http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html लोकल डायरी --४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html लोकल डायरी --५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
लोकल डायरी -- २३
" मला सांग , अशी कोणती बाई आहे जी मुंबईत सगळ्यात जास्त दिसते .... ? "
" सगळ्यात जास्त दिसते म्हणजे ? ... ”
" म्हणजे , तिचा फोटो किंवा चित्र सगळ्यात जास्त दिसतं .... "
" एकच बाई आणि सारखी दिसते म्हणजे कोणीतरी फेमस असेल .... "
" ते काही माहित नाही ... पण सारखी दिसते ...कोण सांगा लवकर .... हरले का ? "
" जाऊ दे ... सांग बाबा .... "
" अरे , लेडीज डब्यावरच्या डोक्यावर पदर घेतलेल्या बाईचं चित्र ... ! "
" हाड .... आयला काय पण ...."
" काही पण असू दे .... पॉइंट आहे की नाही .... ? "
" ओके , चल मला सांग , असं कोणतं नाव आहे जे सेंट्रल रेल्वेच्या बहुतेक सगळ्यांना आणि बाकीच्यांना पण माहीत आहे ....?
" नाव ....? आयला कोणाचं नाव .... हीरो नायतर पॉलिटिशन असेल ...."
" नाही , सामान्य माणूस आहे .... "
" कोण ते सांग ...."
" दादु हाल्या पाटील .... हॅ हॅ हॅ .... "
" आईशप्पथ .... काय यार !!! "
आज डब्यात शिरलो तेव्हा बघितलं की प्रश्न मंजुषा सुरु होती . आणि तेवढाच गोंधळ चालू होता . लोकलशी संबंधित प्रश्न चालू होते .... आज आमचा सगळा ग्रुप हजर होता ... आणि त्यामुळे आमचा डबा भरल्या-भरल्यासारखा वाटत होता . बऱ्याच दिवसांनी सर्वजण निवांत होते , वार्षिक परीक्षा संपल्यावर मुलं असतात तसे !
" मित्रांनो , पुढच्या आठवड्यात आपली एंगेजमेंट ठरली आहे ..... " शरदने घोषणा केली . आणि सगळ्यांनी एकच गलका केला . मग अभिनंदन ... कॉंन्ग्रटस .... एंगेजमेंट कधी आहे ... ? कुठे आहे ? वगैरे जुजबी प्रश्न विचारुन झाले . शरद अगदी खुशीत होता ... आणि सगळ्यांची ईमाने- इतबारे उत्तरे देत होता . इतक्यात जिग्नेसने त्याला विचारलं , " तो शरदभाय , हमको बुलाएगा की नहीं ? "
चुकीचा प्रश्न नेमका कसा विचारावा ह्यात जिग्नेसचा हात कोणीच धरू शकणार नाही . आता हा काय विचारायचा प्रश्न झाला ? आमच्यामुळेच तर शरदचं जुळलं होतं ... तो आम्हाला त्याच्या एंगेजमेंटला बोलावणार नाही असं कसं होईल ? मॅगीला पटवण्यात आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं त्यामुळेच तर ती त्याला हो म्हटली होती . हां .... थोडा प्रॉब्लेम झाला होता ... म्हणजे , त्याचा जीव जाताजाता वाचला ... एका अज्ञात तरुणाने त्याचा जीव वाचवला होता . खरं सांगायचं तर शरद आज आमच्यात आहे तो त्या तरुणामुळेच .... ! मी त्याचा विचार करीत असताना अचानक माझ्या डोक्यात हजारो दिव्यांचा प्रकाश पडला . शरद जेव्हा ट्रेनखाली जीव द्यायला चालला होता त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी पलिकडच्या प्लॅटफॉर्मवरुन ज्याने उडी मारली तो तरुण आणि काल अँटी व्हायरसबरोबर पावसात भिजायला गेलो असताना चहाच्या टपरीवर बाईकवरुन गेलेला आणि डोळ्यांपर्यंत टोपी ओढुन घेतलेला तो तरुण , एकच आहे ... !
" अरे काल मला तो दिसला ...." मी अचानक बोलून गेलो .... आणि लगेच मला लक्षात आलं की मी चूक केलीय ... आता हे बाकीचे विचारणार कोण ? कुठे भेटला ....? त्याची उत्तरं दिली तर आणखी पुढचे प्रश्न येणार ... तू तिकडे काय करत होतास ? कोणाबरोबर गेला होतास ... ? आणि हे मला आमच्या प्रजेला सांगायचं नव्हतं ... मी असा विचार करीत असतानाच मला कुणीतरी हलवलं ... मी स्वप्नातुन जागा झाल्यासारखं पाहिलं तर नायर अंकल विचारत होते ... " अरे बाबा , कौन दिखा तुमको .... ? " आणखी एक दोन जणांनी मला तसंच विचारलं . पण मी त्यांनाच पुन्हा मुद्दाम विचारलं , " काय झालं ? म्हणून ...."
" झोपेत आहेस काय ? काय बडबड़तोयस...? " शरद खेकसला .
" अरे नाही .... माझ्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता .... ते जाऊ दे ... मला सांग , एंगेजमेंट नंतर लग्न कधी आहे ? " मी त्याचं आणि सर्वांचच लक्ष वळवण्यासाठी विचारलं .
" अरे हां ... कब है शादी ...? " माझं उरलेलं काम जिग्नेसने करुन टाकलं .
" शादी मे महीने में ... " तो म्हणाला .
" लग्न कसं करणार ? हिंदू पद्धतीने की ख्रिश्चन ? " सावंतांनी विचारलं .
" आधी हिन्दू ... मग ख्रिश्चन ..."
" अरे वा ... मस्तच ... चला एक काम फत्ते झालं ... आता आपल्यात कोण बाकी राहीलंय ? हां ... मध्या आणि भरत ..." भडकमकर म्हणाले . आणि सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला ...
" मधु तुम्हारा बॅंड कब बज रहा है ? " नायर अंकल मला विचारु लागले .
" क्या अंकल ... अभी तो मैं बच्चा हूँ .... "
" अरे तुम्हारा शादी सही टाईम पे होता तो तुम्हे अबी एक बच्चा होता ..." नायर अंकलच्या ह्या टोमण्यावर सगळे दिलखुलास हसले . पण भरत शांतच होता . कसल्यातरी विचारात गढुन गेला होता . मी विचारलं , काय रे ? एवढा गंभीर का झालायस ? "
" हो यार , टेंशनच आलंय मला ...." तो सरळ कबुली देत म्हणाला . भरत मनात काही ठेवत नाही . किंवा त्याला तसं करणं जमत नाही .
" का रे ? काय झालं ? " सर्वांच्या वतीने शरदने विचारुन टाकलं .
"अरे , पुढच्या रविवारी आमच्या मातोश्रींनी मुलगी बघायचा एक कार्यक्रम ठेवलाय . " कडु औषध प्यायल्यासारखं तोंड करत भरत म्हणाला . तो असं म्हणाला आणि आमच्या ग्रुपमधून पुन्हा एकत्रीत जोरदार ओरडण्याचा आवाज आला . आमच्या आजुबाजूचे लोक आमच्याकडे आश्चर्याने बघायला लागले . पलीकडे व्हिडिओ कोचमधून सुद्धा प्रश्नार्थक नजरा आमच्याकडे वळल्या . मी अँटी व्हायरसकडे पाहिलं , तिही आमच्याकडे बघत होती . तिने नजरेनेच ' काय झालं ? ' असं विचारलं. मी ' काही नाही ' म्हणून तिला खुणावलं .
" आयला , मजा आहे की मग तुझी ...! असं तोंड का वाकडं करतोयस ? " शरद त्याला एक गुद्दा मारत म्हणाला .
" कसली डोंबलाची मजा ! टेंशन आलंय राव मला ..."
" अरे तू तर असं टेंशन घेतलंय की तुला कांदेपोहे करायचेत आणि मुलगी तुला बघायला येणारे .... " सावंत गमतीने म्हणाले .
" तसं नाही हो सावंत ... पण माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे ... त्याच्यामुळे टेंशन आलंय ... "
" बर मला सांग , तू फोटो वगैरे बघितलास का मुलीचा ? की डायरेक्ट जाणार आहेस ? " मी विचारलं
" हो, फोटो बघितलाय ... चांगली आहे मुलगी ... गोरी आहे " हे सांगताना भरत थोड़ा लाजल्यासारखा करत होता .
" ए बाबा , नुसत्या फोटोवर नको जाऊ ... आजकाल फोटोशॉपमधे काळ्याचं गोरं आरामात करता येतं ... " शरद असं म्हणाला आणि भरत पुन्हा विचारात पडला .
“ मग तुला आवडली ना मुलगी ? ” भडकमकरांनी विचारलं .
“ हो , आवडली ना … ”
" मुलगी नात्यातली आहे की कुठल्या विवाहसंस्थेतून सुचवली आहे ? " सावंतांनी विचारलं
" नात्यातलीच आहे ... पण लांबच्या नात्यातली ..."
" हां मग बरं आहे .... विवाहसंस्थेतल्या पोरींचं काही खरं नसतं … म्हणजे , त्यांची हिस्टरी - जोग्राफी आपल्याला काही माहित नसते ना …. पण आजकाल नात्यातल्या मुलींचं पण काही सांगता येत नाही ... घरच्यांच्या दबावामुळे बिचाऱ्या तयार होतात लग्नासाठी ..." शरद म्हणाला आणि पुन्हा भरत चिंतेच्या गर्तेत जाऊन पडला . तो विचार करत असतानाच मी शरद कडे पाहिलं ... त्याने गमतीने माझ्याकडे बघुन डोळा मारला ... मी काय समजायचं ते समजलो . भरत आमचं आजचं गिर्हाइक होता .
" बरं मला सांग , तू तिची आधी चौकशी वगैरे केली असशीलच ...! " त्याने असं काहीही केलं नसल्याचं गृहीत धरुन मी विचारलं .
" न ... नाही रे ... मी काही चौकशी केली नाही ..." भरत आता गोंधळात सापडला होता .
" अरे येड्या , तू साधी चौकशी केली नाहीस ? लव मॅरेजमधे मुलामुलींना एकमेकांबद्दल आधीच सगळं माहीत असतं पण अरेंज मॅरेजमधे हे सगळं करावं लागतं बाबा ... मुलगी कोण ? कुठली ? काय करते ? कुठे कुठे फिरते ? कोणासोबत फिरते ? ह्याची चौकशी करायला नको ? ते काही केलं नाही आणि चाल्लाय मुलगी बघायला ...!" शरद एखाद्याला टेंशन द्यायला लागला की मागे पुढे पाहात नाही . भरतचा चेहरा पहाण्यालायक झाला होता . मग आमच्या ग्रुपच्या सीनियर मेंबर्सना त्याची दया आली .
" भरत , कुच टेंशन लेनेका जरुरत नय ... बिंदास जाव ... और बी कॉन्फिडेंट ....! " नायर अंकल म्हणाले आणि सगळ्यांनी एक एक मौलिक सल्ला त्याला द्यायला सुरुवात केली .
" मस्त नविन कपडे घालून जा ... आणि त्या झिपऱ्या काप पहिल्या …! " भडकमकर
" मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पहायचं … " शरद
" भरत भाय ... थोडा अच्छा डीओ लगाके जाओ ... नहीं तो मेरा डीओ लेके जाओ ..." जिग्नेस
" आणि हो , मुलीला ‘ गाऊन दाखव ’ वगैरे असं काही विचारु नकोस , नाहीतर ती आत जाऊन गाऊन घेऊन यायची ..." मी एक थुकरट विनोद केला आणि एकटाच फिदी फिदी हसलो . त्यावर सगळ्यांनी तोंडे वाकड़ी केली ..
" काय हे मध्या ... ! अगदीच खालच्या क्वालिटीचा टुकार जोक आहे हा... " सावंत म्हणाले ," बरं ते सोड भरत , आम्ही मस्करी केली तुझी .... बिलकुल टेंशन घेऊ नकोस ... हे शरद आणि मध्या जे काही बोलले त्याचा विचार करु नकोस ... जसा आहेस तसा जा .... बिंदास ...! "
" अरे तू जरा टेंशनमधे दिसलास म्हणून म्हटलं जरा आणखी भर घालू त्यात ..." मी गमतीने म्हणालो . भरतचा जीव भांड्यात पडला . शरद जागेवरुन उठला आणि त्याने भरतला मिठी मारली . , " सॉरी यारा .... गंमत केली ... अरे , काका - काकू तुझ्यासाठी चांगलीच मुलगी पहाणार ... त्यात काय टेंशन घेण्यासारखं ? आणि मी तर म्हणतो मुली वाईट नसतातच ... तुमचा दृष्टिकोण वाईट असतो . प्रत्येक मुलगी ही चांगलीच असते , फक्त तिला चांगलं किंवा वाईट ठरवणं , हे व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे तसला काही विचार करु नकोस ... बिंदास जा ... आणि आम्हाला लवकर लग्नाचे लाडू दे ... " शरदच्या ह्या छोटेखानी भाषणावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भरतचं टेंशन कमी झालेलं त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं . भरतची गाडी आता रुळावर आली होती . ही नाही तर दूसरी कोणती तरी मुलगी त्याला पसंत पडणार आणि पुढच्या काही दिवसांत त्याचं लग्नही होणार ... मन्नू , तेरा हुआ अब मेरा क्या होगा ....?
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7