पँगाँग लेक... ! लडाख मधलं असं ठिकाण कि ते जर नसतं तर तिथल्या प्रदेशाच्या सौंदर्यात कुठेतरी कमीपणा आला असता . सर्व साज शृंगार केलेली नववधू आणि कपाळावर टिकली नाही , अशी काहीतरी अवस्था झाली असती , पँगाँग लेक नसता तर ...!!! आज आम्हाला पँगाँग लेक ला जायचे होते. आधल्या दिवशी गॅरेजवर भेटलेल्या त्या मित्राने पँगाँग लेक वरून येताना त्या भयानक शैतान नाल्याबाबतीत सांगितलेल्या सुरस गोष्टीं आम्ही ऐकल्या होत्या. शैतान नाल्यासंदर्भात तो म्हणाला होता की, संध्याकाळ झाली की त्या नाल्यातलं पाणी वाढतं. कारण दिवसा उन्हामुळे जमा झालेलं बर्फ वितळते आणि मावळतीच्या वेळी ते लहान लहान ओहोळांमार्फत एकत्र येऊन शैतान नाल्याला येऊन मिळते. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह संध्याकाळी त्या नाल्यातून वाहातो. जर पँगाँग लेक ला जायचे असेल तर एका दिवसात जाऊन येणे अशक्य आहे. तुम्ही रात्री तिथे रहा आणि दुसऱया दिवशी सकाळी निघा असा सल्ला त्याने आम्हाला दिला. परंतु आमच्या ठरलेल्या वेळापत्रकानूसार पँगाँग लेकला रहाणे शक्य नव्हते. तो लेक जवळपास 150 किमी लांब होता म्हणजे एकूण अंतर 300 किमी होणार होते. एवढ्या लांबचा पल्ला बाईक वर एका दिवसात जाणे आता आम्हाला शक्य नव्हते त्यामुळे मग एका दिवसासाठी गाडी करुन जाणे याशिवाय चांगला पर्याय आम्हाला तरी दिसत नव्हता. हॉटेलच्या मालकाने एक गाडी सांगितली. गाडीने जाण्याचा आणखी एक फायदा असा होता की आमच्या रायडरर्सना आरामही मिळणार होता. हमने एक तिर से दो शिकार किये..... सकाळी 7 च्या सुमारास गाडी आली. लहान असताना शाळेच्या सहलीला जावे तसे आम्ही त्या गाडीत जाउन बसलो... आता आरामात जाता येणार होतं. पप्या तर मागच्या सिट वर आडवाच झाला. पँगाँग ला जाताना मधे चांग- ला ही खिंड लागते. घाट सुरू होण्याआधी आम्ही एका पंजाबी हॉटेल वर जाऊन मस्त परांठे हाणले... बऱयाच दिवसांनी त्या राईस, नुडल्स ला पकलेले आम्ही पराठ्यांवर तूटून पडलो. नाष्टा झाला, निघालो... चांग- ला चा घाट सूरू झाला.....
आम्ही गाडीतून बाहेर वर पाहिलं तर वरचा पर्वत गडद पांढऱया धुक्यात हरवुन गेलेला दिसत होता. घाटाने वर गेलो तसे गाडीच्या पुढच्या काचेवर थेंब पडत असलेले दिसले. आमच्या गाडीचा ड्रायवर म्हणाला "उपर बरप गिर रहा है। " बर्फ ....!!! खरीखुरी हिमवृष्टी ...! आईशप्पथ ...! आमच्या मनोरथाचे घोडे ' बर्फात ' नहाले .
थोडे आणखी वर गेलो, वर आकाशातुन कुणीतरी कापुस पिंजुन खाली टाकत आहे असं वाटत होतं. वर पोहोचलो, वातावरण तर असं होतं की आम्ही कुठल्या तरी अद्भुत आणि जादुई नगरीत आलोय. बर्फाचे पांढरेशुभ्र कण हवेबरोबर कसेही उडत येत होते. हिमवृष्टी अनुभवायचा माझा पहिलाच प्रसंग... सगळं वातावरण भारलेलं. ड्रायवर ने गाडी थांबवली. शाळा सुटल्यानंतर लहान मुले धावत पळत बाहेर येतात तसे आम्ही गाडीबाहेर पडलो. मजबुत थंडी होती बाहेर, कुडकुडत उभे राहीलो. चांग -ला लिहिलेल्या पाटीसमोर उभं राहून फोटो काढून घेतले ... पुरावा म्हणून...!
खोप्याच्या डोक्यात नविन कल्पना आली. एक काचेचा ग्लास घेतला बर्फाने पुर्ण भरला आणि त्यात कोकाकोला टाकुन पिऊ लागला. कोक ऑन द रॉक्स .... धमाल आली. तिथेही खोप्या आणि पियु लहान मुलांसारखं बर्फात जाऊन खेळत होते. ह्या आख्या लडाख टूर मधे कोणती जडीबुटी खाल्ली होती देव जाणे... आम्ही माञ लगेच गाडीत जाऊन बसलो. पुढे निघालो . वळणं तर अगदी पाचवीला पुजली होती. मधे रस्त्यात एका ठिकाणी काळ्या केसांचे याक दिसले. निसर्गाने खडबडीत रंगाचे दगडी कपडे काढून हिरवीगार शाल लपेटून घेतलेली दिसली . थोडा पुढे जातो न जातो तोच खोप्या जीव खाउन ओरडला ... " वूल्फ .... वूल्फ ..." . ड्रायवर ने करकचून ब्रेक दाबला ... मागे झोपलेला पप्या घाबरून तडफडत जागा झाला... बघतो तर तो कोल्हा नसून असाच एक गावठी केसाळ कुत्रा होता ... सगळे पक्के वैतागले खोप्यावर ...! त्यानंतर उगाचच आम्ही त्याची खेचू लागलो ... बरेचसे डोंगर पार केल्यानंतर एका वळणावर दुरवर पँगॉंग लेकचं बारीकसं प्रथम दर्शन आम्हाला घडलं. काळ्या राखाडी पर्वतांच्या पार्श्वभुमीवर पँगॉंग लेकचं आकाशी रंगांच्या विविध रंगछटा असलेलं प्रथम दर्शन डोळ्यांना आणि मनालाही अतिशय सुखावह असं वाटत होतं.
परंतु तिथं पोहोचलो आणि आमचा भ्रमनिरास झाला. समोर विस्तीर्ण पँगॉंग लेक पसरलेला. परंतु कलर मुघले आझम बघण्यासाठी जावं आणि समोर पुन्हा तोच जुना ब्लॅक अन् व्हाईट सिनेमा लागावा तसं काहीसं झालं. बरेच ढग जमा झाल्याने आकाशाची निळी नितळाई काही त्या उतरली नव्हती. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे मात्र उतरले... असे म्हणतात कि चांगल्या वातावरणात पँगॉंग लेकमध्ये निळ्या रंगांच्या आठ वेगवेगळ्या छटा दिसतात . परंतु आमच्या नशिबात बहुदा ते पाहणं नव्हतं . पँगॉंग लेकचं आडवं पसरलेलं एक टोक लांबवर कुठेतरी पर्वतरांगांमधे हरवुन गेलेलं ...
थोड्या वेळाने वरची ढगांची गर्दी काही काळासाठी हटली. आणि त्या निळ्या नितळाईचं हलकंसं दर्शन आम्हाला झालं ... ते आम्ही अधाशासारखे डोळ्यात साठवून घेऊ लागलो.
पँगॉंग लेक ने आमचा थोडा भ्रमनिरास केला . आम्ही निघालो ते भविष्यात पुन्हा इथे येउन ह्या पँगॉंग लेकची निळी नितळाई अनुभवण्याचा पक्का इरादा करूनच....!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा