माझी नवीन वेबसाईट
मनमौजी
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
गुरुवार, २ जानेवारी, २०२०
सिझन २ - लोकल डायरी ९
https://milindmahangade.blogspot.com/2019/10/blog-post_24.html सिझन २ -लोकल डायरी १
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
https://milindmahangade.blogspot.com/2020/01/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ८
सिझन २ - लोकल डायरी ९
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
https://milindmahangade.blogspot.com/2020/01/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ८
सिझन २ - लोकल डायरी ९
शरदच्या पार्टीचा हँग ओवर दुसऱ्या दिवशीही गेला नाही . माझं डोकं चांगलंच चढलं होतं . आमच्या बाकीच्या मंडळींचीही अवस्था काही वेगळी नव्हती. जिग्नेसचा तर वकार युनुस झाला होता . दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने संपूर्ण दिवस झोपून काढला . यामुळे मग रात्री झोप आली नाही आणि मग त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी झोप यायला लागली . आळस देत देत मी प्लॅटफॉर्मवर आलो . प्लॅटफॉर्मवर शरद , भडकमकर आणि नायर अंकल आले होते. भरत अजून आला नव्हता . काल तो त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेला होता. काय झालं असावं असा विचार करीत असतानाच तो धावत आला . तेवढ्यात समोरून लोकल आली तसा तो आम्हाला हात दाखवून जागा पकडायला शरदबरोबर पुढे निघून गेला . सावंत आज आले नाहीत . आणि त्यांचा फोनही लागला नाही . लोकल प्लॅटफॉर्मवर आल्यावर सगळे आत शिरले तेव्हा जिग्नेससुद्धा डाऊन करून आलेला होता .
" जिग्नेस भाय , कैसा है तबियत ? " शरदने त्याला विचारलं . त्यावर त्याने ओक्के असं हात उंचावून खुणावलं .
" जमता नहीं तो पिता क्यूँ है बे ? " भरत म्हणाला . आज बऱ्याच दिवसांनी त्याचा हा सूर ऐकायला मिळाला .
" अरे , भरत भाय , अपने शरद भाय का पार्टी था । उस्को बुरा लगता ना .... " जिग्नेस गमतीत म्हणाला . त्याला दोन टिन सुद्धा जास्त होतात , तिथे तो साडे तीन टिन प्यायला होता . त्याला उलट्या झाल्या नसत्या तर नवल होतं.
" नहीं , लेकिन मेरेको सबसे अच्छा जिग्नेसही लगा । कोई भी पार्टी तब रंग लाती है जब कोई ऐसा दारू पी के उलटी करता है । " शरदच्या ह्या टोमण्यावर सर्वजण हसले .
" भडकमकर पण मस्त मजेत होते ... " मी म्हणालो . त्यावर त्यांनी पुन्हा ते " त्या दिवशी मस्त मजा आला " चं पालुपद आम्हाला ऐकवलं .
" अरे , सावंत कब चला गया ? और आज बी नय आया ? उसका दारू उतरा की नय ? " नायर अंकल विचारू लागले . आम्हाला कुणालाच त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं . भरतने फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागत होता. मी पलीकडे पाहिलं , अवंती तिच्या जागी उभी होती . ती माझ्याकडेच बघत होती. मी पाहिल्यावर छान पैकी हसली .
" आँखो ही आँखो में इशारा हो गया ... " शरदने गाणं सुरू केलं आणि बाकीचे सगळे त्याच्या मागोमाग " बैठे बैठे जिने का सहारा हो गया .... " गाऊ लागले . हे असं अचानक ऐकल्यावर आणि ते आपल्यालाच उद्देशून आहे असं कळल्यावर तर मला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं असं वाटू लागलं . इतकी झटपट प्रतिक्रिया केवळ आमचा ग्रुपच देऊ शकतो . मी पुन्हा अवंतीकडे पाहिलं , तीही ओठ मुडपून हसत होती . सगळे मला चिडवायला लागले . मला पण गंमत वाटत होती . मी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू दिलं . थोड्या वेळाने ते आपोआप शांत झाले आणि आपापल्या कामाला लागले.
भरत माझ्या बाजूलाच उभा होता . त्याच्या बाजूला शरद उभा होता . मी त्याला कालच्या त्याच्या होणाऱ्या बायकोच्या भेटीबद्दल विचारलं . त्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला .
" काय झालं ? सांग तरी ... " मी म्हणालो.
" अरे , काल राडाच झाला ना भाई ! मी सुनीताला भेटायला गेलो होतो , तर ती एकटी नव्हती आली , तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण आणि एक मुलगा सुद्धा आला होता. " भरत म्हणाला .
" मग ? " शरदने विचारलं.
" धम्माल आली काल . तुला सांगतो तिची मैत्रीण एकदम खतरनाक आहे ... कराटे चॅम्पियन , ब्लॅक बेल्ट ! "
" तिच्या मैत्रिणीचं काय मधेच ? " मला काही कळेना .
" तेच सांगतोय ना . मी तिथे गेलो . आधी तर माझं डोकचं फिरलं होतं . मी तिला थेट विचारणार होतो , पण ती एकटी आली नव्हती ते दोघेही तिच्या बरोबर होते . मला वैताग आला साला . वाटलं ही पोरगी चालू दिसतेय . पण नंतर जे घडलं ते बघायला तुम्ही लोक पाहिजे होतात ." एखादी सुरस कथा सांगावी तसं भरत म्हणाला .
" का ? असं काय झालं ? " माझी उत्कंठा शिगेला पोहोचली.
" मी तिला काही विचारायच्या आतच , तिच्या सोबतच्या मैत्रिणीने बरोबर आणलेल्या मुलाची कॉलर पकडून त्याच्या एक कानाखाली लावून दिली आणि म्हणाली , बोल , का केला होतास ह्यांना फोन ? "
" काय ? तोच मुलगा होता ज्याने तुला फोन केला होता ? " शरदने आश्चर्याने विचारलं . , " अरे , मग एक ठेऊन द्यायची ना "
" अरे आधी मला तेच वाटत होतं . पण नंतर त्याची दया आली मला . तिच्या बरोबरच्या मैत्रिणीने माझ्या समोर तुडवला त्याला . तो सॉरी ताई , सॉरी ताई , परत असं होणार नाही ताई , म्हणत हात जोडून विनवण्या करू लागला . ताई ताई चा जप चालला होता त्याचा ... " तो हसत हसत सांगत होता .
" काय ? आयला भारीच ! पण त्याला विचारायचं ना की त्याने असा फोन का केला होता तुला . " मी म्हणालो .
" एकतर्फी प्रेम रे ... असाच लल्लू पोरगा होता तो , छपरी ... त्यांच्या कॉलेज मध्ये होता . त्यांच्याच वर्गातला . सुनीता तर त्याला फक्त चेहऱ्याने ओळखायची . तिनेच मला सांगितलं की , ह्याच मुलाने कॉलेजला असताना रोज डे च्या दिवशी तिला प्रपोज केलं होतं , आणि ती नाही म्हणाली होती . त्यानंतर आमचं लग्न ठरल्यावर सुद्धा एकदा भेटला होता . त्या वेळी सुद्धा तिने त्याला स्पष्ट नकार दिला . पण नंतर मी जेव्हा तिला मला आलेल्या फोनबद्दल सांगितलं तेव्हा तिला ह्याचाच संशय आला . आणि तिने हा प्रत्यक्ष कृतिदिन केला . " भरत सांगत होता .
" अरे , पण ही काय पद्धत झाली ? तुझ्यासमोर त्या पोराला आणून मारण्याची ! " मला त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं .
" मलाही आधी तसंच वाटलं . मग तिनेच ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला , की हा प्रकार तिच्या लक्षात आल्यावर तिला त्या मुलाचा खूप राग आला होता आणि असा फोन आल्यानंतर मीच काय तर दुसरा कोणताही मुलगा तिच्या नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का ? कोणाचाही गैरसमज होणारच ना ... म्हणून मग तिने तिच्या कराटे चॅम्पियन मैत्रिणीच्या मदतीने त्याला माझ्या समोर आणला आणि माझ्या समोरच त्याला ठोकला . नंतर तो मुलगा माझ्याच पाया पडायला लागला , म्हणाला चूक झाली आता मी परत असं कधीच करणार नाही ... माफ करा वगैरे ... " भरत हातवारे करत सांगत होता .
" आयला , काय बोलावं तेच कळेना . " शरद माझ्याकडे बघत म्हणाला . मीही त्याला दुजोरा दिला . कारण असा विचार आणि कृती मुली करू शकतात हेच थोडं शॉकिंग होतं आमच्यासाठी .
" तुमचं सोडा , मी तिथेच होतो , मलाच सुचत नव्हतं काहीही . पण नंतर मग मलाच मध्ये पडून तिच्या मैत्रिणीला थांबवावं लागलं आणि त्या मुलाची सुटका करावी लागली . तो मुलगा गेल्यावर तिची मैत्रीण म्हणाली , सुनीता खूप चांगली मुलगी आहे , आणि तिचं तसं काही नाही . तुमचा गैरसमज दूर व्हावा म्हणून आम्हाला हे करावं लागलं . " भरत म्हणाला .
" भारीच आहे हे ! पण हे सगळं करायची आयडिया सुनीता वहिनींची होती का ? " मी विचारलं त्यावर भरतने होकारार्थी मान डोलावली. मी आणि शरद एकमेकांच्या तोंडाकडे बघत उभे राहिलो .
" भरत , तुला सांगतो एक नंबर मुलगी मिळाली आहे तुला . सुनीता भाभीला बरोब्बर कळलं की ह्या परिस्थितीत नक्की काय करायला पाहिजे ... तिने हे केलं नसतं तर तुझ्या मनात कुठेतरी शंका राहिलीच असती . कदाचित ह्या फालतू कारणामुळे तुमचं लग्न मोडलं असतं , आणि समजा लग्न झालंही असतं तरी तूझ्या मनात कायम एक शंका राहिलीच असती . हा सगळा विचार सुनीता भाभीने केला आणि तिने हे पाऊल उचललं ... हॅट्स ऑफ यार ! " शरद सॅल्युट करत म्हणाला . मलाही ते पटलं . शंकेचा किडा एकदा मनात शिरला की माणसाचं आयुष्य उध्वस्त व्हायला फार वेळ लागत नाही . आणि आजकालच्या परिस्थितीत मुलींनी पण थोडं कणखर व्हायला हवं , म्हणजे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना असंच ठोकता येईल असा एक विचार मनाला चाटून गेला . पण काहीही म्हणा , धमाल किस्सा घडला हा . त्याचा हा किस्सा ऐकताना कुर्ला कधी आलं कळालंच नाही . दोघेही , शरद आणि भरत समोरच्यांना धक्का बुक्की करत , आरडाओरडा करत दोघे उतरले .
" ये दोनो क्या सोये थे क्या ? " नायर अंकल झोपेतून जागे होत म्हणाले . शरद भरतच्या आरडाओरड्यामुळे त्यांची झोपमोड झाली होती .
" जाने दो नायरजी , बहुत दिन के बाद ऐसा शोरगुल हुआ है ... और थोडा अच्छा भी लग राहा है । " बाहेर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जाणाऱ्या शरद - भरत जोडीला बघून भडकमकर म्हणाले . आमची लोकल हॉर्न देऊन पुढे निघाली . मी भायखळ्याला उतरलो आणि तिथेच अवंतीची वाट बघत उभा राहीलो . आता मला कुणापासून काहीच लपवायचं नव्हतं . अवंती आली तिचं सुंदर स्मित बघून मला एकदम हवेत तरंगल्यासारखं वाटू लागलं . मग आम्ही दोघे मिळून आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो .
" क्या दीदी , बहुत दिनसे आप लोग आये नहीं .... " वेटर विचारत होता .
" दो तीन दिन पेहले ही तो आये थे ... आप नहीं थे शायद . आपका पैर कैसा है …? " अवंतीने आस्थेने चौकशी केली आणि तो वेटर आनंदून गेला .
" भारीच आहेस तू ... " मी तिला म्हणालो .
" त्यात काय ... लोकांची साधी विचारपूस केली तरी त्यांना बरं वाटतं . आपला काय तोटा आहे त्यात ? " मी समजुतीने मान हलवली . " आणि आज काय चालू होतं रे तुमचं ? तुमच्या ग्रुपचे लोक गाणं का गात होते ? तुला चिडवत होते की काय ? "
" हो , कालच्या आमच्या पार्टीत मी आमच्या ग्रुपला सगळं सांगून टाकलं ." मी म्हणालो .
" सगळं म्हणजे ? काय सांगितलंस तू ? " ती प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघू लागली .
" सगळं म्हणजे सगळंच ! तू मला आवडतेस , आपलं एकमेकांवर प्रेम आहे , आणि आपण लग्न करणार आहोत वगैरे वगैरे " मी म्हणालो त्यावर ती थोडी गंभीर झाली . " काय गं ? काय झालं ? "
" अरे काल आणखी एक स्थळ आलं होतं माझ्यासाठी . मला न सांगताच ह्यांनी कार्यक्रम ठेवला होता . असा वैताग आला म्हणून सांगू . " ती चिडून म्हणाली .
" मग ? "
" मग काय ? बघितलं स्थळ . चांगला होता मुलगा . गव्हर्नमेंट जॉब होता त्याला ."
" अरे वा ! मस्तच की मग . " मी तिला चिडवायच्या हेतूने म्हणालो .
" काय यार मधू ! थोडासा सिरीयस हो ना जरा ... " ती वैतागली .
" अरे , मी सिरीयसच आहे . " तिचा चेहरा बघून मला गंमत वाटली . त्यावर ती काही बोलली नाही . चहा पित एकटक कुठेतरी शून्यात बघत राहिली . ती अशी वागायला लागली की मला भीतीच वाटते . तिच्या सुपीक डोक्यात काहीतरी शिजत असावं असा मला संशय आला . आणि ते खरंच होतं .
" ठरलं तर मग ! " थोड्या वेळातच ती निर्धाराने म्हणाली .
" ठरलं ? काय ठरलं ? " माझ्या पोटात भीतीने मोठा गोळा आला .
" फायनलच आता ... एकदम फायनल " तिचा निर्धार आणखी पक्का झाला.
" अगं बाई , काय फायनल ? काय ठरलं ? "
" तू पुढच्या आठवड्यात आमच्या घरी येतोयस .मला बघायला " तिचं हे बोलणं ऐकलं आणि तो संबंध कॅफे माझ्याभोवती गरगर फिरतोय की काय असं मला वाटायला लागलं .
--- क्रमशः
सिझन २ - लोकल डायरी ८
https://milindmahangade.blogspot.com/2019/10/blog-post_24.html सिझन २ -लोकल डायरी १
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
सिझन २ - लोकल डायरी ८
आज महिन्याचा चौथा शनिवार होता , शरदची पार्टी होती आज . मला सुट्टी होती , तशी मला जाग सकाळी सहा वाजताच आली पण, मी मस्त आठ - साडे आठपर्यंत लोळत पडलो होतो . माणसाचं मन एक विचित्र गोष्ट आहे . जेव्हा ऑफिस असतं तेव्हा झोप इतकी येते की काही विचारू नका , आणि सुट्टीच्या दिवशी काहीही न करता सकाळी सहा वाजताच टक्क जाग ! एक वेगळाच उत्साह असतो सुट्टीच्या दिवशी सकाळी ... आणि तसंही कालच्या अवंतीच्या भेटीमुळे तर मला रात्री झोप आलीच नाही . आम्ही मस्त भटकलो दिवसभर .... जीवाची मुंबई करणे म्हणजे काय ते आम्ही काल केलं होतं , खऱ्या अर्थाने ! एक प्रकारची धुंदी चढली होती ती अजूनही उतरली नव्हती . ती उत्कटता या पूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती . छे , पण आता दोन दिवस ती काही दिसणार नाही . आयुष्यात पहिल्यांदाच मला सुट्ट्यांचा कंटाळा आला होता . तरी बरं आज संध्याकाळी शरदच्या जुन्या घरी त्याची बॅचलर्स पार्टी होती . त्यामुळे आमची लोकलची सगळी मंडळी भेटणार होती . मी संध्याकाळ व्हायची वाट बघत बसलो . सुट्टीच्या दिवशी सोफ्यावर पडून टीव्ही बघण्यात जो आनंद असतो तो अगदी इंद्राच्या सिंहासनावर बसण्यात सुद्धा नसेल . टीव्ही बघता बघता मला कधी झोप लागली कळलंच नाही .
दुपारी अर्धवट झोपेत असताना माझा फोन वाजला . आधी तर वाटलं की स्वप्नात टीव्ही मधलंच काहीतरी वाजतंय . मग लक्षात आलं तसा फोन बघितला तर सावंतांचा फोन . माझी झोपच उडाली .
" हॅलो , बोला सावंत ... अहो , आहात कुठे ? दोन तीन दिवस झाले लोकलला आला नाहीत . आणि फोन पण स्विच ऑफ होता तुमचा .... " मी घाईघाईत म्हणालो .
" अरे , हो ... जरा बिझी होतो . मला सांग ... शरदची पार्टी किती वाजता आहे ? " पलीकडून त्यांनी विचारलं .
" संध्याकाळी सात नंतर चालू होणार , त्याच्या जुन्या घरी . रात्रभर आहे पार्टी. तुम्ही आहात ना ? "
" हो , मी येणार आहे , पण जरा उशिरा येईन ... " सावंत म्हणाले .
" का हो ? काही काम आहे का ? काही प्रॉब्लेम ? " मला जरा शंका आली .
" नाही रे ... मी येतो , दहा वाजेपर्यंत ... ओक्के ... चल बाय " म्हणत त्यांनी फोन कट केला . मला त्यांच्याशी बोलायचं होतं . काहीतरी आहे जे ते त्यांनी सांगितलं नाही असं मला एकूणच त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं . पण सावंत काही असेल तर कधीतरी सांगतीलच . मग मी शरदला फोन केला . तो गडबडीत होता. पार्टीची तयारी करण्यात गुंतला होता . मी त्याला काही मदत करू का म्हणून विचारलं तर नको म्हणाला . बॅचलर्स पार्टी द्यायची म्हणून शरद खुशीत दिसत होता.
मी संध्याकाळी साडे सात वाजता आमच्या पार्टीच्या ठिकाणी पोहोचलो . एका जुन्या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर शरदचं जुनं घर होतं . सध्या तिथे कोणीच राहत नसल्याने घर झाडून घेऊन त्यावर बसण्याची वगैरे व्यवस्था शरदने केली होती . घर बंद असल्याने एक विचित्रसा कोंदट वास येतो , पण तसं काही वाटत नव्हतं , शरदने फवारलेल्या रूम फ्रेशनरमुळे मस्त प्रसन्न वाटत होतं . मोबाईलला स्पीकर लावून किशोरची गाणी लावली होती . प्रखर ट्युबलाईट न लावता हॉल मध्ये छताला मधोमध असलेलं झुंबर लावलं होतं. त्यातून मस्तसा अंधुक आणि पिवळसर प्रकाश पाझरत होता .
" यार शरद , काय माहोल केलाय .... एक नंबर ! " हे सर्व बघूनच मी खुश झालो होतो . त्यावर तो गालातल्या गालात हसला .
आमचे एकेक मेम्बर हळूहळू जमा होऊ लागले . शरद अगदी यजमानाच्या थाटात सगळ्यांचं स्वागत करत होता. आणि लग्नात जसं वेलकम ड्रिंक देतात तसं ज्याला जसा हवा तसा रमचा पेग किंवा बिअर देत होता . आमच्यात भडकमकर , नायर अंकल आणि सावंत हेच रम पिणारे , बाकीचे आम्ही बिअरवाले ... त्यात नायर अंकल शनिवार असल्यामुळे लगेच पिणार नव्हते . रात्रीचे बारा वाजल्यानंतर त्यांचं सेशन सुरू होणार होतं , तोपर्यंत बाकीच्या किती लोकांचे टांगे पलटी व्हायचे देव जाणे .... सर्वजण जमले , भरत , आधी नाही म्हणणारा जिग्नेससुद्धा वेळेवर आला होता . आणि तो थोडा खुश सुद्धा दिसत होता . आता फक्त सावंत राहिले होते . ते उशिरा येणार असल्याचं मी सगळ्यांना सांगितलं . मग सगळ्यांनी आपापले ग्लास , आणि बिअरचे टिन वर उचलले ... नायर अंकलही थंप्स अपचा ग्लास उंच करून म्हणाले ., " अपना शरद का बॅचलर्स पार्टी है , इसिलीये सबको चिअर्स " करून सर्वांनी चिअर्स केलं . आणि ग्लास तोंडाला लावले . बिअरचा तो पहिला घोट ! थंडगार गोळा घशाखाली गेल्यासारखा वाटला . चखण्यासाठी व्हेज मध्ये शेव , चना डाळ , चकली , पापड , आणि नॉनव्हेज मध्ये चिकन बंजारा कबाब , लॉलीपॉप , चिकन चिली ... असं बरंच काही होतं. सगळे गोल बसले . मधोमध सगळे खाण्याचे पदार्थ ठेवलेले होते . ज्याला जे हवं ते खा ... हळूहळू आमची पार्टी आता रंगात येऊ लागली .
" वा ! आत्ता कुठे मजा आला .... " भडकमकर म्हणाले . वेलकम पेग प्यायल्यानंतर जो तो आपापली ग्लास भरून घेऊ लागला . जिग्नेसचा पहिला बिअरचा टिन सगळ्यात आधी संपला . त्याने लगेच दुसरा टिन फोडला सुद्धा !
" अरे , मधु एक माणूस फक्त खायला येणार होता ना ? आता तर टिन वर टिन फोडायला लागलाय ... " शरदने टोमणा मारला . तो टोमणा आपल्याला मारलाय हे त्या महाशयांच्या ध्यानीही नव्हतं . तो आपला चिकन लॉलीपॉप मधला मोठा लॉलीपॉप कोणता ते शोधत होता .
" जाऊ दे रे ... आत्ताशी कुठे नॉर्मल झालाय ... " मी त्याला म्हणालो . त्यावर शरदने कोपरापासून हात जोडले . माझा पहिला टिन संपत आला होता आणि हलकी हलकी किकही बसू लागली होती . नायर अंकल चकली आणि ग्रीन चटणी खात बसले होते . भडकमकरांनी त्यांच्यासाठी पेग बनवला पण त्यांनी नकार दिला आणि घड्याळ दाखवलं . भरत मात्र हळूहळू आपली बिअर पीत होता . त्या फोन प्रकरणामुळे तोही थोडासा चिंतेत होता . थोडा वेळ गप्पा गोष्टी करण्यात गेला अन दारावरची बेल वाजली. मी घड्याळात बघितलं साडे नऊ वाजले होते. ह्या वेळी कोण असेल ?
" सावंत आले बहुतेक .... " म्हणत शरद दार उघडण्यासाठी उठला . खरोखरच सावंत होते . मला त्यांना बघून खूप आनंद झाला . ते दिसल्यावर सर्व जण एकत्रित ओरडले . ही मंडळीना थोडी थोडी चढल्याची खूण होती . जो तो जाऊन सावंतांना मिठ्या मारू लागला . तेही समजूतदारपणे सगळ्यांना आलिंगन देऊ लागले . शरदने लगेच त्यांच्यासाठी रमचा छानसा पेग बनवला . आणि त्यांच्या हातात दिला . मग परत सगळे त्यांना चिअर्स करायला लागले .
" तुम्ही उशिरा का आलात ? काही काम होतं का ? " मी त्यांना बाजूला घेत विचारलं .
" हो , थोडं काम होतं ... बाकी सगळे हवेत दिसतायत ... " ते बाकीच्यांकडे बघत म्हणाले .
" भडकमकारांचे तीन चार पेग झालेत , जिग्नेसचा तिसरा टिन चालू आहे ... शरद भरत आपले त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने पितायत . तुम्हीच उशिरा आलात ... " मी म्हणालो .
" हो रे ... आणि आता थोड्या वेळाने परत जायचं आहे ? अर्जंट काम आहे " सावंत हळू आवाजात म्हणाले .
" काय ? म्हणजे तुम्ही रात्री राहणार नाही ? काय सावंत ? एकतर उशिरा आलात ... आणि आता लगेच निघताय ? " मी म्हणालो .
" जरा हळू बोल ... मला जावंच लागेल ... तुला नंतर सांगेन ... आता इथे नको " ते दबक्या आवाजात म्हणाले . मग आम्ही सगळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत निवांत पीत बसलो . माझा दुसरा टिन संपला होता . आणि मस्त हलकं हलकं वाटत होतं. किंचित आळसावल्यासारखं वाटत होतं , आणि त्या विचित्र परिस्थितीत आतून हसूही येत होतं .
" अरे शरद , आपले घावणे आणि भेजा फ्राय कुठे आहेत ? विसरला काय ? " भडकमकरांनी विचारलं , दारुड्या लोकांचा जसा बोलण्याचा टोन असतो तसा त्यांचा झाला होता .
" बास काय , असा कसा विसरेन ? म्हणत त्याने डब्यात भरून आणलेले घावणे काढले आणि भेजा फ्रायचं पॅकेट उघडलं. सर्वांनी आपापले ग्लास बाजूला ठेवले आणि त्यावर ताव मारला . मन तृप्त होईपर्यंत घावणे आणि भेजा फ्राय खाल्ला ...
" वा ! आत्ता कुठे मजा आला .... " भडकमकर म्हणाले . त्यांचं हे पालुपदच झालं होतं . दर दहा - पंधरा मिनिटांनी ते हे वाक्य उच्चारायचे आणि ग्लास रिकामा करायचे . भरत मात्र शांत बसून होता . त्याचा पहिला टिन सुद्धा अजून संपला नव्हता .
" काय भरतभाई ? काय झालं ? " मी त्याला विचारलं . त्यावर त्याने काही नाही अशी मान डोलावली .
" त्याला टेन्शन आलंय बहुतेक ... सोड यार ... काही होणार नाही . भरत , तू उगाच टेन्शन घेतोय . " शरद म्हणाला . त्यावर त्याने नुसती मान डोलावली . प्यायच्या बाबतीत जिग्नेसही मागे नव्हता . तो मजेत दिसत होता . मला त्याची गंमत करायची इच्छा झाली .
" जिग्नेस , आजकल तू खुश दिख राहा है । क्या बात है ? " मी विचारलं त्यावर तारवटलेले डोळ्यांनी बघत तो फक्त खुदकन हसला आणि बिअरचा टिन तोंडाला लावला .
" हा रे ! ... क्या बात है बे ? " शरदही त्याला विचारू लागला .
" त्या फोनवाल्या मुलीशी भांडण झाल्यापासून त्याच्या वागण्यात फरक पडलाय " सावंत म्हणाले . त्यावरही तो काहीही न बोलता नुसता हसला . मग आम्ही सगळे त्याला चिडवू लागलो . आरडाओरडा खूप व्हायला लागला तसा शरदने आम्हाला शु sss शु sss करून शांत केलं .
" आणि मधुचं पण काय चालू आहे आम्हाला माहीत आहे ... " शरदच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव दाटले होते . हे माझ्यावर कसे घसरले ? कसाऱ्याला जाणारी लोकल एकदम कर्जतला कशी काय निघाली .
" मधूका ? मधूका क्या चालू है ? " नायर अंकलनी चणा डाळ तोंडात टाकीत आश्चर्याने विचारलं .
" अरे अंकल , पक्का छुपा रुस्तम है ... " शरद म्हणाला त्यावर सगळेजण माझ्याकडे अविश्वासाने पाहू लागले . त्या एकाच सेकंदात मी ठरवलं की हीच वेळ आहे ह्या सगळ्यांना खरं सांगायची ... तसंही सर्वजण नशेत आहेत . आणि मीही थोडा हाय आहेच !
" थांबा ... " मी धडपडत उभा राहिलो ." मी तुम्हाला सांगणारच होतो . आपल्या लोकलला एक मुलगी येते , अवंती तिचं नाव . मला ती आवडायची आणि मी तिला प्रपोज केलं ... ती हो म्हणाली . मी ठरवलं आहे की तिच्याशीच लग्न करायचं ... " त्यावर सगळ्यांनी आरडाओरडा करीत एकदम टाळ्या वाजवल्या . सावंत हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते .
" ये हुई ना बात ! चलो फिर अवंती भाभी को फोन लागाया जाय ... " इतका वेळ शांत बसलेला जिग्नेस बोलून बसला आणि आमच्या मंडळींनी तो धागा पकडला .सगळे माझ्या मागे लागले की तिला फोन कर म्हणून .... हे काहीतरी वेगळंच घडत होतं. आता रात्रीचे बारा वाजत आलेत आणि ह्यावेळी तिला फोन करायचा म्हणजे ? मला एकदम भीती वाटली . ह्या सगळ्या बेवड्यांचं काही खरं नाही ... प्यायलानंतर काहीही करतील . पण सावंतांनी परस्पर त्यांना झापलं , नायर अंकलही नको म्हणाले आणि मी वाचलो . थोड्या वेळाने बारा वाजले आणि नायर अंकल त्यांचा रमचा पेग घेऊन तयार झाले .मग पुन्हा सगळ्यांनी त्यांना चिअर्स केलं आणि पुन्हा कार्यक्रम सुरू ... मी माझा तिसरा टिन संपवत आणला होता . मला मस्त तरंगल्यासारखं वाटत होतं . मी मस्तपैकी अंग सैल सोडून आणि पाय पसरून बसलो . आमची बाकीची मंडळी आपापले ग्लास रिचवत , चखणा खात गप्पा मारत होती. मी मोबाईलवरची किशोरची गाणी ऐकू लागलो . इतका वेळ ती चालू होती पण माझं लक्ष गेलं नाही . आता शांतपणे ऐकू लागलो . गोलमाल फिल्म मधलं , " आनेवाला पल जाने वाला है । " लागलं . हात मागे डोक्याशी धरून उशीला रेलून मागे बसलो आणि डोळे मिटून ते गाणं ऐकू लागलो . मस्त वाटत होतं. धुंद वातावरण , मित्रांची सोबत , बिअर आणि किशोरची गाणी ! परफेक्ट कॉम्बिनेशन . मी डोळे मिटून गाणी ऐकत असताना गोल गोल फिरत एका अंधाऱ्या पोकळीत पडतोय की काय असं वाटलं आणि लगेच डोळे उघडले . तसे मी दोन टिनच्या वर पीत नाही. पण आज तीन झाले . त्यामुळे आजूबाजूची सारी दुनिया माझ्याभोवती फिरतेय की काय असं वाटत होतं . अचानक मला कुठून तरी ओकण्याचे आवाज यायला लागले . अरे देवा ! माझे कान वाजायला लागलेत की काय ? मी डोळे उघडले आणि बघतोय तर शरद जिग्नेसला बाथरूम मधून धरून घेऊन येत होता . म्हणजे जिग्नेसचा ' वकार युनूस ' झाला होता तर ! मी आजूबाजूला पाहिलं तर बरेच जण धारातीर्थी पडले होते . भडकमकर , जिग्नेस आडवे झाले होते . नायर अंकलही त्यांचे लिमिटेड तीन पेग पिऊन शांतपणे खुर्चीत विसावले होते . शरद , भरत त्यांची शेवटची लढाई लढत होते . सावंत मात्र कुठे दिसत नव्हते . ते कदाचित निघून गेले असतील . का ते त्यांनी सांगितलं नाही . पण काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय ते जाणार नाहीत . विचार करता करता अचानक मला अवंतीची आठवण झाली .... खुप प्रकर्षाने . वाटलं तिला आता फोन करावा . पण रात्रीचे दीड वाजले होते . अचानक माझी बोटे व्हॉट्सऍप कडे वळली आणि काही कळायच्या आत तिला love you चा मेसेज गेला सुद्धा . वाटलं परत काही प्रॉब्लेम झाला तर ? तेवढ्यात माझ्यातली बिअर म्हणाली , हॅट , होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते ! तिच्या आज्जूडी बिज्जूडीला बघून घेऊ . आपण नाय घाबरत बेन स्टोक्स ! थोड्या वेळाने माझ्या फोनचा मेसेज टोन वाजला , मी पाहिलं तर अवंतीचा मेसेज होता Love you tooooo ...😘
-- क्रमशः
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९
सिझन २ - लोकल डायरी ७
सिझन २ - लोकल डायरी ७
आज सकाळपासून नुसता गोंधळच चालू आहे की काय असं वाटत होतं , नव्हे कालपासूनच ! काल भरतने आमच्या सांगण्यानुसार सुनीता भाभीला फोन केला आणि चांगलाच गोंधळ झाला . असं कसं होईल ? प्रेमदूताचं भाकीत खोटं कसं ठरेल ? पुढच्या आठवड्यात तो तिला भेटायला जाणार होता . खरं तर तो जाणारच नव्हता ., म्हणाला मी लग्न मोडतो म्हणून ! कसंबसं त्याला समजावलं तेव्हा कुठे तो तयार झाला . सकाळपासून त्याचाच विचार डोक्यात होता . विचारांच्या गोंधळात आईने डबा तयार करून टेबलावर ठेवला होता तो घाईघाईत घ्यायचाच विसरलो . रस्त्यावर पण गाड्यांचा नुसता कलकलाट चालू होता . स्टेशनलगतच्या रस्त्यावर सकाळी सकाळी दोन गाड्या एकमेकांना घासल्या आणि दोन्ही वाहनचालक एकमेकांवर शब्दांचे बाण सोडत भर रस्त्यात एकमेकांसमोर उभे ठाकले, आणि जणू काही त्यांना चिअर करायला त्यांच्या मागच्या बाजुला अडकलेल्या गाड्या न थांबता , सतत पॅ .... पॅ .... हॉर्न वाजवत होत्या. बालवाडीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी जसं सगळीच मुलं एकदम रडून गोंगाट करतात तसं काहीसं त्या रस्त्यावर मला वाटू लागलं . गर्दी झालेल्या गाड्यांच्या मधून कशीबशी वाट काढत मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा गाडी आधीच प्लॅटफॉर्मला लागली होती . मी चालत येत असताना ती जिग्नेसशी भांडणारी फोनवाली मुलगी माझ्या समोरच घाईघाईने चालली होती . तिच्या कानाला फोन चिकटलेलाच होता आणि ती कुणाशी तर बोलत होती . मी सहज तिचं बोलणं ऐकलं तर ती पलीकडच्या तिच्या मैत्रिणीला सांगत होती की , " वो चष्मेवाला लडका मेरेको क्युट लागता है । और उसका चेहरा देखतेही उसे छेडने का मन करता है । " अरे वा ! म्हणजे प्रगती आहे तर ! जिग्नेस मात्र तिच्यावर चिडला असेल . त्याला विनाकारण सॉरी म्हणावं लागल्यामुळे ... पण त्याच्याही वागण्यात थोडासा फरक मला जाणवला होता . तो आजकाल आमची गाडी डाऊन करायची सोडून त्या नंतरची येणारी कर्जत लोकल पकडून मागे येत असे . त्याला खरंच उशीर होतो की तो ठरवून असं करतो हे मात्र माहीत नाही . ह्याचा शोध घ्यावा लागेल . मी आमच्या डब्यात शिरलो . डोअरवरच्या रवीशी शेकहँड केलं आणि आत आलो . सगळ्यांशी नमस्कार चमत्कार झाले आणि आज आश्चर्य म्हणजे अवंती लवकर आली होती . नेहमी ती गाडी सुटण्याच्या वेळेत धावत पळत येते . आमचेही सगळे मेम्बर आले होते फक्त जिग्नेस सोडून . हा पठ्ठ्या आजही कर्जत गाडीने येईल की काय ? असा विचार करीत असता , तसंच झालं . तो पलीकडच्या कर्जत लोकलमधून उतरून आमच्या लोकलकडे येत होता आणि येताना इकडे तिकडे बघत होता , जणूकाही तो कुणाला तरी शोधत असावा . हा नक्कीच त्या फोनवाल्या मुलीला शोधत असणार , पण आज त्याची निराशा झालेली दिसली. त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं . मला त्याची गंमत वाटली . पण त्याचबरोबर एक शंका मनात आली , की जिग्नेसबाबत प्रेमदूताने सांगितलेलं सगळं तसंच घडत होतं . पण भरतच्या बाबतीत असं का व्हावं ? पुढच्या आठवड्यात तो तिला भेटणार जाणार आहे . बघू काय होतंय ते .... मी आमच्या ग्रुपवरून एक नजर टाकली , काहीतरी कमी होती . सावंत ! ते काल , परवा सुद्धा लोकलला आले नव्हते ., आणि आजही आले नाहीत .
" शरद , सावंत आले नाहीत का ? " मी विचारलं .
" हो रे , दोन तीन दिवस दिसले नाहीत . थांब फोन करतो ." म्हणत त्याने फोन लावला देखील . " फोन स्विच ऑफ येतोय रे ... तू लावून बघ " मी फोन लावला तरी तेच . मला थोडी काळजी वाटली , कारण सावंत त्यांचा फोन कधीच बंद ठेवत नसत . बाकी कुणाला विचारून फायदा नाही , कारण कुणालाच माहीत नसणार.
लोकल आज वेळेत निघाली , पण आज नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती . खास करून पलीकडे लेडीज डब्यात ! आज सुरुवातीपासूनच लेडीज डब्यात गोंधळ चालू होता . तसा रोज असतो , पण आज जरा जास्तच होता . आमची लोकल कल्याणपर्यंत आली आणि आणखी गर्दी वाढली . कल्याणला एक जाडी मुलगी आजूबाजूच्या बायकांना रेटत आत शिरली . ती आल्यानंतर तर लेडीज डब्यात गदारोळ माजला . ढकला ढकली , बोंबाबोंब , चिडाचीड एकदमच !
" आयला , आज जास्तच गर्दी झालीय रे ? " शरद पलीकडे नजर टाकत म्हणाला .
" त्या जाड्या मुलींमुळे तर जास्तच चेंगराचेंगरी झालीय . " मी म्हणालो .
" त्या जाडीमुळे तिच्या समोरची तर चेंबली गेलीय फुल्ल ! गुदमरून मरेल बहुतेक ! " शरद गमतीत म्हणाला , त्या जाड्या मुलीला काही फरक पडत नव्हता . ती निवांत समोरच्या बाईवर आपला भार टाकून उभी होती . तिच्या समोरच्या बाईने चुळबुळ करायचे काही निष्फळ प्रयत्न केले पण तिला काही हालता येईना .
" उपर पकड ना ... पुरा मेरे आंग पर आ रही है । " त्या बाईंनी हिंदी - मराठीची मिसळ करून मागच्या जाड्या मुलीला टोकलं . पण ती जराही हलली नाही . " कसली जाडी आहे ही .... जराही हलत नाही " त्या बाई वैतागून म्हणाल्या .
" ओ हॅलो , आय एम नॉट इटिंग युअर फादर्स फूड ....हाऊ डेअर यु टू कॉल मी जाडी .... " त्या जाड्या मुलीने ' तुझ्या बापाचं खात नाही ' चा केलेला स्वैर अनुवाद मात्र सगळ्यांना आवडला . आमच्या डब्यात लहानसा हशा पिकला . मग मात्र त्या बाईची आणि त्या जाड्या मुलीची चांगलीच जुंपली . आमचा चांगला टाईमपास झाला . असं काहीतरी भांडणं , मारामाऱ्या , शिवीगाळ , दोन चार दिवसातून होतंच असतात . अवंतीही एअरफोन काढून त्यांचं भांडण बघत बसली. आज तिने पांढऱ्या रंगाचा सलवार आणि कुर्ता घातला होता , आणि त्यावर रंगीबेरंगी ओढणी . मस्त दिसत होती ती आज . मी तिच्याकडे बघत असतानाच कदाचित काहीतरी झालं असावं तिने थेट माझ्याकडे पाहिलं . टेलिपॅथी म्हणतात ती हीच काय ? तिचे डोळे मिश्किलपणे चमकले . भायखळा आलं आणि आम्ही दोघे आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो.
" आज काय गोंधळ चालू होता तुमच्या डब्यात ? " चहाचा घट घेता घेता मी विचारलं .
" हो ना , चांगलीच भांडणं सुरू होती . त्या जाड्या मुलींमुळे सगळं झालं ." अवंती म्हणाली .
" तिचा डायलॉग पण भारीच होता .... आमच्याकडे सगळे हसत होते "
" आमच्याकडे नेहमीच असा गोंधळ असतो . तुला सांगते , जेन्ट्स डब्यात एकवेळ जागा मिळेल पण आमच्या डब्यात ? नो वे .... "
" तुझी झालेत का अशी भांडणं कधी ? " मी गमतीत विचारलं .
" मुळात मला भांडायला आवडत नाही ... पण कोणी जर मुद्दाम करत असेल तर मी त्याला उत्तर दिल्याशिवाय राहात नाही " म्हणत तिने बन पावाचा तुकडा मोडला .
" वा ! आणि माझ्याशी भांडलीस ते ? मी तर काहीच केलं नव्हतं .... "
" मी भांडले ? कधी रे ? "
" आपली सुरुवात भांडणाने झाली होती हे विसरलीस की काय तू ? "
" ओह ... ते होय ... ते मी वेगळ्या टेन्शनमध्ये होते ... आणि तू माझ्याकडे बघत होतास ... मला वाटलं हा कोण मवाली माझ्याकडे एकटक बघतोय ? मला राग आला म्हणून बोलले . " तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव दाटले होते .
" मवाली ? मी मवाली …? काय यार तुझं चाललंय ? " ती खुदुखुदु हसत होती . मी असं म्हणत असतानाच तिचा फोन वाजला .
" एक मिनिट ... एक मिनिट ... ऑफिसचा फोन आहे " म्हणत तिने फोन घेतला , " हां , बोल तेजु ? हा .... हा ... काय ? मग आता ? ..... आणि सर ?.... अरे वा ! .... ठीक आहे ... ठीक आहे .... चाल बाय ... "
" काय ग ? काय झालं ? " तिचा खुललेला चेहरा पाहून मी विचारलं .
" अरे , काही नाही . आज आम्हाला बाहेर एका साईटवर जायचं होतं ते कॅन्सल झालं . आणि आमचे सर दुसऱ्या एका कामासाठी बाहेर गेलेत , त्यामुळे आज मला सुट्टी ! " ती ओरडत म्हणाली .
" अरे वा ! मजा आहे ! मग आता तू काय परत जाणार घरी ? "
" हो ... आता ऑफिसला सुद्धा कोणी नाही ... पण घरी जाऊन पण बोअर होईन ... आयडिया ! आपण दोघे जाऊया फिरायला कुठेतरी ? " तिचे डोळे चमकले .
" काय ? आपण दोघे ? बाईसाहेब , तुम्हाला सुट्टी असली तरी मला मात्र नाही ... आमचा बॉस आमची आतुरतेने वाट पाहत असेल "
" ए काय यार ... चाल ना ... प्लिज ... आपण कुठे बाहेर पण गेलो नाही , मस्त मारिन ड्राइव्हला जाऊ , एखादा पिक्चर टाकू ... काय बोलतो ? चल ना ... " ती एकदम हट्टाला पेटली .
" तू बरी आहेस ना ? मला ऑफिसला जायचंय ... खूप काम पडलंय ... " मी तिला टाळत म्हणालो .
" बास काय ... एका दिवसाने असा काय फरक पडणार आहे ... आणि डोन्ट टेल मी की तुला ऑफिसचं काम करायला फार आवडतं ... "
" तसं तुझं म्हणणं बरोबर आहे .... " मी विचारात पडलो. समोर एका बाजूला अवंतीसारखी सुंदर मुलगी बाहेर फिरायला चल म्हणतेय आणि दुसऱ्या बाजूला बॉसचे वटारलेले डोळे दिसत होते . अर्थात ऑफिसला जायची माझीही इच्छा नव्हतीच ! तशी कोणाची असते ?
" बघ , समजा तू आजारी पडला असतास तर काय ऑफिसला आला असतास का ? तुझ्या बॉसला सांग की तू आजारी आहेस . आणि असंही उद्या सुट्टी आहेच ... फोर्थ सॅटर्डे " तिने तोडगा काढला . एखादा मुद्दा गळी उतरवण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही आणि मलाही हा सुंदर स्रीहट्ट मोडवेना .
" थांब .... मला आधी फोन करू दे .... मग बघू " मी म्हणालो तशी ती आनंदाने किंचाळली ." अरे , जरा एक मिनिटं तर थांब ... फोन तरी करू दे ... " म्हणत मी थोडा बाजूला जाऊन आमच्या बॉसला फोन लावला . अगदी बारीक आवाजात बॉसला बरं नसल्याचं सांगितलं . मला वाटलं तो खेकसेल माझ्यावर , पण आश्चर्य म्हणजे आमचा बॉस काहीच म्हणाला नाही , वरून काळजी घे म्हणाला . हा धक्का तर मला सहनच होईना . त्याच तंद्रीत मी पुन्हा आमच्या टेबलपाशी आलो आणि तसाच बसलो .
" काय रे ? काय झालं ? चिडले का तुझे बॉस ? " अवंतीने काळजीत विचारलं .
" नाही गं ... उलट म्हणाला काळजी घे ! " मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो .
" काय ? येस ! अरे पण तू असा का चेहरा करून बसलायस ... चल उठ ! "म्हणत ती मला खेचूनच घेऊन गेली . मग मी पण ठरवलं , आज जीवाची मुंबई करूनच टाकू ! आम्ही लोकल पकडली आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं . फोर्टच्या रस्त्यावरून मन मानेल तिकडे फिरू लागलो . सध्या मेट्रोची कामे चालू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फुटपाथवरून दुसरे पर्यायी मार्ग काढले होते . फोर्टमधल्या फुटपाथवरच्या फेरीवाल्यांच्या विक्रीसाठी मांडलेल्या वस्तू , पुस्तके , कपडे बघत आम्ही भटकत राहिलो. फोर्टमधल्या बिल्डिंग्स बघत फिरणे ही सुद्धा एक मजा आहे . काही काही तर हेरिटेज बिल्डिंग्स जीर्णावस्थेत असून देखील दिमाखात उभ्या होत्या आणि तितक्याच देखण्या दिसत होत्या . एक वेगळीच फिलिंग येते ह्या भागात फिरताना , जी शब्दात मांडणे कठीण आहे . हुतात्मा चौकाजवळ आल्यावर आम्हाला तहान आणि भूक दोन्ही लागली . मग बाजूच्या सँडविचवाल्याकडे जाऊन चीज टोस्ट सँडविच आणि त्यालाच लागून असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर जाऊन उसाचा जम्बो ग्लास रिचवला तेव्हा कुठे बरं वाटलं. बाजूलाच जहांगीर आर्ट गॅलरी होती. फोर्टमध्ये जाऊन जहांगीर आर्ट गॅलरीत गेलं नाही तर पाप लागतं. जहांगीरची सगळी दालनं बघत निवांत बाहेर आलो . गेट वे ला डुलत डुलत चालत जाईपर्यंत दुपार उलटून गेली होती .
संध्याकाळ होत आली तेव्हा आम्ही मरीन ड्राईव्हवर चालत निघालो . समुद्राचा खारा वारा अंगावर घेत मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर आलो . समोर अथांग सागर पसरला होता . त्याच्या लाटा किनाऱ्यावर येऊन धडाका मारण्याचं काम अविरतपणे करत होत्या . मरीन ड्राईव्हवरचे किनाऱ्यावरचे ते सिमेंट काँक्रीटचे विशिष्ट त्रिकोणी दगड आपापल्या परीने त्या लाटांचे घाव झेलत त्यांना थोपवून धरताना दिसत होते . दूरवर समुद्रपक्षांचे थवे उडताना दिसत होते . त्या कठड्यावर बसून मला असं वाटलं की आम्ही दोन वेगवेगळ्या जगांच्या सीमारेषेवर बसलोय . माझ्या समोर अथकपणे घुसळणारा समुद्र... आणि माझ्यामागे अथकपणे चालणारी मुंबई ! दोघांनाही अंत नाही. समुद्रावर आल्यावर हे असेच काहीबाही विचार येत असतात. मी अवंतीकडे पाहिलं. ती दूरवर समुद्राकडे बघत होती . तिचे केस वाऱ्याबरोबर भुरूभुरू उडत होते . उडणाऱ्या बटा सावरण्यात तिचे दोन्ही हात गुंतले होते .
" मला समुद्र खुप आवडतो ... " ती समोरची नजर न हटवता म्हणाली . " इथं आलं ना की मस्त वाटतं . जगाच्या शेवटच्या टोकावर आपण आहोत असं वाटतं . " मला तिची गंमत वाटली . माझ्याही मनात असलेच काहीतरी विचार येत होते . समोर सूर्य अस्ताला जात होता . त्याचे लालबुंद प्रतिबिंब समोरच्या समुद्रावर पडले होते . आकाशही त्याच लाल केशरी रंगाने न्हाऊन निघाल्यासारखे वाटत होते .
" मस्त दिसतोय ना सूर्य ? " मी म्हणालो . त्यावर तिने हम्म करून प्रतिसाद दिला . मी एकवार आजूबाजूला नजर टाकली . आमच्या आजूबाजूला बरेच कपल्स बसले होते . जो तो आपल्या विश्वात मग्न होता . ह्या प्रचंड आणि अखंड चाललेल्या कोलाहलात प्रत्येक जण काही सुखाचे क्षण वेचण्यासाठी जणू आतुर झाला होता . माझा हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला . एक वेगळीच जाणीव झाली , एकाच वेळी दोघांनाही . आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं . इतक्यात एक मुजोर केसांची बट तिच्या चेहऱ्यावर आली . ती स्वतः ती बट दूर करणार इतक्यात मीच ती दूर केली. आम्ही दोघे एकमेकांकडे ओढले गेलो . ओठांवर ओठ टेकले आणि त्या प्रचंड कोलाहलात आम्ही दोघेही हरवून गेलो .
--- क्रमशः
गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९
चंद्रकला
चावडीजवळच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसात सगळे जमले होते . एरवी कधीही न येणारे मेंबरही आज न चुकता हजर झाले होते . रात्रीचे नऊ वाजत आले तरी कुणी जाईना . प्रश्नच तसा उभा राहिला होता. अशा प्रकारचा प्रसंग गावावर कधी येईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं . सगळे जण एका विचित्र तणावाखाली बसले होते . कोणाच्याही तोंडातून एक चकार शब्द निघत नव्हता . थोडंसं खाकरून पाटलांनी विचारलं , " आरं असं किती वेळ बसून ऱ्हायचं ? बोला की काहीतरी . "
" पाटील , एकच मार्ग हाय ... समूळ नाश ! " कोणीतरी म्हणालं . त्यावर पुन्हा सर्व सदस्यांमध्ये गडबड सुरू झाली .
" हे बघा , आपापसात बोलू नका , हा प्रसंगच इतका विचित्र आहे ... अशी वेळ आपल्या गावावर पहिल्यांदाच आलिया ... तवा सगळ्यांनी विचार करून काय करायचं ते ठरवा " ग्रामपंचायतीचे एक जुने सदस्य म्हणाले .
" बरं दुसरा पर्याय हाय का आपल्यासमोर ? " पाटलांनी विचारलं . तेव्हा कोणीच काही बोलेना . " ठीक आहे , मग कोण करील हे काम ? " त्यांनी विचारल्यावर लोक एकमेकांकडे बघू लागले . कोणीच पुढं येईना . इतक्यात खांद्यावर घोंगडी घेतलेला रघुजी रामोशी पुढं आला आणि म्हणाला , " पाटील , मी करतु हे काम . पन दाम बी तसंच मिळालं पायजेल "
" दाम तू मागशील ते ... काय मंडळी ? " पाटील म्हणाले त्यावर सगळ्यांनी त्यांना दुजोरा दिला आणि सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी रघुजीची पाठ थोपटली . " जा , काम फत्ते करून या " रघुजी आणि त्याचे साथीदार कामाला निघालेही . चंद्रकलेचा चेहरा पाटलांच्या डोळ्यांसमोर आला . आज गावकऱ्यांच्या आणि सगळ्या गावाच्या हितासाठी चंद्रकलेचा मुडदा पडणार होता .
वरच्या आळीत कोपऱ्यावर एका पडक्या वाड्यात चार खणाच्या पडवीवजा घरात चंद्रकला राहात होती . मध्यम वयाची , सावळीशी , कपाळावर बंद्या रुपयाएवढं कुंकू लावलेली चंद्रकला त्या घरात एकटीच राहायची . मुलबाळ नव्हतं आणि तिचा नवरा काही वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता . गावच्या पाटलांना सांगून चौकीवर नवरा हरवल्याची तक्रारही नोंदवली होती , पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही . आता तिचं ह्या जगात कोणीच उरलं नव्हतं . अगदी मितभाषी , आपण भलं आणि आपलं काम भलं . इतर बायका दुपारची कामं झाली की एकमेकींच्या घरी जाऊन गप्पा टप्पा मारायच्या , पण चंद्रकला मात्र कुणाकडेच जात नसे . शेजारीपाजारी संबंधही अगदी मोजकेच ! गरजेपुरते . चंद्रकला कुणाच्या अध्यात ना मध्यात ... दिवस दिवस ती कोणाच्या नजरेलाही पडायची नाही . एखादी अडगळीत पडलेली निर्जीव वस्तू जशी असते तसं तिच्या आयुष्य झालं होतं . तिच्या अशा समाजापासून अलिप्त राहण्यामुळे , तिच्या भोवती एकप्रकारचं गुढतेचं वलय निर्माण झालं होतं . आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं ते त्या बेंदुराच्या सणाच्या दिवशी !
त्या दिवशी गावात बेंदूराचा सण होता . गावकऱ्यांनी आपापले बैल झुल वगैरे टाकून , शिंगांना रंगकाम आणि गोंडे लावुन सजवले होते . सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण होतं . आता थोड्याच वेळात मिरवणूक निघणार होती . ढोल ताशे वाजायला लागले , सर्व ग्रामस्थ आपापले बैल घेऊन रांगेने उभे राहिले . कुणीतरी फटाक्यांची मोठी लड लावली आणि पहिल्या रांगेतले दोन बैल बिथरले . इतके की ते उधळले , मालकाच्या हातातलं दावं निसटलं आणि ते सैरावैरा धावत सुटले . सगळीकडे एकच गोंधळ उडाला . जो तो आपापला जीव मुठीत धरून पळू लागला . पण एक लहान मुलगा नेमका भर रस्त्यात उभा होता .उधळलेले बैल त्याच्या रोखाने येत होते . एकदम गंभीर परिस्थती निर्माण झाली. उधळलेले बैल आता कोणत्याही क्षणी त्या लहान मुलाला चिरडणार होते . लोक एकदम ओरडले . बायकांनी डोळे झाकून घेतले . त्या मुलाची आई तर चक्कर येऊन खालीच पडली .पण इतक्यात एक चमत्कार व्हावा तसं झालं . एक हात त्या मुलाच्या जवळ आला आणि त्या हाताने मुलाला मागे खेचलं . मुलगा थोडक्यात बचावला आणि बैंल उधळत पुढे निघून गेले . त्या मुलाला वाचवणारा हात चंद्रकलेचा होता . आता वर वर पाहता ही घटना साधी सरळ सोपी दिसते . वाचतानाही काही लक्षात येत नाही पण , हा प्रसंग प्रत्यक्ष बघणाऱ्या काही चाणाक्ष गावकऱ्यांच्या एक गोष्ट बरोब्बर ध्यानात आली होती ती ही की चंद्रकला आणि त्या मुलांमध्ये वीस ते पंचवीस फुटांचं अंतर होतं . आणि तिने जागचं न हालता मुलाला वाचवलं होतं . हे कसं शक्य आहे ? चंद्रकलेचा हात वीस फूट लांबला होता आणि तिने मुलाला वाचवलं होतं . त्यानंतर तिथं एक क्षणही न थांबता चंद्रकला निघून गेली आणि ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा , की हे झालंच कसं ?
त्यानंतर मात्र सगळ्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली . जो तो त्या दिवशी जे घडलं त्याबाबत दबक्या आवाजात बोलू लागला. चंद्रकलेबाबत अनेक वावड्या उठायला लागल्या. कोणी म्हणायचं चंद्रकला मध्यरात्री स्मशानात जाताना दिसली होती . कोणी म्हणे चंद्रकला आरशात दिसत नाही , तिच्या घरी आरसाच नाही . तिला चेहरा बघायचा झाला तर ती रांजणातल्या पाण्यात बघते . कोणी म्हणे तिनेच आपल्या नवऱ्याला मारून टाकलंय आणि त्याचं प्रेत वाड्याच्या मागच्या आडात टाकून दिलं .... कोणी म्हणे चंद्राच्या कलेनुसार तिचा चेहरा बदलत जातो , अमावास्येला ती दिसत नाही , वगैरे वगैरे .... ह्यातलं किती खरं आणि कितो खोटं हे त्याचं त्यालाच ठाऊक , पण तिच्याविषयी आणि तिच्या वागण्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हे मात्र नक्की ! लोक तिच्या वाड्याच्या आजूबाजूला फिरकेनासे झाले . लहान मुलांच्या आयासुद्धा आपलं पोरगं तिच्या वाड्याच्या जवळ जाणार नाही ह्याची काळजी घेऊ लागल्या होत्या. दिवसेंदिवस तिच्याबद्दलच्या चित्रविचित्र गोष्टींमध्ये वाढच होत चालली होती . अमावस्या , पौर्णिमेला रात्री लोक घराबाहेर पडेनासे झाले . गावात एक विचित्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली . ह्यावर तोडगा काढण्यासाठीच आज ग्रामपंचायतीची मिटिंग घेण्यात आली होती . ही भुताटकी गावात नकोच ! असंच प्रत्येकाचं मत पडलं होतं .
बरीच रात्र झाली तरी कामगिरीवर गेलेली मंडळी परत आली नव्हती .
" आरं , किती वेळ झाला रं ? " पाटलांनी न राहवून विचारलं .
" साडे अकरा झालेत पाटील . आपले गडी अजून कसं येईनात ? " ग्रामपंचायतीचे सदस्य गावडेंनी विचारलं .
" तेच मलाबी कळना ... काय इपरित तर झालं नसंल ? " पाटलांनी शंका काढली . त्यावर सगळेच घाबरले. लोकांमध्ये चुळबुळ सूरु झाली . " तसं काय व्हायचं नाही म्हना .... आपलं काम फत्ते होईल " पाटलांनी सावरून घेतलं .
" पाटील , एखाद्याला धाडता का वरच्या आळीला ? काय चालू हाय ते तरी कळल " कोणीतरी शक्कल काढली .
" ए गपे ... तिथं काम चालू आसंल , त्यात कशाला अडथळा ? जरा कळ काडा ... " परस्पर कोणीतरी त्याला झापुन टाकलं .
" नको , नको .... थोडं थांबू .... " पाटलांनाही हे पटलं . ते बोलत असतानाच , अंगावर घोंगडी घेतलेली चार माणसं ग्रामपंचायतींमध्ये शिरली . त्यांना बघून पाटील जागचे उठले . तशी सगळीच बाकीची मंडळी उठून उभी राहिली . सर्वांच्या नजरेत एकच प्रश्न होता त्यावर रघुजी म्हणाला, " पाटील , काम फत्ते ! " आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला . पाटलांनी खुर्चीत अंग टाकलं . बाकीच्या लोकांनी देवाचे आभार मानले . त्यानंतर सगळी पांगापांग झाली . पाटील एकटेच त्यांच्या खुर्चीत बसून विचार करीत राहिले . आपण केलं ते योग्य की अयोग्य ? तिला गावातून काढून टाका असं काही जण म्हणाले . पण कोणत्या कारणासाठी काढायचं ? आणि हे असं समजल्यावर ती काय करील सांगता येत नव्हतं . गावात चंद्रकलेसारखी एखादी जिवंत हडळ चारचौघात बिनदिक्कतपणे कशी काय राहू शकते ? तिला कोणतीही संधी न देता तिचा काटा काढणं गरजेचं होऊन बसलं . पण तसं बघायला गेलं तर , चंद्रकलेचा तसा गावाला कसलाच त्रास नव्हता . ती बिचारी एकटी शांतपणे राहत होती . आपण भलं आणि आपलं काम भलं . तरीही आपण तिला मारून टाकली . कदाचित ती एखादी साधी बाई असेल , निरुपद्रवी ... तिचा नवरा गायब झाला तेव्हा आपण तिला मदत केली होती , त्या बदल्यात आपण तिच्याकडे जे मागितलं त्यावर तिने एवढं चिडायला नको होतं . ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं , पण ही बया निघाली मोठी पतिव्रता ! ह्या पाटलाच्या मुस्काडीत मारली त्या भवानीनं ! बरं झालं , काट्यानं काटा निघाला . पाटील खुर्चीतून उठू लागले , पण का कुणास ठाऊक त्यांचे खांदे एकदम जड वाटू लागले . कसेबसे ते उठले ,आणि समोरच्या आरशात सहज त्यांचं लक्ष गेलं . त्यांच्या मानगुटीवर चंद्रकला बसली असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांच्या छातीत जोरात कळ येऊन ते धाडकन खाली कोसळले .
https://marathi.pratilipi.com/story/yko1u38sskes?utm_source=android&utm_campaign=content_share
समाप्त
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९
सिझन २- लोकल डायरी ६
सिझन २- लोकल डायरी ६
" मधू , जरा लवकर येशील का ? " सकाळी सकाळीच शरदचा फोन ! त्यावेळी मी झोपेत होतो . सकाळचे साडे सहा वाजले होते .
" का रे ? काय झालं ? " अर्धवट झोपेत मी त्याला विचारलं .
" तसं काही सिरीयस नाही , पण लवकर ये जरा , पंधरा मिनिटे आधी ... " पलीकडून शरद म्हणाला .
" ओके , ओके ... मी आवरतो लवकर . चल बाय ... " म्हणत मी फोन ठेवला आणि थेट बाथरूममध्ये शिरलो . पटापट सगळं आवरलं आणि स्टेशनला आलो , तर शरद माझ्याही आधी येऊन उभा राहिला होता .
" काय रे ? काय प्रॉब्लेम ? " मी त्याला घाईघाईत विचारलं .
" आपल्या भरतचा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय रे .... "
" काय झालं आता ? लग्नाशी रिलेटेड नाही ना ? " मी त्याला विचारलं त्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली . " च्यायला , आता काय झालं ? "
" आपल्या ना ग्रुपची ना साली शांती करून घेतली पाहिजे . प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच बेन स्टोक्स ! " शरद वैतागून म्हणाला .
" काय झालं सांग ना आता ... " शरद मुद्द्यावर पटकन येत नाही . दुसरंच काहीतरी बडबडत बसतो .
" अरे , दोन दिवसांपूर्वी भरतच्या मोबाईल वर एका अन्नोन नंबरवरून फोन आला , समोरचा म्हणाला की सुनीताचा नाद सोड म्हणून ... "
" सुनीता ? कोण सुनीता ? "
" अरे .... सुनीता म्हणजे आपली होणारी भाभी .... भरतची होणारी बायको ! "
" ओके ओके .... पण कोण होता तो हरामखोर ? "
" काय माहीत नाही रे .... असाच फोन केला आला होता साला ... भरतला काल विचारलं तर त्याने पण मोघम सांगितलं रे ... मला वाटतं तू एकदा विचारून बघ " शरद म्हणाला .
" ठीक आहे . आज आला की बोलतो . " हळूहळू एकेक मेम्बर येत होते . भरतही आला . त्याने सगळ्यांशी हाय हॅलो केलं , पण चेहऱ्यावर काहीसा तणाव असल्याचं स्पष्ट दिसत होतं . ' मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी .... ' गाडीची अनाऊन्समेंट होत होती . मागोमाग लोकलचा हॉर्न ऐकू आला . शरद - भरत पुढे निघून गेले . लोकलमध्ये आम्ही आमच्या जागेवर बसलो . जिग्नेस डाऊन करून आला नव्हता . बहुतेक तो येणार नसेल पण मी खिडकीतून बघितलं तर मागून येणाऱ्या कर्जतला लोकलमधून तो उतरताना दिसला . तो प्लॅटफॉर्म नंबर एक वरून दोन वर धावत येत असतानाच अचानक थांबला आणि हात जोडून पुतळ्यासारखा उभा राहिला . मला कळेना हा असं का वागतोय ते ? पण लगेच लक्षात आलं की ती फोनवाली भांडणारी मुलगी कानाला फोन लावून त्याच्या बाजूने जात असलेली दिसली . तिने जिग्नेसकडे पाहिलं . जिग्नेसने हात जोडून तिला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला . ती विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहात गेली . पण जाताना तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू असल्याचं मला दिसलं . ती गेल्यावर जिग्नेस घाईघाईत लोकलमध्ये चढला.
" जिग्नेस , आज भी लेट आया तू ? " मी मुद्दाम त्याला छेडलं .
"अरे यार मधू भाय , आजकाल सुभे आँख ही नहीं खुलती । लेट हो राहा हूँ रोज । " जिग्नेस आताही झोपेतून उठून आल्यासारखा वाटत होता ...
" तेरे लिये एक शेर अर्ज करता हूँ , इर्शाद बोला ना यार .... " शरद म्हणाला मग सर्व जण झोपेतून जागे झाल्यासारखे इर्शाद ... इर्शाद करायला लागले .
मुद्दतों के बाद हमे निंद आई है ।
मुद्दतों के बाद हमे निंद आई है ...
वरना इस इश्क ने तो खामखां जगाए रखा था । " शरदच्या ह्या शायरीवर सर्वांनी वाह वा करत त्याला दाद दिली .
" यार शरद भाय , तुम तो शायर निकले ! " जिग्नेस पण खुश झाला .
" अरे नहीं यार , जसं सुचलं तसं बोलून गेलो . " शरद ने मला खुणावलं . मी जिग्नेसला बसायला माझी जागा देऊन उभा राहिलो . भरत आता शरद आणि माझ्या मध्ये उभा होता . लोकलने कल्याण सोडलं आणि गुपचे बाकीचे लोक आपापल्या उद्योगाला लागले . आता भरतशी बोलण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले होते.
" काय भरत ; सध्या काय चालू आहे ? " मी सुरुवात केली .
" काही नाही ... नेहमीचंच " तो मोघम म्हणाला .
" लग्नाचं कुठपर्यंत आलंय ? कधी ठरवलंय ? " मी बिनधास्त विचारलं जणू काही मला काही माहीत नाही . त्यावर त्याने दोन सेकंद माझ्याकडे बघितलं , कदाचित त्याला खात्री करून घ्यायची असेल की मी मुद्दाम चिडवण्याच्या हेतूने तर त्याला विचारत नाही ना .... मी चेहरा अगदी सरळ ठेवला .
" चालू आहे तयारी ... " तो म्हणाला पण त्यात उत्साह दिसत नव्हता .
" भरत , त्याला माहित आहे . " शरद असं म्हणाला आणि अचानक भरतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . तो रागात त्याला काही बोलणार इतक्यात मी त्याला अडवलं , " भरत , आम्ही तुझी मस्करी करीत नाही . आम्हाला खरंच काय झालं ते जाणून घ्यायचंय . कदाचित आमची तुला मदत होईल . " त्यावर तो शांत झाला . पण काही बोलेना . कदाचित हा विचित्र असा पर्सनल प्रॉब्लेम आम्हाला कसा सांगावा ह्याचा तो विचार करीत असावा . पण थोड्या वेळाने तो बोलू लागला .
" साला एक फालतूगिरी झालीय रे . तुला कसं सांगू ते कळत नाही . " तो वैतागला होता . , " दोन - तीन दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलवर एक फोन आला . मला म्हणाला सुनीताचा , म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचा नाद सोड . मी त्याला बोललो , की तू कोण बोलतोय म्हणून ? तर बोलला तुझ्या होणाऱ्या बायकोचा बॉयफ्रेंड .! सालं असं डोकं फिरलं .... त्याला चार शिव्या घातल्या आणि परत फोन करू नको अशी धमकी दिली . "
" मग ? पुढे काय झालं ? " मी विचारलं .
" ते झालं रे , पण डोक्यात किडा शिरला ना .... विचार करून डोकं फिरायची पाळी आली . सालं जिग्नेसचं झालं तसं होतंय की काय , असा विचार करून टेन्शन वाढायला लागलंय. " भरत वैतागून म्हणाला .
" त्यानंतर परत कधी आला होता फोन ? "
" नाही ना ... एकदाच आला पण डोक्याची मंडई करून गेला . मी परत फोन करून बघितला , पण साला स्विच ऑफ यायला लागलाय . आज सकाळी परत ट्राय केला पण स्विच ऑफच येतोय . "
" मग तू सुनीता भाभीला विचारायचं ना डायरेक्ट . मी असतो ना तुझ्या जागी तर डायरेक्ट काय ते बोललो असतो " शरद म्हणाला .
" असं कसं डायरेक्ट विचारणार ? तुझी गोष्ट वेगळी आहे , तू मॅगी भाभीला ओळखत होतास आधीपासून. माझं अरेंज मॅरेज आहे यार . मला तर काहीच माहिती नाही तिच्याविषयी . आणि एका परक्या मुलीला असं कसं थेट विचारणार ? त्यात साला हा फोनवाला कोण उपटला मधेच ! "
" असं कसं बोलतोय रे हा ? " शरद माझ्याकडे बघत म्हणाला , " मला सांग , अरेंज मॅरेज असलं म्हणून काय झालं …? तुला जे काही आहे ते क्लीअर करायला पाहिजे की नाही ? "
" भरत , यार मला वाटतं शरद बरोबर बोलतोय . जिग्नेसची गोष्ट वेगळी होती . त्याला काहीच माहिती नव्हतं . पण आता तुला जर माहीत आहे की असं कोणीतरी आहे जो तुझ्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलतोय तर तू तिला थेट विचारायला हवंस . " मी म्हणालो , त्यावर तो विचारात पडला .
" तसं तुमचं बरोबर वाटतंय मला ... पण तरीही कसं विचारायचं ह्या विचाराने डोकं फिरून गेलंय यार ! "
" अरे , तुला सांगतो ना , तो चू कोणीतरी असाच असेल , त्याला फक्त काड्या घालायच्या असतील . नाहीतर फोन बंद ठेवला नसता त्याने ... डर पिक्चरचा शारुख , काय बोलतो मध्या ? " शरद म्हणाला .
" पॉईंट आहे ! हा असाच कोणीतरी असेल बहुतेक , म्हणून बोलतो की तू सुनीता भाभीला एकदा सरळ काय ते विचारून टाक " मी म्हणालो . भरत आणखीनच विचारात पडला .
" माझ्याकडे एक आयडिया आहे , त्या मुलाचा पत्ता काढून ठोकू साल्याला ... काय बोलतो ? " शरद उत्साहात म्हणाला . त्याला हे असले उद्योग करण्यात जाम रस असतो . तशा त्याच्या बऱ्याच ओळखीही आहेत . तो सहज ही कामे करू शकतो आणि त्यातून सही सलामत बाहेरही पडू शकतो . पण मला काही हा मार्ग योग्य वाटत नव्हता . जर सरळ मार्गाने कामे होत असतील तर वाकड्यात कशाला शिरा ?
" ते काही करायची गरज नाही रे ... आणि मी तर बोलतो फक्त सुनीता भाभीला थेट काय ते विचार . " मी म्हणालो .
" थेट विचारू ? पण कसं विचारणार ? " भरत गोंधळून गेला .
" कसं विचारणार म्हणजे ? लगेच फोन लाव आणि डायरेक्ट विचार " शरद म्हणाला.
" आत्ता ? "
" मग काय मुहूर्त काढतो का काय ? " शरद त्याच्यावर खेकसला . मीही त्याला दुजोरा दिला . मला शंभर टक्के गॅरंटी होती की असं काही नसणार ... कारण प्रेमदूताने भरतबाबत हेच भाकीत केलं होतं की , तो ज्या मुलीला बघायला गेला आहे तिच्याबरोबरच त्याचं लग्न होईल , त्यामुळे मी बिनधास्तपणे त्याला तिला फोन करायला सांगितला . भरतने बॉम्ब काढावा तसा खिशातून मोबाईल काढला आणि सुनीता भाभीचा नंबर डायल केला . पलीकडून रिंग वाजली . ती ऐकून भरतच्या चेहऱ्यावरचा तणाव एकशे ऐंशी पटींनी वाढला . पलीकडून फोन उचलला आणि भरत बोलू लागला .सुरुवातीला नेहमीचं कसं काय ? वगैरे बोलून झाल्यावर भरत मुख्य मुद्द्यावर आला . त्याने त्याला आलेल्या फोनबद्दल विचारलं . पलीकडून सुनीता भाभी बोलत होती , शरद आणि मी भरतच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखत होतो . थोड्या वेळाने त्याने फोन ठेवला आणि खिशातला रुमाल काढून कपाळावर जमा झालेला घाम पुसला .
" काय रे ? काय म्हणाली भाभी ? सगळं ओक्के ना ? " शरदने घाईघाईने विचारलं जणूकाही त्याचे कान त्यासाठीच आतुर झाले होते. त्यावर भरत काहीच म्हणाला नाही .मीही विचारून पाहिलं , तरी काही बोलेना . एकटक कुठेतरी शून्यात बघत बसला .
" ए बाबा , काय झालं ते तरी सांग ना ... असा काय बघतोय ? " शरद ला राहवलं नाही .
" ज्याची भीती होती तेच झालं . " भरत अतीव नैराश्याने म्हणाला .
" भरत , भाभी काय म्हणाली ? प्लिज सांग " मीही आता टेन्शनमध्ये आलो .
" ती म्हणाली , तुम्हाला त्याचा फोन कसा काय आला ? मी तुम्हाला सांगणारच होते ... हे असं फोनवर नाही सांगता येणार प्रत्यक्ष भेटून सांगते . "
आता आपापल्या खिशातून रुमाल काढून घाम पुसायची पाळी शरद आणि माझ्यावर आली .
-- क्रमशः
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)