सप्प्... धनुष्यातुन बाण सुटला आणि 50 फुटांवर ठेवलेल्या लहानश्या बॉक्स मधे घुसला. त्याबरोबर आम्ही एकच जल्लोश केला. आमच्या हॉटेलचे मालक गलवान अंकल धनुर्विद्येत भलतेच पारंगत होते... त्यांनी आम्हालाही त्यांचा धनुष्यबाण दिला ... तो चालवणं किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय तो हातात घेतल्यावर आला . धनुष्याची प्रत्यंचा कितीही जोर लावला तरी खेचली जात नव्हती. कधी बाण तिरका जात असे तर कधी समोरच पडत असे. पुढे ठेवलेल्या टार्गेटच्या जवळपासही कुणाचा बाण जाईना. गलवान अंकलनी पुन्हा आमच्याकडुन तो धनुष्य घेतला आणि बरोब्बर नेम साधला. Bulls eye....!!! गल्वान अंकलनी त्यांच्या गेस्टहाऊसच्या आवारात छोटीशी बाग केली होती व उरलेल्या जागेत शेती केली होती... गेस्टहाऊस मात्र आटोपशीर पण छान होतं... आम्ही लेह मधल्या आमच्या वास्तव्यात त्या गेस्टहाऊस वर अगदी मजेत राहीलो. परंतु आता तिथून निघण्याची वेळ आली होती …
आज सकाळीच आम्ही लेह सोडुन आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार होतो. पण आम्ही ते गेस्टहाऊस जणु सोडुन जाऊ नये अशी परिस्थीती निर्माण झाली. आज सकाळपासुनच लेह मधे जोरदार पाऊस सुरु झाला. आणि तो थांबायचं नावच घेईना.... सकाळी 8 वाजता आम्ही निघणार होतो. पण आता 10 वाजले तरी आम्ही काही बाहेर पडु शकलो नव्हतो. गल्वान अंकल म्हणत होते, "आज मत जाओ, ये बारीश नही रुकेगा… " पण आम्हाला पुढे जम्मु मधे लवकरात लवकर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं, कारण आमच्या परतीच्या प्रवासाची ट्रेनची तिकीटे अजुनही confirm झालेली नव्हती. त्यामुळे त्यासाठीची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला एक दिवस आधी जम्मूत जाणे क्रमप्राप्त होते. पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही आपापल्या आवडत्या देवाचं नाव घेऊन गाड्यांवर टांगा टाकल्या.… भुरुभुरु पाऊस पडतच होता. बाहेर तर पडलो , पण बाहेर पडुन आम्ही चुक तर केली नाही ना असं वाटु लागलं.… पण जसजसे आम्ही लेह शहर सोडुन पुढे जाऊ लागलो तसतसे पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले. हा खरंच शुभशकुन होता.… थोडं पुढे गेलो आणि ग्रहण सुटावं तसा सुर्य ढगाआडुन समोर आला… . सहस्ञ किरणांचे उबदार बाण अंगावर घेत आम्ही निघालो.… लेह शहर जवळपास सर्वच बाजुंनी डोंगरांनी आणि पर्वतांनी वेढलेले आहे. चहा प्यायच्या कप बशितली बशीच जणू …! लेह शहराबाहेर पडल्यावर मॅग्नेटीक हिल हा एक भुगर्भशास्ञीय चमत्कार आम्हाला बघायला मिळाला.… तिथे कसलेही बाह्य बल न लावता चढणावर २०-३० फुट गाडी आपोआप वर चढते. अगदी बंद गाडी सुद्धा …! खोप्याने ही गोष्ट पुर्वी आम्हाला सांगितली होती. पण आम्ही त्याला त्या वेळी काही सिरियसली घेतलं नव्हतं… पण आता माञ निसर्गाचा हा अद्भुत जादुचा प्रकार पाहुन आम्ही अगदी थक्क झालो. अशी किती रहस्ये हिमालयाच्या उदरात दडलेली आहेत हे तो कैलासाधिपतीच जाणे...!
रस्त्याने जाताना उन पावसाची पकडापकडी चालुच होती. लांबवर कुठेतरी काळ्या ढगांनी गच्च भरलेलं आभाळ दिसु लागलं. पावसाची रिपरिप चालु झाली. हा काही आपली पाठ सोडणार नाही हे ओळखुन आमच्या रायडर्सनी गाडी तशीच पुढे दामटायला सुरुवात केली.… पुढे ' फुटु-ला ' नावाचा पास लागला. सगळ्या रस्त्यावर रिपरिप पडणाऱया पावसामुळे चिखलाचा राडा झाला होता आणि वातावरणात एक प्रकारचा विचिञ गारठा आला होता. ' फुटु-ला ' पास जसजसा वर चढत होतो तसा गारठा आणखीनच वाढु लागला. मी तरी मागे बसलो होतो. पण संदिप, खोप्या आणि पप्या हे गाडी चालवत होते , समोरुन येणारा थंडगार वारा थेट त्यांच्या अंगावर येत होता. हातात हँडग्लोज होते तरी बोटे थंडीने आखडली होती. मधे थोडा वेळ ब्रेक घेतला . अंगात थंडी इतकी भरली की नीट उभंही राहता येत नव्हतं. सु सु च्या ब्रेक नंतर संदिप म्हणाला, "आता जरा बरं वाटतंय " कसं काय ? म्हणुन विचारलं तर म्हणाला, " मॅन व्हर्सेस वाईल्ड वाल्या बेअर ग्रिलस ची टेकनिक वापरली. थंडीने आखडलेल्या बोटांवर सुसु केली. फरक पडला जरा.… " मलाही तसं करावसं वाटलं पण आमची टाकी नुकतीच रिकामी करुन आल्याने माझा भलताच हिरमोड झाला… तसंच कुडकुडत पुन्हा आपापल्या बाईक्सवर बसलो अन् निघालो थोडं पुढे जातो न जातो तोच गाड्यांची रांग लागलेली दिसली. इतका वेळ जरा चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं पण समोरचा बंद रस्ता बघुन वाटलं की आपण योग्य रस्त्यावर आहोत.… ह्या सबंध लडाखायणात असा एकही पास (घाट) नव्हता की जिथे आम्हाला रस्ता चांगल्या स्थितित मिळाला. रस्ता दुरुस्तीच्या कारणामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबावं लागत होतं आणि 'फुटु-ला' पास ह्या गोष्टीला अपवाद कसा असेल…? अर्ध्या तासाने रस्ता मोकळा झाला. आता आम्हाला कारगिल च्या दिशेने जायचे होते. मातीचा, खडीचा रस्ता, बाजुला नुकतीच वयात आल्यासारखी, अल्लड, खळाळत वाहणारी सुरु नदी आमची साथ देत होती. जवळपास, सर्वच रस्ते नदीच्या मार्गाने जात होते. सुमारे ६ वाजता आम्ही कारगिल ला पोहोचलो. युद्धभुमी ...! तिथे पोहोचल्यावर , तिथल्या सैनिकांच्या चौक्या पाहिल्यावर एक वेगळीच अनुभूती आली …वीररसाने भारलेलं वातावरण …! लाईन ऑफ कंट्रोलला अगदी खेटूनच होतो…सरहद्द …! तिथे हॉटेल डी- झोजीला म्हणुन एक भलं मोठं हॉटेल होतं. एखाद्या जुन्या काळातल्या गढीवजा आकाराचं आवाढव्य बांधकाम होतं त्या हॉटेलचं....! आजची रात्र इथेच काढायची ठरवली … गाड्यांवरचं सामान काढुन आपापल्या रुमवर नेणे हे सगळ्यात अवघड काम वाटे. कारण सबंध दिवस कष्टप्रद प्रवास केल्यानंतर जेव्हा समोर विसाव्याचं ठिकाण दिसत असेल तर पावलं आपोआप जड होतात. रुममधे कसेबसे गेलो. अत्यानंदाची गोष्ट म्हणजे रुम मधे टिव्ही होता . तब्बल १०-११ दिवसांनंतर आम्ही आज टिव्ही पाहणार होतो. सितामाईला अशोकवनात प्रभुरामचंद्रांची अंगठी पाहील्यावर झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आनंद आम्हाला तो टिव्ही बघीतल्यावर झाला…. कोणता चॅनल बघु अन् कोणता नको असं झालं. हॉटेलवर STD होता. तो बघितल्यावर मला कॉलेज ची आठवण आली … घरच्यांना खुशालीचे फोन झाले.… खुशाली म्हणण्यापेक्षा ' अजून जिवंत आहोत ' हे कळवण्यासाठी फोन झाले …. राञीच्या जेवणात ताटानुसार पैसे होते, आणि ते खुपच जास्त असल्याचे सर्वांना जाणवलं. त्यामुळे जेवण हे "अलाकार्टे " पद्धतीने मागवुया म्हणजे विनाकारण जास्त पैसे जाणार नाहीत असे पियु म्हणाली. ही नविनच भानगड मी ऐकत होतो. अलाकार्टे म्हणजे सर्व पदार्थ न घेता निवडक पदार्थ जेवणासाठी घ्यायचे व फक्त त्या पदार्थाचे होतील तेवढेच पैसे द्यायचे. हि कल्पना सगळ्यांना आवडली . त्यानंतर सर्वानुमते अलाकार्टे च्या नावानं चांगभलं केलं...' अरे अलाकार्टे आहे , नो प्रोब्लेम ..., अलाकार्टे आहे , हे मागवा , ते मागवा ...' करत बरेच वेगवेगळे पदार्थ घेतले . आणि जेव्हा बिल मागवलं तेव्हा मात्र काय झालं असेल हे सूज्ञ वाचकांस सांगणे नलगे …!! भलं मोठं बिल आमच्याकडे मिश्किलपणे पाहत आहे असं मला जाणवलं …

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा