गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

लोकल डायरी -- २६


 http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५

" काय मग भरतराव ? कसा झाला कार्यक्रम ? " मी त्याला कोपराने ढोसलत विचारलं . त्यावर तो पुरुषसुलभ लाजला .
" काय लाजतोय ... काय लाजतोय .... अरे सांग की , आवडली की नाही मुलगी ? " शरदने खेकसत  विचारलं . त्यावर त्याने नुसती हो म्हणून मान हलवली . आ ssss ...... करत सगळ्यांनी गोंगाट केला .
" मला सांग तू काय प्रश्न विचारलेस ? " मी उत्सुकतेत त्याला विचारलं .
"  अरे , आमच्या लांबच्या नात्यातली होती ती . त्यामुळे आमच्या दोन्ही बाजूचे  नातेवाईकच जास्त बोलत होते . मला आणि तिला वेगळं असं काही बोलता नाही आलं . " भरत म्हणाला .
" ओह शीट ... म्हणजे तू काहीच बोलेला नाहीस ? "  माझा हिरमोड झाला .
" तू का रे एव्हढा फ्रस्टेट होतोयस ? तुझी पण प्लॅनिंग चाल्लीय काय ? " शरद माझ्यावर घसरला .
" मग काय ? आयला ,  माझ्यावर पण ही वेळ येईलच की कधीतरी . त्यामुळे मग भरतचा अनुभव कामाला येईल ना ... " मी टाळीसाठी हात पुढे केला भरतने मला टाळी दिली .
" हो ... हो ... बरोबर आहे ... सांग रे बाबा भरत त्याला ... मार्गदर्शन कर बिचाऱ्याला ..." सावंत म्हणाले .
" तुला सांगतो , हे मुलगी बघायला जाणं म्हणजे भयानक गोष्ट असते बाबा ... आमच्या घरातले चार पाच लोक , तिच्या घरातले सात आठ लोक , शिवाय ज्यांनी मध्यस्थी केलेली असते असे तीन चार लोक तुमच्या आजुबाजुला असतात.  इतकी सगळी माणसं समोर असल्यावर बिचारी ती मुलगी बावरुन जाते रे ... आणि वर म्हणतात विचारा तुम्हाला एकमेकांना काय विचारायचंय ते … ! आयला ,  आता एवढ्या लोकांसमोर काय घंटा विचारणार ? " त्यावर आम्ही सगळे हसलो .
" मग काय काय बोलणी झाली ? " सावंतांनी विचारलं .
" काय तेच नेहमीचं .... नाव काय ? शिक्षण ? जॉबला कुठे आहे ? भावी बायकोकडून अपेक्षा ... , भावी नवऱ्याकडून अपेक्षा ... कांदेपोहे ... चहा .... " भरतने थोडक्यात उत्तरे दिली .
" मग मुलीने .... आय मीन आमच्या वहिनींनी तुला काय विचारलं ?" शरदने विचारलं .
" अरे कसलं काय ! मघाशी  बोल्लो ना की १० - १५  माणसांसमोर ती मला काय विचारणार ? तिने काहीच विचारलं नाही . आम्ही फक्त एकदा एकमेकांकडे पाहिलं .... बास ...! "
" म्हणजे लव ऍट फर्स्ट साईट ....! "
" सही आहे ... बरोबर ...." आमच्या ग्रुपच्या सगळ्यांनी अनुमोदन दिलं .
आणखी ही बरंच काही विचारणार होतो पण तेवढ्यात उल्हासनगर आलं आणि जिग्नेस आत आला . आम्हाला सगळ्यांना त्याला असं उल्हासनगरला चढलेलं पाहुन आश्चर्य वाटलं . तो नेहमी डाउन करुन येतो . अंबरनाथला लोकल आली तेव्हा तो डब्यात दिसला नाही तेव्हा तो आज येणार नाही असंच सर्वजण गृहीत धरुन चालले होते  . पण आज तो उल्हासनगरला चढला होता . वर्गात ऑफ पिरियडला गोंधळ चालू असताना अचानक  मुख्याध्यापक वर्गावर आले की वर्ग जसा चिडिचुप होतो तसं आमचं झालं . आम्ही सगळे त्याच्याकडे बघु लागलो .
" अरे भाय लोग ... ऐसे क्या देख रहेहो ....? " तो हसत हसत आम्हाला सगळ्यांना विचारत होता . पण त्यात  काहीतरी  कमी असल्याचं आमच्या प्रत्येकाला जाणवलं . जिग्नेसची शारीरिक आणि मानसिक स्थितीही नेहमीसारखी वाटली नाही . त्याच्या बाबतीत गोष्टच अशी घडली होती की त्याची नुसती कल्पनाही सहन होणे शक्य नाही  . आणि ती गोष्ट त्याच्यामुळेच आम्हाला सगळ्यांना कळाली होती . त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नसत्या तर आम्हाला हे कळलंही नसतं . नाही म्हणायला शरद - भरत ह्या दोघांना त्याची कल्पना होती . पण त्यांनी ही बातमी सगळ्यांपासून मुद्दामच  गुप्त ठेवली होती .
" अरे , आ ना यार बैठ ..." म्हणत शरद ने त्याला आपली बसायची जागा दिली .
" अरे नै शरदभाय ... तुम बैठो ना ... कोई प्रॉब्लेम नै ...." पण त्याचं ऐकेल तो शरद कसला ? त्याने बळेच त्याला  आपल्या जागेवर बसवलं . थोडा वेळ शांततेत गेला . ही शांततेची कोंडी कशी फोडावी ह्या विचारात सगळे जण असतानाच सावंत म्हणाले . , " जिग्नेस  , यार तू आज डाऊन करके नहीं आया ? लेट हो गया क्या ? "  त्यावर तो खिन्नपणे हसला आणि म्हणाला ,"  लेट तो वैसे भी हो गया है ..."  तो असं म्हणाला आणि पुन्हा आमच्या ग्रुप मधे शांतता पसरली . ह्या अशा अवघड प्रसंगी काय बोलवं हेच समजत नाही .
" तो .... जिग्नेस  ... अब कैसा लग रहा है ? तुमारा तबियत टिक है ना ? " नायर अंकलनी विचारलं .
" ठीक ही है .... " पुन्हा शांतता . जिग्नेस तुटक उत्तरे देत होता . आणि ते साहजिकच होतं . थोडा वेळ तसाच गेला आणि जिग्नेस अचानकपणे म्हणाला , " मुझे आप सबसे थोड़ी प्रायवेट बात करनी है । अपने बारे में ....। "
" बोल ना यार ... क्या बात है ? " शरद म्हणाला . आम्ही सर्वजण तो आता काय सांगणार ह्याकडे  पाहू  लागलो  . तो नेहमीचा त्याचा खेळकर स्वभाव जाऊन एका पोक्त माणसासारखा वाटू लागला . अचानक त्याला काय झालं कळालं नाही , तो रडायलाच लागला . तो असं काही करेल ह्याची कुणालाच कल्पना नव्हती .
" अरे यार जिग्नेस ... क्या हुआ ... ? " सावंतांनी विचारलं .
" अपना ग्रुप छोड़के मेरा और दूसरे कोई दोस्त नहीं ... इसीलिए आप सबको मैं अपना मानता हूँ ...। "
" अरे यार ... जिग्नेस रो मत यार ... क्या हुआ ? " मी विचारलं .
" ये चार पांच दिन मैंने कैसे गुजारे है सिर्फ मुझेही पता है ...।" तो त्याचे डोळे पुसत म्हणाला . आम्ही कुणीही काही बोललो नाही ... त्याला त्याचं दुःख हलकं करायचं होतं . दुःख हे साचलेल्या डबक्यासारखं असतं ... ते जितकं मनात राहील तितकं आणखी ख़राब होत जातं . त्याला वाट करुन देणं खुप महत्वाचं असतं , आणि आमच्याशिवाय तो हे कुणाला सांगु शकत होता ...? आमच्या ग्रुपमधे जीवघेणी शांतता पसरली . त्याने एकदा खिड़कीबाहेर पाहिलं . समोर कल्याणची विस्तीर्ण खाड़ी पसरलेली होती . खाडीचा एक विशिष्ठ वास नाकात शिरला .  लोकल संथ वेगात पुढे जात होती . जिग्नेस मनातल्या मनात वाक्ये जुळवत असावा असं मला वाटलं . आम्हाला त्याच्याबद्दल माहीत होतं तरीही आम्ही तसं त्याला भासु दिलं नाही ... शेवटी निर्धार केल्यासारखा तो बोलायला तयार झाला .
" कैसा होता है ना की , अपन किसीको बहुत प्यार करते है ... लेकिन उसको इस बात की कदर नहीं तो उसमें अपना क्या फॉल्ट ?  इतने दिन मैं अंधेरे में था ... मेरी बीबी किसी  और से प्यार करती है । उसने शादी तो मुझसे की लेकिन वो अभी तक उसके पुराने यार को छुप छुप के मिलती है । " तो इतक्या स्पष्टपणे बोलेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती . आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो . " शायद  मेरे प्यार में ही  कुछ कमी रह गयी ...." त्याने नैराश्येने हे वाक्य उच्चारलं . पुन्हा भयाण शांतता ... कुणीतरी त्याला सांत्वनपर बोलणं गरजेचं वाटलं मला . पण काही प्रसंग , काही घटना अशा असतात की त्यांना कसं सामोरं जावं हेच कळत नाही .
" देख यार जिग्नेस कैसा होता है की ...." सावंत प्रस्तावनेला सुरुवात करणार इतक्यात  त्याने डोळे मिटून  थांबा अशी खुण केली . सावंत यांत्रिकपणे बोलायचे थांबले . आजुबाजुला इतका गोंगाट होता तरीही आमच्या  ग्रुपमधे तणाव पूर्ण शांतता पसरली . आणि आता ह्या शांततेची भिती वाटू लागली . पण  शेवटी जिग्नेसनेच बोलायला सुरुवात केली ....," मुझे पता है .... और मैंने वो एक्सेप्ट भी कर लिया है ....    ये तीन चार दिनमें  हॉस्पिटल मैं पड़े पड़े मैंने बहुत सोचा … मैंने वो नींद की गोलिया खाकर  कुछ अच्छा नहीं किया . उसका एहसास मुझे बाद में  हुआ . लेकिन अब हुआ सो हुआ ...  फिर मैंने ये डिसाईड किया की  अब में अपने लिए जिऊंगा ।  किसीने कुछ गलती किया , किसीने बाहर जा के कुछ किया इस्से मुझे अब कोई मतलब नहीं ... मैं अब सब भूलके नयी शुरुवात करना चाहता हूँ ... और मुझे किसीकी हमदर्दी नहीं चाहिए .... ऐसी हमदर्दी और ज्यादा  दर्द देती है । " जिग्नेस जे बोलला त्याने आमचा अख्खा  ग्रुप हलून गेला अक्षरशः  !  काय बोलणार आता ? सहानुभूतीचे चार शब्दही त्याला नको होते . आणि ते बरोबरच होतं . एखाद्या माणसाच्या बाबतीत काही वाईट घडलं तर लोक त्याला सहानुभूती दाखवायला येतात . त्याच्याबाबतीत  कसं वाईट झालं ह्याची नकळतपणे त्याला पुन्हा पुन्हा आठवण करुन देतात . आणि त्यामुळे माणूस त्या कटु आठवणीत आणखी गुरफटला जातो . नको असलेल्या गोष्टी पुन्हा आठवयला लागतात . मग आपण कसे वागलो ?, समोरचा कसा वागला ?, गोष्टी कशा बिघडत गेल्या ? , ह्याची चित्रफित पुन्हा डोळ्यांसमोरुन जाते . कधी कधी काही गोष्टी आपल्या अपरोक्ष घडत होत्या आणि आपल्याला त्याची साधी कल्पनासुद्धा कशी  आली नाही  ? ह्याचा विचार मनात येऊन उद्विग्न व्हायला होतं . फसवले गेल्याची भावना फार बोचरी असते . त्यामधे समोरच्याची हुशारी आणि आपला मूर्खपणा आपला आपणच मान्य केल्यामुळे  जास्त वेदना होतात . आणि त्यातून सावरायला जास्त वेळ लागतो . जिग्नेसच्या बाबतीतही असंच काहिसं झालेलं असावं .
" जिग्नेस यार , तूने जो बोला वो सही है ... ! लेकिन अब क्या कर सकते है ? " शरद सांत्वनपर बोलला .
" इसीलिए तो मै कुछ नहीं कर रहा ।" जिग्नेसच्या ह्या वाक्याचा काय अर्थ घ्यावा अशा विचारात आम्ही पडलो .
"  तूने भाभी से बात की क्या ? " शरदने विचारलं .
" नहीं ... मैंने किसीसे कुछ बात नहीं की ... " त्याला त्याच्या बायकोचं नाव सुद्धा निषिद्ध असावं असं तुसडेपणाने तो म्हणाला .
" तो अब आगे क्या ? " शरदने विचारलं .
" आगे क्या .....  मैंने अभी कुछ सोचा नहीं ... अगर उसे डिवोस चाहिए तो मैं देने के लिए तयार हूँ ... ”
"अरे यार तू इतना आगे का क्यूँ सोच रहा है ? "
" तो फिर क्या सोचूं शरदभाय  ? तुम ही बताओ ... अगर मेरी जगह तुम होते तो क्या करते ? " जिग्नेसने ह्या प्रश्नाचं ब्रम्हास्त्र काढून सगळयांच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच दिल . सगळे शांत झाले ...
" देको जिग्नेस .... हर एक घटना के दो साईड होती है... एक साईड तुमको मालूम है ... लेकिन दूसरी साईड बी जानने की कोशिश करो ... शायद तुमे कुच अलग बातें समझ आ जाय ...." नायर अंकल म्हणाले .
" अंकल , अगर उसे मुझसे शादी नहीं करनी थी तो बोल देती ... लेकिन ये सब करने की क्या जरुरत ? अंकल अभी में क्या फिल कर रहा हूँ उसका अंदाजा नहीं आपको ... " म्हणत तो पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागला . मला जिग्नेसचं लग्न झालं , त्यावेळचा जिग्नेस आठवला . तो खुप खुश होता . हनीमूनचे फोटो दाखवताना लाजणारा जिग्नेस …,  आज वाळलेल्या पाचोळयासारखा दिसत होता .  दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये ... एखादा प्रसंग किंवा घटना माणसाचं सगळं आयुष्याच बदलून टाकते . त्यातून बाहेर यायला बराच वेळ लागतो ... परंतु वेळ हे सर्व रोगांवरचं औषध आहे ... आज ना उद्या जिग्नेस स्वतःला सावरेलही .... पण त्याच्या मनातून ही फसवले गेल्याची भावना काही जाणार नाही हे मात्र निश्चित !   गाडी पारसिकच्या बोगद्यात शिरली . बाहेर सर्वत्र काळोख ...! लगेच लोकलमधले दिवे लागले . खरं तर ही क्रिया नेहमीच घडते ... पण आज मला ती वेगळया रीतीने जाणवली . बाहेर जरी काळोख पडला तरी  आतले दिवे लागले की  सगळं व्यवस्थित दिसू शकतं ... आपल्या आयुष्याच्या बाबतीत असं व्हायला काय हरकत आहे … ? आतल्या उजेडात गोष्टी तिच्या खऱ्या  रुपात दिसतात . तसं  जमलं  पाहिजे आपल्याला … घोंघावणारा आवाज करत  गाड़ी पारसिकच्या बोगद्यातुन बाहेर आली ... सर्वत्र लख्ख प्रकाश पडला . सध्या जरी जिग्नेसच्या आयुष्यात अंधार असला तरी पुढच्या वळणावर प्रकाश येईल ... हे मात्र नक्की !



माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7



1 टिप्पणी:

  1. Coin Casino - Best Online Casino Games for Real Money 2021
    This site has a long history 인카지노 of offering online gambling, and one of the febcasino biggest players in the 카지노사이트 industry is Coin Casino is a great choice for you to take part in the

    उत्तर द्याहटवा