्या मधे जाऊन उभा राहिलो .
" आज उशीर कसा काय झाला रे तुला ? " सावंतांनी विचारलं .
" मस्त झोप लागली होती ... उशिरा उठलो ..." माझ्या उत्तरावर सावंत मिशितल्या मिशीत हसले आणि त्यांनी पेपर मधे डोकं घातलं . नायर अंकलना आज काय झालं कुणास ठाऊक ? ,  बसलेले होते ते उभे राहिले आणि भरतला त्यांच्या जागेवर बसवलं  . तो नको नको म्हणत असतानाही त्यांनी त्याला बळेच बसवलं आणि माझ्यासोबत मधल्या जागेत उभे राहिले . नायर अंकल असे उभे राहिलेले पाहून आमच्या ग्रुपचा जो तो त्यांना आपली जागा त्यांना बसायला द्यायला लागला . म्हातारा माणूस उभा राहणार आणि आपण तरुण असूनही बसणं योग्य नाही असाच प्रत्येकाने विचार केला असणार . पण त्यांनी कुणाचं ऐकलं नाही . ते सगळ्यांना समजावत तसेच उभे राहिले . मलाही त्यांचं हे वागणं ज़रा विचित्रच वाटलं .
" क्यूँ अंकल ... क्या हुआ ... ? "  मी हळूच त्यांना विचारलं .
" कुच नहीं ... ऐसेही ... तुम लोग हररोज मेरे लिए जगा पकड़ता है ... आज सोचा खड़े रेहके जाके देखते है ...। " ते म्हणाले आणि लोकलने  निघतानाचा झटका दिला . त्या सरशी नायर अंकल थोड़े हलले ... तोल जाऊ नये  म्हणून त्यांनी माझा खांदा पकडला . गाडी निघाली . ' पुढील स्टेशन उल्हासनगर .... कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर  लक्ष असू दया ... अगला स्टेशन उल्हासनगर ... कृपया गाडीसे उतरते समय गाड़ीके पायदान और प्लॅटफॉर्म के बीच के  अंतर पर ध्यान दे ... प्लीज माइंड दी गॅप बिटवीन फुटबोर्ड अँड प्लेटफार्म व्हाइल अलायटिंग फ्रॉम दी ट्रेन .... ' ही नविनच सूचना स्पीकर  मधून ऐकायला यायला लागली . सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना त्याची गंमत वाटली . पण ती बाई तर प्रत्येक स्टेशनच्या अगोदर आधी मराठीत , मग हिंदीत आणि मग इंग्रजीत तीच तीच सूचना देऊन डोकं उठवायला लागली . सकाळी सकाळी पेंगणाऱ्या लोकांची  शांतताच ह्या स्पिकरवाल्या बाईने  हिरावुन घेतली . त्यात आमचे भडकमकर सुधा होते ... " च्यायला ,  ही काय नविन डोकेदुखी ...? " त्यांची झोपमोड झाल्याने ते वैतागले होते . तिच्या तीनही भाषेतील सूचना संपतात न संपतात तोच पुढचं स्टेशन येत होतं .  कल्याणला जाईपर्यंत त्या सूचना देणाऱ्या बाईने ताप दिला अक्षरशः !   भडकमकर तर उठून तो स्पीकर फोडायला निघाले . सगळ्यांनी आवरलं आणि समजावलं तेव्हा कुठे शांत झाले . ते तसेच चरफडत विंडोला डोकं टेकुन डोळे मिटून बसले . नेहमी  लोकलने  अंबरनाथ प्लॅटफॉर्म सोडायच्या आत त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते , पण आज काही केल्या त्यांना झोप येईना . लोकलने डोंबिवली सोडली तेव्हा कुठे ती बाई जरा वेळ शांत बसली . आता ठाण्यापर्यंत चिंता नाही .  मी पलीकडे पाहिलं . अँटी व्हायरस समोर उभी होती . आज तिने कानात इअरफोन लावले नव्हते . बराच वेळ ती दरवाज्यातून बाहेर बघत उभी होती . काय विचार करत असेल ? मूड काही ठीक दिसत नाही .
" मधु , तुमारे कितने बाई है ? " नायर अंकलच्या साऊथ  टोन  मिश्रित प्रश्नाने माझी विचारांची साखळी तुटली .
" आं .... नहीं अंकल मुझे भाई नहीं ... सिर्फ एक बेहेन है ।" मी म्हणालो .
" हं.... अच्छा है .... बाई नहीं है तो ...." त्यांच्या बोलण्यात निराशेची थोड़ी झाक असल्यासारखं वाटलं .
" क्यूँ अंकल ? क्या हुआ ? "
" कुच नय ... ऐसेही बोला ... तुमको बाई नै है तो टेंशन नय है ..."
" क्या हुआ अंकल ... आपके भाईसे आपका कुछ झगड़ा हुआ क्या ? "
" नहीं .... वो होता तो अच्चा होता शायद .... " ते असं का म्हणाले मला काहीच कळलं नाही .
" मतलब ? "
" अरे,  अब क्या बताने का ? घर घर तो यही कहानी है ...."
" अगर पर्सनल है तो नहीं बताया तो भी चलेगा ... "  ही एक प्रकारची युक्ति आहे जी भरतने मला शिकवली होती . समोरच्या माणसाबद्दल किंवा त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही तर तो आपणहुन त्याच्याबद्दलची माहिती देतो .पण नायर अंकलना खरं तर काहीतरी सांगायचं होतं . पण कसं सांगायचं हे कळत नव्हतं .
" अरे नहीं , इतना बी पर्सनल नई ... वो क्या है ना , मेरे दो बाई है , चोटे भाई ... गांव में रेहते है ... मदुरै ... पिचले साल मेरा पिताजी एक्सपायर्ड  हो गया ... तब तक तो सब टिक ता ... लेकिन पिताजी के बाद सब बिगड़ गया ... "
" बिगड़ गया मतलब ? "
". मेरे जो दो बाई है उनका एक दूसरेसे झगड़ा हो गया.  एकदम सिम्पल रीझन ता ... हमारा जॉइंट फॅमिली टूट गया . इतने दिन तक संभालके रखा हुआ मेरा फॅमिली टूट गया ... मुजे इतना दुख हुआ ये वो दोनों नहीं जानते .   अब वो दोनों एक दूसरे से बात नई करते .  हर बाई आके उसका साईड कैसा राईट  है वो मुजे बताता है ... लेकिन मेरे बारें में कोई सोचता नहीं । मुजे  कैसा लगता होगा इसकी किसीको कुच पडी नहीं   ..."
" भाई भाई के झगड़े तो हमेशाके ही है अंकल ... महाभारत के जमाने से ... " मी माझ्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला .
" ह्म्म्म... तुम बराबर बोलता है । ये बात मुजे मालूम है ... लेकिन ये सब बातें मेरे बी घर में होंगी ये मैंने कबी सोचा नई ता ...  मेरे दोनों बाई मेरी बहुत इज्जत करते है ... लेकिन अब वो एकदूसरे के दुश्मन जैसे हो गये है .. मुजे समज नहीं आ रहा की क्या करुँ ?
" कुछ मत करीये अंकल ... आप उन्हें कितना भी समझायेंगे तो भी वो नहीं सुनेंगे ...  उन्हें उनके हाल पर छोड़ दीजिये ... जब थोडा टाईम जायेगा तब उन्हें शायद अपने आप समझ आएगा ... "  दुसऱ्याला सूचना देणं किती सोप्प असतं . मी असं म्हणालो आणि नायर अंकल त्यांच्या विचारात गढुन गेले .  ते त्यांच्या भावांचाच विचार करत असावेत असं त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होतं . खरं तर किती विचित्र गोष्ट आहे ना ? ज्याच्याबरोबर आपण लहानपणापासून असतो . जो नेहमी आपल्या जवळ असतो . ज्याला आपल्या बऱ्याचशा गोष्टी माहित असतात आणि त्याच्या आपल्याला ,  अशा भावांमधे मोठे झाल्यावर असं काय विपरीत घडतं की ज्याने ते एकमेकांपासून दुरावतात ? सगळ्याच घरात असं होतं असं नाही पण बहुतांशी घरांमधे हीच परिस्थिति आहे .  लहानपणी  ज्याच्याबरोबर आनंदाने  गोळ्या बिस्किटे वाटून खाल्ली  त्याच्याशीच मोठं झाल्यावर  भांडून घराची वाटणी कशी काय मागितली जाते ?   भावाभावांची भांडणं , भाउबंदकी  हा  एक रोग आहे ... संसर्गजन्य रोग ... ! कधी कधी आपल्याला हा शेजारच्या घरात दिसतो , कधी मित्रमैत्रिणींच्या , पण    ह्याचा संसर्ग आपल्या घराला कधी होतो ह्याचा आपल्यालाही पत्ता लागत नाही . मग दुसरं काही दिसत नाही ... सख्खा भाऊ वैरी होतो .... आणि घरं तुटतात ....

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा