https://milindmahangade.blogspot.com/2019/10/blog-post_24.html सिझन २ -लोकल डायरी १
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
https://milindmahangade.blogspot.com/2020/01/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ८
सिझन २ - लोकल डायरी ९
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_5.html सिझन २ - लोकल डायरी २
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ३
https://milindmahangade.blogspot.com/2019/11/blog-post_27.html सिझन २-लोकल डायरी ४
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ५
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_6.html सिझन २ - लोकल डायरी ६
https://milindmahangade.blogspot.com/2019/12/blog-post_27.html सिझन २ - लोकल डायरी ७
https://milindmahangade.blogspot.com/2020/01/blog-post.html सिझन २ - लोकल डायरी ८
सिझन २ - लोकल डायरी ९
शरदच्या पार्टीचा हँग ओवर दुसऱ्या दिवशीही गेला नाही . माझं डोकं चांगलंच चढलं होतं . आमच्या बाकीच्या मंडळींचीही अवस्था काही वेगळी नव्हती. जिग्नेसचा तर वकार युनुस झाला होता . दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने संपूर्ण दिवस झोपून काढला . यामुळे मग रात्री झोप आली नाही आणि मग त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी झोप यायला लागली . आळस देत देत मी प्लॅटफॉर्मवर आलो . प्लॅटफॉर्मवर शरद , भडकमकर आणि नायर अंकल आले होते. भरत अजून आला नव्हता . काल तो त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेला होता. काय झालं असावं असा विचार करीत असतानाच तो धावत आला . तेवढ्यात समोरून लोकल आली तसा तो आम्हाला हात दाखवून जागा पकडायला शरदबरोबर पुढे निघून गेला . सावंत आज आले नाहीत . आणि त्यांचा फोनही लागला नाही . लोकल प्लॅटफॉर्मवर आल्यावर सगळे आत शिरले तेव्हा जिग्नेससुद्धा डाऊन करून आलेला होता .
" जिग्नेस भाय , कैसा है तबियत ? " शरदने त्याला विचारलं . त्यावर त्याने ओक्के असं हात उंचावून खुणावलं .
" जमता नहीं तो पिता क्यूँ है बे ? " भरत म्हणाला . आज बऱ्याच दिवसांनी त्याचा हा सूर ऐकायला मिळाला .
" अरे , भरत भाय , अपने शरद भाय का पार्टी था । उस्को बुरा लगता ना .... " जिग्नेस गमतीत म्हणाला . त्याला दोन टिन सुद्धा जास्त होतात , तिथे तो साडे तीन टिन प्यायला होता . त्याला उलट्या झाल्या नसत्या तर नवल होतं.
" नहीं , लेकिन मेरेको सबसे अच्छा जिग्नेसही लगा । कोई भी पार्टी तब रंग लाती है जब कोई ऐसा दारू पी के उलटी करता है । " शरदच्या ह्या टोमण्यावर सर्वजण हसले .
" भडकमकर पण मस्त मजेत होते ... " मी म्हणालो . त्यावर त्यांनी पुन्हा ते " त्या दिवशी मस्त मजा आला " चं पालुपद आम्हाला ऐकवलं .
" अरे , सावंत कब चला गया ? और आज बी नय आया ? उसका दारू उतरा की नय ? " नायर अंकल विचारू लागले . आम्हाला कुणालाच त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं . भरतने फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागत होता. मी पलीकडे पाहिलं , अवंती तिच्या जागी उभी होती . ती माझ्याकडेच बघत होती. मी पाहिल्यावर छान पैकी हसली .
" आँखो ही आँखो में इशारा हो गया ... " शरदने गाणं सुरू केलं आणि बाकीचे सगळे त्याच्या मागोमाग " बैठे बैठे जिने का सहारा हो गया .... " गाऊ लागले . हे असं अचानक ऐकल्यावर आणि ते आपल्यालाच उद्देशून आहे असं कळल्यावर तर मला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं असं वाटू लागलं . इतकी झटपट प्रतिक्रिया केवळ आमचा ग्रुपच देऊ शकतो . मी पुन्हा अवंतीकडे पाहिलं , तीही ओठ मुडपून हसत होती . सगळे मला चिडवायला लागले . मला पण गंमत वाटत होती . मी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू दिलं . थोड्या वेळाने ते आपोआप शांत झाले आणि आपापल्या कामाला लागले.
भरत माझ्या बाजूलाच उभा होता . त्याच्या बाजूला शरद उभा होता . मी त्याला कालच्या त्याच्या होणाऱ्या बायकोच्या भेटीबद्दल विचारलं . त्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला .
" काय झालं ? सांग तरी ... " मी म्हणालो.
" अरे , काल राडाच झाला ना भाई ! मी सुनीताला भेटायला गेलो होतो , तर ती एकटी नव्हती आली , तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण आणि एक मुलगा सुद्धा आला होता. " भरत म्हणाला .
" मग ? " शरदने विचारलं.
" धम्माल आली काल . तुला सांगतो तिची मैत्रीण एकदम खतरनाक आहे ... कराटे चॅम्पियन , ब्लॅक बेल्ट ! "
" तिच्या मैत्रिणीचं काय मधेच ? " मला काही कळेना .
" तेच सांगतोय ना . मी तिथे गेलो . आधी तर माझं डोकचं फिरलं होतं . मी तिला थेट विचारणार होतो , पण ती एकटी आली नव्हती ते दोघेही तिच्या बरोबर होते . मला वैताग आला साला . वाटलं ही पोरगी चालू दिसतेय . पण नंतर जे घडलं ते बघायला तुम्ही लोक पाहिजे होतात ." एखादी सुरस कथा सांगावी तसं भरत म्हणाला .
" का ? असं काय झालं ? " माझी उत्कंठा शिगेला पोहोचली.
" मी तिला काही विचारायच्या आतच , तिच्या सोबतच्या मैत्रिणीने बरोबर आणलेल्या मुलाची कॉलर पकडून त्याच्या एक कानाखाली लावून दिली आणि म्हणाली , बोल , का केला होतास ह्यांना फोन ? "
" काय ? तोच मुलगा होता ज्याने तुला फोन केला होता ? " शरदने आश्चर्याने विचारलं . , " अरे , मग एक ठेऊन द्यायची ना "
" अरे आधी मला तेच वाटत होतं . पण नंतर त्याची दया आली मला . तिच्या बरोबरच्या मैत्रिणीने माझ्या समोर तुडवला त्याला . तो सॉरी ताई , सॉरी ताई , परत असं होणार नाही ताई , म्हणत हात जोडून विनवण्या करू लागला . ताई ताई चा जप चालला होता त्याचा ... " तो हसत हसत सांगत होता .
" काय ? आयला भारीच ! पण त्याला विचारायचं ना की त्याने असा फोन का केला होता तुला . " मी म्हणालो .
" एकतर्फी प्रेम रे ... असाच लल्लू पोरगा होता तो , छपरी ... त्यांच्या कॉलेज मध्ये होता . त्यांच्याच वर्गातला . सुनीता तर त्याला फक्त चेहऱ्याने ओळखायची . तिनेच मला सांगितलं की , ह्याच मुलाने कॉलेजला असताना रोज डे च्या दिवशी तिला प्रपोज केलं होतं , आणि ती नाही म्हणाली होती . त्यानंतर आमचं लग्न ठरल्यावर सुद्धा एकदा भेटला होता . त्या वेळी सुद्धा तिने त्याला स्पष्ट नकार दिला . पण नंतर मी जेव्हा तिला मला आलेल्या फोनबद्दल सांगितलं तेव्हा तिला ह्याचाच संशय आला . आणि तिने हा प्रत्यक्ष कृतिदिन केला . " भरत सांगत होता .
" अरे , पण ही काय पद्धत झाली ? तुझ्यासमोर त्या पोराला आणून मारण्याची ! " मला त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं .
" मलाही आधी तसंच वाटलं . मग तिनेच ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला , की हा प्रकार तिच्या लक्षात आल्यावर तिला त्या मुलाचा खूप राग आला होता आणि असा फोन आल्यानंतर मीच काय तर दुसरा कोणताही मुलगा तिच्या नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का ? कोणाचाही गैरसमज होणारच ना ... म्हणून मग तिने तिच्या कराटे चॅम्पियन मैत्रिणीच्या मदतीने त्याला माझ्या समोर आणला आणि माझ्या समोरच त्याला ठोकला . नंतर तो मुलगा माझ्याच पाया पडायला लागला , म्हणाला चूक झाली आता मी परत असं कधीच करणार नाही ... माफ करा वगैरे ... " भरत हातवारे करत सांगत होता .
" आयला , काय बोलावं तेच कळेना . " शरद माझ्याकडे बघत म्हणाला . मीही त्याला दुजोरा दिला . कारण असा विचार आणि कृती मुली करू शकतात हेच थोडं शॉकिंग होतं आमच्यासाठी .
" तुमचं सोडा , मी तिथेच होतो , मलाच सुचत नव्हतं काहीही . पण नंतर मग मलाच मध्ये पडून तिच्या मैत्रिणीला थांबवावं लागलं आणि त्या मुलाची सुटका करावी लागली . तो मुलगा गेल्यावर तिची मैत्रीण म्हणाली , सुनीता खूप चांगली मुलगी आहे , आणि तिचं तसं काही नाही . तुमचा गैरसमज दूर व्हावा म्हणून आम्हाला हे करावं लागलं . " भरत म्हणाला .
" भारीच आहे हे ! पण हे सगळं करायची आयडिया सुनीता वहिनींची होती का ? " मी विचारलं त्यावर भरतने होकारार्थी मान डोलावली. मी आणि शरद एकमेकांच्या तोंडाकडे बघत उभे राहिलो .
" भरत , तुला सांगतो एक नंबर मुलगी मिळाली आहे तुला . सुनीता भाभीला बरोब्बर कळलं की ह्या परिस्थितीत नक्की काय करायला पाहिजे ... तिने हे केलं नसतं तर तुझ्या मनात कुठेतरी शंका राहिलीच असती . कदाचित ह्या फालतू कारणामुळे तुमचं लग्न मोडलं असतं , आणि समजा लग्न झालंही असतं तरी तूझ्या मनात कायम एक शंका राहिलीच असती . हा सगळा विचार सुनीता भाभीने केला आणि तिने हे पाऊल उचललं ... हॅट्स ऑफ यार ! " शरद सॅल्युट करत म्हणाला . मलाही ते पटलं . शंकेचा किडा एकदा मनात शिरला की माणसाचं आयुष्य उध्वस्त व्हायला फार वेळ लागत नाही . आणि आजकालच्या परिस्थितीत मुलींनी पण थोडं कणखर व्हायला हवं , म्हणजे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना असंच ठोकता येईल असा एक विचार मनाला चाटून गेला . पण काहीही म्हणा , धमाल किस्सा घडला हा . त्याचा हा किस्सा ऐकताना कुर्ला कधी आलं कळालंच नाही . दोघेही , शरद आणि भरत समोरच्यांना धक्का बुक्की करत , आरडाओरडा करत दोघे उतरले .
" ये दोनो क्या सोये थे क्या ? " नायर अंकल झोपेतून जागे होत म्हणाले . शरद भरतच्या आरडाओरड्यामुळे त्यांची झोपमोड झाली होती .
" जाने दो नायरजी , बहुत दिन के बाद ऐसा शोरगुल हुआ है ... और थोडा अच्छा भी लग राहा है । " बाहेर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जाणाऱ्या शरद - भरत जोडीला बघून भडकमकर म्हणाले . आमची लोकल हॉर्न देऊन पुढे निघाली . मी भायखळ्याला उतरलो आणि तिथेच अवंतीची वाट बघत उभा राहीलो . आता मला कुणापासून काहीच लपवायचं नव्हतं . अवंती आली तिचं सुंदर स्मित बघून मला एकदम हवेत तरंगल्यासारखं वाटू लागलं . मग आम्ही दोघे मिळून आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो .
" क्या दीदी , बहुत दिनसे आप लोग आये नहीं .... " वेटर विचारत होता .
" दो तीन दिन पेहले ही तो आये थे ... आप नहीं थे शायद . आपका पैर कैसा है …? " अवंतीने आस्थेने चौकशी केली आणि तो वेटर आनंदून गेला .
" भारीच आहेस तू ... " मी तिला म्हणालो .
" त्यात काय ... लोकांची साधी विचारपूस केली तरी त्यांना बरं वाटतं . आपला काय तोटा आहे त्यात ? " मी समजुतीने मान हलवली . " आणि आज काय चालू होतं रे तुमचं ? तुमच्या ग्रुपचे लोक गाणं का गात होते ? तुला चिडवत होते की काय ? "
" हो , कालच्या आमच्या पार्टीत मी आमच्या ग्रुपला सगळं सांगून टाकलं ." मी म्हणालो .
" सगळं म्हणजे ? काय सांगितलंस तू ? " ती प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे बघू लागली .
" सगळं म्हणजे सगळंच ! तू मला आवडतेस , आपलं एकमेकांवर प्रेम आहे , आणि आपण लग्न करणार आहोत वगैरे वगैरे " मी म्हणालो त्यावर ती थोडी गंभीर झाली . " काय गं ? काय झालं ? "
" अरे काल आणखी एक स्थळ आलं होतं माझ्यासाठी . मला न सांगताच ह्यांनी कार्यक्रम ठेवला होता . असा वैताग आला म्हणून सांगू . " ती चिडून म्हणाली .
" मग ? "
" मग काय ? बघितलं स्थळ . चांगला होता मुलगा . गव्हर्नमेंट जॉब होता त्याला ."
" अरे वा ! मस्तच की मग . " मी तिला चिडवायच्या हेतूने म्हणालो .
" काय यार मधू ! थोडासा सिरीयस हो ना जरा ... " ती वैतागली .
" अरे , मी सिरीयसच आहे . " तिचा चेहरा बघून मला गंमत वाटली . त्यावर ती काही बोलली नाही . चहा पित एकटक कुठेतरी शून्यात बघत राहिली . ती अशी वागायला लागली की मला भीतीच वाटते . तिच्या सुपीक डोक्यात काहीतरी शिजत असावं असा मला संशय आला . आणि ते खरंच होतं .
" ठरलं तर मग ! " थोड्या वेळातच ती निर्धाराने म्हणाली .
" ठरलं ? काय ठरलं ? " माझ्या पोटात भीतीने मोठा गोळा आला .
" फायनलच आता ... एकदम फायनल " तिचा निर्धार आणखी पक्का झाला.
" अगं बाई , काय फायनल ? काय ठरलं ? "
" तू पुढच्या आठवड्यात आमच्या घरी येतोयस .मला बघायला " तिचं हे बोलणं ऐकलं आणि तो संबंध कॅफे माझ्याभोवती गरगर फिरतोय की काय असं मला वाटायला लागलं .
--- क्रमशः