मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

लोकल डायरी -- २३

  http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html  लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
 http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
    लोकल डायरी -- २३
" मला सांग , अशी कोणती बाई आहे जी मुंबईत  सगळ्यात जास्त दिसते .... ? "
" सगळ्यात जास्त दिसते म्हणजे ? ... ”
" म्हणजे ,  तिचा फोटो किंवा चित्र सगळ्यात जास्त दिसतं .... "
" एकच बाई आणि सारखी दिसते म्हणजे कोणीतरी फेमस असेल .... "
" ते काही माहित नाही ... पण सारखी दिसते ...कोण सांगा लवकर .... हरले का ? "
" जाऊ दे ... सांग बाबा .... "
" अरे , लेडीज डब्यावरच्या  डोक्यावर पदर घेतलेल्या बाईचं चित्र ... ! "
" हाड .... आयला काय पण ...."
" काही पण असू दे .... पॉइंट आहे की नाही .... ? "
" ओके , चल मला सांग , असं कोणतं नाव आहे जे सेंट्रल रेल्वेच्या बहुतेक सगळ्यांना आणि बाकीच्यांना पण माहीत आहे ....?
" नाव ....? आयला कोणाचं नाव .... हीरो नायतर पॉलिटिशन असेल ...."
" नाही ,  सामान्य माणूस आहे .... "
" कोण ते सांग ...."
" दादु हाल्या पाटील .... हॅ हॅ हॅ .... "
" आईशप्पथ .... काय यार !!!  "
आज डब्यात शिरलो तेव्हा बघितलं की प्रश्न मंजुषा सुरु होती . आणि तेवढाच गोंधळ चालू होता . लोकलशी संबंधित प्रश्न चालू होते .... आज आमचा सगळा ग्रुप हजर होता ... आणि त्यामुळे आमचा डबा भरल्या-भरल्यासारखा वाटत होता . बऱ्याच दिवसांनी सर्वजण निवांत होते , वार्षिक  परीक्षा संपल्यावर मुलं असतात तसे !
" मित्रांनो , पुढच्या आठवड्यात आपली एंगेजमेंट ठरली आहे ..... " शरदने घोषणा केली . आणि  सगळ्यांनी एकच गलका केला . मग अभिनंदन ... कॉंन्ग्रटस   ....  एंगेजमेंट कधी आहे ... ? कुठे आहे ? वगैरे जुजबी प्रश्न विचारुन झाले . शरद अगदी खुशीत होता ... आणि सगळ्यांची ईमाने- इतबारे  उत्तरे देत होता . इतक्यात जिग्नेसने त्याला विचारलं , " तो शरदभाय , हमको बुलाएगा की नहीं ? "
चुकीचा प्रश्न नेमका कसा विचारावा ह्यात  जिग्नेसचा हात कोणीच धरू शकणार नाही  .  आता हा काय विचारायचा प्रश्न झाला ? आमच्यामुळेच तर  शरदचं जुळलं होतं ... तो आम्हाला त्याच्या एंगेजमेंटला  बोलावणार नाही असं कसं होईल ?  मॅगीला पटवण्यात आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं त्यामुळेच तर ती त्याला हो म्हटली होती . हां .... थोडा प्रॉब्लेम झाला होता ... म्हणजे ,  त्याचा जीव जाताजाता वाचला  ...  एका अज्ञात तरुणाने  त्याचा जीव वाचवला होता . खरं सांगायचं तर शरद आज आमच्यात आहे तो त्या तरुणामुळेच .... ! मी त्याचा   विचार करीत असताना अचानक माझ्या डोक्यात हजारो दिव्यांचा प्रकाश पडला . शरद जेव्हा ट्रेनखाली जीव द्यायला चालला होता त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी पलिकडच्या  प्लॅटफॉर्मवरुन ज्याने उडी मारली तो तरुण आणि काल अँटी व्हायरसबरोबर पावसात भिजायला गेलो असताना चहाच्या  टपरीवर बाईकवरुन गेलेला आणि डोळ्यांपर्यंत टोपी ओढुन  घेतलेला  तो तरुण ,  एकच आहे ... !
" अरे काल मला तो दिसला ...." मी अचानक बोलून गेलो .... आणि लगेच मला लक्षात आलं की मी चूक केलीय ... आता हे  बाकीचे विचारणार कोण ? कुठे भेटला ....? त्याची उत्तरं दिली तर आणखी पुढचे प्रश्न येणार ... तू तिकडे काय करत होतास ? कोणाबरोबर गेला होतास ... ? आणि हे मला आमच्या प्रजेला सांगायचं नव्हतं ... मी असा विचार करीत असतानाच मला कुणीतरी  हलवलं ... मी स्वप्नातुन जागा झाल्यासारखं पाहिलं तर नायर अंकल विचारत होते ... " अरे बाबा , कौन दिखा तुमको .... ? " आणखी एक दोन जणांनी मला तसंच विचारलं . पण मी त्यांनाच पुन्हा मुद्दाम  विचारलं , " काय झालं ?  म्हणून ...."
" झोपेत आहेस काय ? काय बडबड़तोयस...? " शरद खेकसला  .
" अरे नाही .... माझ्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता .... ते जाऊ दे ... मला सांग , एंगेजमेंट नंतर लग्न कधी आहे ? " मी त्याचं आणि सर्वांचच लक्ष वळवण्यासाठी विचारलं .
" अरे हां ... कब है शादी ...? " माझं उरलेलं काम जिग्नेसने करुन टाकलं .
" शादी मे महीने में ... " तो म्हणाला .
" लग्न कसं करणार ? हिंदू पद्धतीने की ख्रिश्चन ? "  सावंतांनी विचारलं .
" आधी हिन्दू ... मग ख्रिश्चन ..."
" अरे वा ... मस्तच ... चला एक काम फत्ते झालं ... आता आपल्यात कोण बाकी राहीलंय ? हां ... मध्या आणि भरत ..." भडकमकर म्हणाले . आणि सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला ...
" मधु तुम्हारा बॅंड कब बज रहा है ? " नायर अंकल मला विचारु लागले .
" क्या अंकल ... अभी तो मैं बच्चा हूँ .... "
" अरे तुम्हारा शादी सही टाईम पे होता तो तुम्हे अबी एक बच्चा होता ..." नायर अंकलच्या ह्या टोमण्यावर सगळे दिलखुलास हसले . पण भरत शांतच होता . कसल्यातरी विचारात गढुन गेला होता .  मी विचारलं , काय रे ? एवढा गंभीर का झालायस ? "
" हो यार , टेंशनच आलंय मला ...." तो सरळ कबुली देत म्हणाला . भरत मनात काही ठेवत नाही . किंवा त्याला तसं  करणं  जमत नाही .
" का रे ? काय झालं ? " सर्वांच्या वतीने शरदने विचारुन टाकलं .
"अरे , पुढच्या रविवारी आमच्या  मातोश्रींनी मुलगी बघायचा एक कार्यक्रम ठेवलाय . " कडु औषध प्यायल्यासारखं तोंड करत  भरत  म्हणाला . तो असं म्हणाला आणि आमच्या ग्रुपमधून पुन्हा एकत्रीत जोरदार ओरडण्याचा आवाज आला . आमच्या आजुबाजूचे लोक आमच्याकडे आश्चर्याने बघायला लागले . पलीकडे व्हिडिओ कोचमधून सुद्धा प्रश्नार्थक नजरा आमच्याकडे वळल्या . मी अँटी व्हायरसकडे पाहिलं , तिही आमच्याकडे बघत होती . तिने नजरेनेच ' काय झालं ? ' असं विचारलं. मी ' काही नाही '  म्हणून तिला खुणावलं .
" आयला , मजा आहे की मग तुझी ...! असं तोंड का वाकडं करतोयस ? " शरद त्याला एक गुद्दा मारत म्हणाला .
" कसली डोंबलाची मजा ! टेंशन आलंय राव मला ..."
" अरे तू तर असं टेंशन घेतलंय की तुला कांदेपोहे करायचेत आणि मुलगी तुला बघायला येणारे .... "  सावंत गमतीने म्हणाले .
" तसं नाही हो सावंत ... पण माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे ... त्याच्यामुळे टेंशन आलंय ... "
" बर मला सांग , तू फोटो वगैरे बघितलास का मुलीचा ? की डायरेक्ट जाणार आहेस ? "  मी विचारलं
" हो,  फोटो बघितलाय ... चांगली आहे मुलगी ... गोरी आहे " हे सांगताना भरत थोड़ा लाजल्यासारखा करत होता .
" ए बाबा , नुसत्या  फोटोवर नको जाऊ ... आजकाल फोटोशॉपमधे काळ्याचं  गोरं आरामात करता येतं ... " शरद असं म्हणाला आणि भरत पुन्हा विचारात पडला .
“ मग तुला आवडली ना मुलगी  ? ” भडकमकरांनी विचारलं .
“ हो , आवडली ना … ”
" मुलगी नात्यातली आहे की कुठल्या विवाहसंस्थेतून सुचवली आहे ? " सावंतांनी विचारलं
" नात्यातलीच आहे ... पण लांबच्या नात्यातली ..."
" हां मग बरं आहे .... विवाहसंस्थेतल्या पोरींचं काही खरं नसतं … म्हणजे , त्यांची हिस्टरी - जोग्राफी  आपल्याला काही माहित नसते  ना ….   पण आजकाल नात्यातल्या मुलींचं पण काही सांगता येत नाही ... घरच्यांच्या दबावामुळे बिचाऱ्या तयार होतात लग्नासाठी ..." शरद म्हणाला आणि पुन्हा भरत चिंतेच्या गर्तेत जाऊन पडला . तो विचार करत असतानाच मी शरद कडे पाहिलं ... त्याने गमतीने माझ्याकडे बघुन डोळा मारला ... मी काय समजायचं ते समजलो . भरत आमचं  आजचं गिर्हाइक होता .
" बरं मला सांग , तू तिची आधी  चौकशी वगैरे केली असशीलच ...! "  त्याने असं काहीही केलं नसल्याचं गृहीत धरुन मी  विचारलं .
" न ... नाही रे ... मी काही चौकशी केली नाही ..." भरत आता गोंधळात सापडला होता .
" अरे येड्या , तू साधी चौकशी केली नाहीस ? लव मॅरेजमधे मुलामुलींना एकमेकांबद्दल आधीच सगळं माहीत असतं पण  अरेंज मॅरेजमधे हे सगळं  करावं लागतं बाबा ... मुलगी कोण ? कुठली ? काय करते ? कुठे कुठे फिरते ? कोणासोबत फिरते ? ह्याची चौकशी करायला नको ?  ते काही केलं नाही   आणि चाल्लाय मुलगी बघायला ...!"  शरद एखाद्याला टेंशन द्यायला लागला की मागे पुढे पाहात नाही . भरतचा चेहरा पहाण्यालायक झाला होता . मग  आमच्या ग्रुपच्या सीनियर मेंबर्सना त्याची दया आली .
" भरत , कुच टेंशन लेनेका जरुरत नय ... बिंदास जाव ... और बी कॉन्फिडेंट ....! " नायर अंकल म्हणाले आणि सगळ्यांनी एक एक मौलिक  सल्ला त्याला द्यायला सुरुवात केली .
" मस्त नविन कपडे घालून जा ... आणि त्या झिपऱ्या काप पहिल्या …! " भडकमकर
" मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पहायचं … " शरद
" भरत भाय ... थोडा अच्छा  डीओ लगाके जाओ ... नहीं तो मेरा डीओ लेके जाओ ..." जिग्नेस
" आणि हो , मुलीला ‘ गाऊन दाखव ’ वगैरे  असं काही विचारु नकोस , नाहीतर ती आत जाऊन गाऊन घेऊन यायची ..." मी एक थुकरट विनोद केला आणि  एकटाच  फिदी फिदी हसलो . त्यावर सगळ्यांनी तोंडे वाकड़ी केली ..
" काय हे  मध्या ... ! अगदीच खालच्या क्वालिटीचा टुकार  जोक आहे हा... " सावंत म्हणाले ," बरं ते सोड भरत , आम्ही मस्करी केली तुझी .... बिलकुल टेंशन घेऊ नकोस ... हे शरद आणि मध्या जे काही बोलले त्याचा विचार करु नकोस ... जसा आहेस तसा जा .... बिंदास ...! "

" अरे तू जरा टेंशनमधे दिसलास म्हणून म्हटलं जरा आणखी भर घालू त्यात ..." मी गमतीने म्हणालो . भरतचा जीव भांड्यात पडला .  शरद जागेवरुन उठला आणि त्याने भरतला मिठी मारली . , " सॉरी यारा .... गंमत केली ... अरे , काका - काकू तुझ्यासाठी  चांगलीच  मुलगी पहाणार ... त्यात काय टेंशन घेण्यासारखं ? आणि मी तर म्हणतो मुली वाईट नसतातच ... तुमचा दृष्टिकोण वाईट असतो . प्रत्येक मुलगी ही चांगलीच असते , फक्त तिला  चांगलं किंवा वाईट ठरवणं ,  हे व्यक्तीसापेक्ष आहे.   त्यामुळे तसला काही विचार करु नकोस ... बिंदास जा ... आणि आम्हाला लवकर लग्नाचे लाडू दे ... " शरदच्या ह्या छोटेखानी भाषणावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भरतचं टेंशन कमी झालेलं त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं . भरतची गाडी आता रुळावर आली होती . ही नाही तर दूसरी कोणती तरी मुलगी त्याला पसंत पडणार आणि पुढच्या काही दिवसांत त्याचं लग्नही होणार ... मन्नू ,  तेरा हुआ अब मेरा क्या होगा ....?

माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

लोकल डायरी - २२

       
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html  लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html  लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html    लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html    लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html   लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html   लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html  लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html  लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html   लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html  लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html  लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html  लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html  लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html  लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html   लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html    लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html  लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
काल रात्री पासूनच मुसळधार पाऊस पडत होता . असा मुसळधार की,  ऋतुतला  सगळा पाऊस एकाच दिवसात  पडून घेणार आहे . सकाळी उठल्या उठल्या मी न्यूज चॅनेल लावला . " मुंबई पुन्हा थांबली . ....  हिंदमाता , मिलन सब वे ....,  पाण्याने भरले . मुम्बापूरीची तुंबापूरी झाली . .... ' मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प .... ' ' पश्चिम रेल्वेची वाहतूक  २- ३  तास उशिराने ....  लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द ... ' कुर्ला सायन भागात रेल्वे रुळावर पाणी साठले ... ' अशा बातम्या झळकु लागल्या ....  मी खिड़कीतून बाहेर पाहिलं . आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरुन गेलं होतं . थोडा वेळ विश्रांती घेऊन  पुन्हा पावसाला सुरुवात झाली . सगळं वातावरण कुंद होऊन गेलं .    वाह  ... वा ... आज गाड्या बंद ... म्हणजे ऑफिसला सुट्टी .... घरी आरामात लोळत पडायचं .... फुल्ल मज्जा .... ! मी असं मनात मांडे खात असतानाच , माझा फोन वाजला .
" हां , बोल भरत , ..... अरे गाड्या बंद आहेत ना ..... , पाणी काय बघायचं .... ? , कंटाळा आलाय यार ...., पाऊस बघ कसला पड़तोय .... , बरं ठीक आहे , येतो ...." कंटाळून मी थ्री - फोर्थ  आणि टी शर्ट घातला . त्यावर विंडशीटर चढवून बाईक काढली , अन  बाहेर पडलो .  जागोजाग रस्ते पाण्याने भरले होते . कुठून जावं ? हीच पंचाईत  झाली .  भरतला  मनातून शिव्या घालत  गूढघाभर  पाण्यातुन वाट काढत कसातरी  मी स्टेशनपाशी पोहोचलो .  प्लॅटफॉर्मवर  तुडुंब गर्दी ... एकच गोंधळ उडाला होता ... काही लोकांनी परतीचा रस्ता धरला होता तर  काही आशावादी लोक अजूनही गाड़ी येण्याच्या दिशेकडे डोळे लावून बसले होते .  खाली ट्रॅकवर अचानक एखाद्या नदीचा उगम व्हावा आणि त्याला अनेक उपनद्या येऊन मिळाव्यात असं चित्र तयार झालं होतं . रेल्वेचे रुळ गढूळ पाण्यात हरवून गेले होते .  सूचना देणाऱ्या  माईकवरची बाई सर्व प्रवाशांची औपचारिक शब्दात माफी मागत होती ... एवढ्या सगळ्या कोलाहलात भरतला कुठून शोधणार ...? मी त्याला फोन लावला .... तर त्याचा फोन स्विचऑफ दाखवत होता . पुन्हा दोन तिनदा लावून पाहिला , तरी तेच  ... मी मग शरदला फोन लावला , तर तो म्हणाला की तो स्टेशनला आलाच नाही ...  मग माझं डोकंच सटकलं ... ह्या मूर्खाने बोलावल्यामुळे मी पाण्यातुन धड़पडत एवढ्या लांब स्टेशनवर आलो आणि ह्याचा फोन बंद ....!!! खड्यात गेला भरत ....! तिरमिरित मी मागे फिरलो तर एका सप्तरंगी  छत्रीची काडी माझ्या डोळ्यात जाता जाता राहिली . थोडक्यात डोळा वाचला .  मी वैतागुन   पाहिलं तर अँटी व्हायरस समोर उभी ... ! माझा वैताग कुठच्या कुठे पळून गेला .
" अरे .... हाय ....  तू ....? "
" ओह ... हाय ...."
" ऑफिसला  गेली नाहीस ...? मी गमतीने विचारलं .
" आता काय पोहत पोहत जाऊ ....?  आज खुप महत्वाचं काम होतं माझं ऑफिसला ... शीट !  हा पाऊस पण ना  ...! " ती वैतागाने म्हणाली .
" पण आता तू काय करु शकणार आहेस .... तुला भायखळयापर्यंत जाण्यासाठी एखाद्या होडीचा नायतर  बोटीचा बंदोबस्त करावा लागेल ... "  मी गमतीच्याच मूड मधे होतो ... तिने लटक्या रागात एकदा माझ्याकडे पाहिलं .
" आणि तू ह्या अशा कपड़यांमधे ऑफिसला  जाणार  होतास ? " ती मला वरुन खाली न्याहाळत म्हणाली .
" हॅ ....  ऑफिसला जायला  कोण आलंय इथे  ...? मी तर  असंच पाणी बघायला आलोय ...." मी चेहऱ्यावर बेफिकिरी आणत म्हणालो .
" भारीच आहेस तू ....! "
"  तू काय करणार आहेस आता ? "
" आता काय करणार ?  परत घरी .... शीट ...! " काम करायला न मिळाल्याने अँटी व्हायरस  वैतागली होती ... एकूणच मुली सभ्य असतात ... अँटी व्हायरस ह्याला अपवाद नव्हती . नायतर आम्ही ... ! दर पावसाळ्यात ह्याच दिवसाची वाट बघत असलेले चातक पक्षी आहोत ... कधी जोराचा पाऊस पड़तोय आणि कधी लोकल्स बंद पडतायत ... !
" माझ्याकडे बाईक आहे .... हायवेच्या पलीकडे डोंगरावर एक धबधबा तयार झालाय .... जाऊया ? "  मी अचानक तिला विचारलं . मी असं काही विचारेन ह्याची तिला कल्पना नसावी . ती आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिली ..
" मी सहज विचारलं .... एक्चुली आम्ही सगळे मित्र जाणार होतो ... पण त्यांचा फोन लागत नाही ... आणि आता ते भेटणार सुद्धा  नाहीत बहुतेक ... त्यामुळे  तू येतेस का असं विचारलं ....एकटा गेलो तर पकेन ....  तुला नाही यायचं तर तसा काही इश्यू नाही ...  पण तू नुसती घरी बसून तरी काय करणार ? "  मी पाठ केल्यासारखं भराभर  बोलून गेलो . अँटी व्हायरसने थोडा वेळ विचार केला ... माझ्याकडे एकवार पाहिलं  अन म्हणाली , " नको , मी घरी जाते ... बाय ..." आणि निघुन गेली . आपण आज एक मोठा मूर्खपणा केला ह्याची जाणीव ती गेल्यावर मला झाली . काय गरज होती असं विचारायची ? फारशी ओळख पाळख नसताना कोणती मुलगी अशी एखाद्या मुलाबरोबर पावसात भिजत फिरायला जाईल ...? आणि मुख्य म्हणजे ज्या मुलीची एंगेजमेंट झाली असेल ती तर असं बिलकुलच करणार नाही . हा मुलगा आपला गैरफायदा तर घेणार नाही ना  असा काहीतरी  तिने विचार केला असणार ... आपल्याला तर ती मवालीच समजत असणार .... पण माझ्या तर मनात तसं काहीच नव्हतं ... मी मोकळेपणाने तिला विचारलं होतं , छे ...! जाऊ दे !  .... आता विचार करुन काय फायदा ....?   पुन्हा  भेटली तर ती  बोलणार सुद्धा नाही आता ... . गाढवपणा झाला आज ....!  मी विचारांच्या गर्तेत बुडून गेलो . रस्त्याने चालताना एक दोन जणांचे धक्केही खाल्ले ... आणि त्यांचं  वैतागाचं बोलणंही  ...! पण माझं तिकडे लक्षच नव्हतं . थोड्या वेळापूर्वी अँटी व्हायरस बरोबर झालेल्या संभाषणाचे विश्लेषण करण्यात माझं मन गुंतलं होतं . मी माझी बाईक जिथे पार्क केली होती तिथे आलो . बाईक बाहेर काढली . चावी लावून ती चालू करणार इतक्यात माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला . मागे वळून बघतो तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना . मागे अँटी व्हायरस उभी होती ... माझ्याकडे हसऱ्या चेहऱ्याने पहात ....!
" अरे , तू ....? तू गेली नाहीस ? " मी विचारलं ... हे म्हणजे त्या बिरबलच्या गोष्टीतल्या आंधळ्या माणसासारखी गत झाली . समोर दिसत असूनही मी तिला विचारत होतो की ती गेली नाही का ? म्हणून ...
" नाही ... असंही नुसतं घरी बसून मी काय करणार ? म्हणून आले ..." तिने माझाच  डायलॉग मला चिकटवला .
" म्हणजे तू येतेस फिरायला ? " मला अजूनही विश्वास बसेना .
" नाही ... तुला टाटा करायला आलेय .... अरे असा काय तू ...?  चल ...."
" ओके , चला तर मग ....! " पडत्या फळाची आज्ञा समजून  मी बटन दाबून गाड़ी चालू केली … आमच्या दोघात ' सुरक्षित अंतर ' ठेवून  ती एका बाजूला पाय सोडून बाईकवर बसली . स्टेशनच्या गर्दीतून वाट काढत , तोल संभाळत,   मी बाईक चालवु लागलो . हायवेकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो .  पावसाचा भर थोड़ा ओसरला होता . परंतु जागोजागी पाणी साचले होते . त्यातून वाट काढत दोरीवरुन बाईक चालवणाऱ्या सर्कशीतल्या गाडीस्वारासारखा तोल सांभाळत , तिच्या अंगाला स्पर्श होऊ न देण्याची खबरदारी घेत  मी चाललो होतो . बरेच लोक परतीच्या वाटेकडे चालले होते . काही दुकांनांमधे पाणी शिरल्याने त्यांचे सामान दुसरीकडे हलवण्याची गडबड सुरु होती . बरीच दुकाने अजुन उघडलीसुद्धा नव्हती .   शाळा बंद ठेवल्याने शाळेची काही मुले रस्त्यावरचं  पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत मजा करत पुन्हा घरी चालली होती . बरेच लोक बाईकवरुन पाणी बघायला बाहेर पडले  होते ... मुख्य रस्त्याला लागलो आणि सुसाट गाडी सोडली ... पावसाचे तुषार बाणासारखे अंगावर येत होते ...
" आता काही टेंशन  नाही …. वाघ दमला आता  पळून पळून … मागे धापा टाकतोय …  " ती  म्हणाली .
" काय ? … तू काय म्हणतेस  ? " मला काहीही न कळल्यामुळे मी विचारलं .
" नाही ... वाघ मागे लागल्यासारखा गाडी पळवतोयस म्हणून म्हटलं  ...." तिच्या  अशा टोमण्याची मला मोठी गंमत वाटली  . ही पोरगी बोलायला कुणालाच ऐकणार नाही ... एकदम बिनधास्त !
" ओके ... जशी आपली आज्ञा...." म्हणत मी बाईकचा वेग कमी केला . ३० च्या स्पीडने गाडी एकाच सुरात पुढे जाऊ लागली . तिने डोक्यावर छत्री धरली होती . पण वेड्या वाकड्या  पावसामुळे ती भिजत होती . हायवेवरुन गाड़ी वळवुन आम्ही पलिकडच्या बाजूला गावात जाणाऱ्या लहानश्या मातीच्या रस्त्याला लागलो . दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी स्वागताला उभी असल्यासारखी वाटत होती . हिरव्या रंगात सुद्धा किती छटा  असू शकतात हे त्या झाडांची पानेच दाखवून देत होती . रिमझिम पाऊस पडत होता .  सर्वत्र वातावरण धुंद झालं होतं .
" वॉव ... काय सुंदर आहे ना सगळं ? " एखाद्या नविन प्रदेशात आल्यासारखी इकडे तिकडे न्याहाळत ती म्हणाली .
" बघ ... आणि तू येणार नव्हतीस ....."
" सीरियसली ...  मी मिस केलं असतं हे दृश्य .... " तिने लगेच कबुली जबाब देऊन टाकला .   झाडांच्या रांगेतुन पुढे जाताना काही  विविध रंगी पक्षी दिसले .... माझं सहज लक्ष गेलं,   झाडांवर  त्यांनी पावसापासून वाचण्यासाठी गोलाकार घरटी केलेली होती .... एका ठिकाणी मी बाईक थांबवली .
" अरे , काय झालं ...? " तिने विचारलं .
" त्या झाडावर एका पक्षाचं घरटं आहे .... त्यात नक्कीच त्याची पिल्लं असतील ...." म्हणत मी त्या दिशेने जाऊ लागलो . दुसऱ्या फांदीवर चढुन पाहिलं तर त्यात दोन पिटुकली पिल्ले चोची वर करुन आपल्या आईची वाट बघत होती ... माझा अंदाज खरा ठरला . मी अँटी व्हायरसला बोलावून ते दाखवलं ... " ओह  माय गॉड .... सो क्यूट ! " म्हणत जवळ जवळ ती किंचाळलीच ....!
" शू .... डिस्टर्ब करु नकोस त्यांना ... "
" सॉरी ... पण असं लाईव मी कधीच बघितलं नव्हतं .... बघितलं तरी ते  डिस्कवरी नाईतर ऍनिमल प्लेनेट चॅनेल वर ... पण त्यात ही मजा नाही ... सुपर्ब ....!   ती पिल्लं बघ ना कशी करतायत .... ओह माय गॉड ...!  त्यांची आई आली ... त्यांच्या चोचीमधे भरवतेय खायला ... वॉव ... " ती एकदम उत्साहित होत म्हणाली . आम्ही थोडा वेळ त्या पक्षांचा चाललेला  लंच पहात उभे राहिलो .
" चला मॅडम .... अजुन तो  नविन तयार झालेला धबधबा बघायचाय .... " मी परत फिरत म्हणालो . तिला अजुन थोडा वेळ थांबायचं होतं . नाईलाजाने  ती तिथून निघाली . बाईकवर बसून आम्ही पुढे निघालो . आता झाडी संपून पठारासारखा मोकळा भाग लागला . समोर एक टेकडी दिसत होती ...  पूर्वी  त्यात एक दगडाची खाण होती ... परंतु आता बंद झाली होती . त्याच्या माथ्यावरुन  पाण्याचा एक ओहोळ आलेला आणि तो खाली कोसळत होता . एकूणच हा मानवनिर्मित धबधबा जरी असला तरी दिसायला सुंदर दिसत होता . डोंगर  पोखरुन उंदीर काढतात हे माहित होतं पण इथे  डोंगर पोखरुन धबधबा काढला होता . आम्ही त्याच्या जवळ गेलो ... बरेच लोक तो बघायला आलेले दिसले ... काही जण त्याच्या खाली उभं राहून वरुन  कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेत होते .  आनंदाने ओरडत होते . उंचावरुन पडणाऱ्या पाण्याचा आवाज कानांमधे घुमत होता .
" चल भिजायचं  धबधब्यात ? " तिने  विचारलं
" आता आणखी काय भिजायचं राहिलंय ...? " मी  हात आडवे पसरुन म्हणालो  .
" तू बस मी जाते ....." म्हणत ती   धबधब्यापर्यंत जाणाऱ्या  अवघड वाटेने गेली सुद्धा ! ती धबधब्याखाली उभी राहून जोरजोरात ओरडत होती .... लहान मुलीसारखी ....! मला  ती  राम तेरी गंगा मैली मधली  मंदाकिनीच  वाटायला लागली .  माझ्या तर डोळ्यांवर विश्वास बसेना , ही  तीच मुलगी आहे की जिला पहिल्यांदा हुंदके देऊन रडताना मी पाहिलं होतं ... ? बराच वेळ ती तशीच धबधब्याखाली भिजत राहिली . मी तिला मनगटावरचं घड्याळ दाखवुन उशीर झाल्याचं खुणावलं  तेव्हा ती परत आली . ती नखशिखान्त भिजली होती . कुड़कुडत आणि ओठ थरथरवत  उभी राहिली .
" काय ? कसं वाटलं ....?  "
" वॉव ... सुपर्ब ....ऑसम... "  ती खुप खुश दिसत होती आणि आता  जास्तच कुडकुडु लागली . मी माझं विंडशीटर काढून तिला दिलं . समोर  कोसळणारा धबधबा डोळ्यांत साठवून घेत आम्ही  उभे होतो . ती माझ्या शेजारी उभी होती .  मला तिच्यासोबत असल्यामुळे  तरंगल्यासारखं वाटू लागलं .खुप मस्त ...!  आम्ही तिथे कितीतरी वेळ तसेच उभे राहिलो . जायचं मन होईना पण तेव्हा पायांनीच  त्याची जाणीव करुन दिली .
" चला , जायचं परत ...? " मी विचारलं .
" परत जायचं ....? "  ती कसंनुसं तोंड करत म्हणाली . आम्ही पुन्हा बाईकवर बसलो . ह्यावेळी  ती दोन्ही बाजुंना पाय सोडून बाईकवर बसली . आम्ही पुन्हा हायवेवर आलो . बाजूला एका टपरीवर चहा उकळत असलेला दिसला .
"  चहा  .... ? "
" विचारतोस काय ... बाईक थांबव .... " बाईक थांबवल्या थांबवल्या तिने खाली उडीच मारली . असल्या पावसाळी वातावरणात गरमागरम चहा म्हणजे  आता काय बोलायचं ...! प्रत्येकी दोन  कटिंग मारल्यावर कुठे आम्हाला बरं वाटलं . चहा पीत असताना मी  सहज हायवेच्या दिशेने पाहिलं . भन्नाट वेगात एक बाईक समोरून येत असलेली दिसली . रायडरने  विंडशीटर घातलेलं होतं आणि डोक्यावरची  टोपी अगदी डोळ्यांपर्यंत खाली ओढलेली .  तो आमच्या समोरुन निघुन गेला . पण जाताना त्याने आमच्याकडे एकदा पाहिलं . एका क्षणात तो आमच्या समोरुन निघुन गेला .  त्याला बघून  माझ्या डोक्यात एक बल्ब पेटला .  ' ह्याला कुठे तरी पाहिला आहे ...'  मी आठवू लागलो .
" मस्त आहे ना चहा ... ? " अँटी व्हायरस विचारत होती पण माझं लक्ष तिच्याकडे नव्हतंच . ' तो बाईकवाला  तरुण कोण ? मी नक्कीच त्याला कुठेतरी पाहिला आहे ....पण कुठे ? '
" अरे लक्ष कुठे आहे तुझं ...? " अँटी व्हायरसने मला हलवलं .
" अगं आत्ता एक मुलगा बाईक वरुन गेला तू बघितलस का त्याला ? "
" कोण ....? मी नाही बघितला ..." ती चहाचा घोट घेत म्हणाली .
" त्या मुलाला मी कुठेतरी  पाहिला आहे ... पण आता आठवत नाही ..."
" सोड ना ... त्याचं काय एवढं ? चहा गार होतोय तुझा ..."
" जाऊ दे .... चला ...." म्हणत मी चहा संपवला ,  टपरीवाल्याला   पैसे दिले आणि आम्ही दोघे निघालो . हायवेवरुन आम्ही पुन्हा आता शहराच्या दिशेने निघालो . तिच्या बिल्डिंगपाशी पोहोचलो .  
" मग ... कशी वाटली राईड ...? "
" खुप मस्त ... थॅंक्स ... आज तुझ्यामुळे माझा दिवस अगदी छान गेला . ... " ती माझ्याकडे बघत म्हणाली . तिच्या नजरेत काहीतरी वेगळेच भाव  मला दिसू लागले ... ह्यापूर्वी कधीही न पाहिलेले … मीही तिच्या नजरेत हरवून गेल्यासारखं पहात राहिलो .  असं वाटलं हा काळ असाच गोठून राहावा  …. पण आपल्याला वाटतं  तसं  नेहमीच होतं  असं नाही . ‘ पॉम … पॉम  ’ मागून एका गाडीचा होर्न वाजला . आम्ही दोघेही दचकलो आणि  नजरबंदी सुटली …. उफ़्फ़ … ये जालीम दुनिया …. !


क्रमशः ---


माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .

https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7