http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html लोकल डायरी --४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html लोकल डायरी --५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html लोकल डायरी --१९ http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html लोकल डायरी -- २०
' सावंतांच्या घरी कोण गेलं असेल ? ' हा एकच प्रश्न मला सारखा सतावत होता . त्यांची ही गोष्ट फक्त मला माहित होती . त्यांच्या ह्या प्रकरणाचा कुणालाही गंध नव्हता . हां ... एकदा भरतने आम्हाला बोलताना बघितलं होतं पण त्यालाही मी निटसं काही माहित होऊ दिलं नव्हतं . मग त्यांच्या मिसेसला समजवायला गेलं कोण ? आणि अशा परक्या माणसाचं बोलणं त्यांच्या मिसेसना पटलं कसं ? असं काय म्हणाला असेल तो ? जे सावंतांना जमलं नाही ते कोण कुठल्या त्या अनोळखी माणसाने केलं होतं . हे सगळंच आकलनाबाहेरचं होतं .
" मध्या ... ए मध्या .... थांब ..." मागून कुणीतरी हाक मारत होतं . मी वळून पाहिलं , मागून शरद धावत येत होता .
" अरे , किती हाका मारत होतो तुला ...लक्ष कुठं होतं तुझं ? " तो धापा टाकत म्हणाला .
" सॉरी यार , मी दुसऱ्याच विचारात होतो . बोल , काय म्हणतोस ? "
" काही नाही .... असंच .... तू स्टेशनकडे जाताना दिसलास म्हणून हाक मारली ...." शरद ' काही नाही ' असं जेव्हा म्हणतो तेव्हा काहीतरी नक्कीच असतं .... इतकी वर्ष मी त्याला उगाचच ओळखत नाही ...! पण तो लगेच सांगणार नाही हेही मला माहित आहे . त्यामुळे मी त्याला जास्त काही विचारलं नाही . आम्ही स्टेशनचा ब्रिज चढत असतानाच पुन्हा मागून हाक आली . मागून भरत येत होता . मला आता संकटाची जाणीव होऊ लागली . हे दोघे एकत्र आले की काही ना काही भानगड नक्की करतात . आज दोघेही काहीतरी ठरवून आलेले दिसत होते . आणि त्यांनी मला पकडल्यामुळे मी थोडा सतर्क झालो होतो . ह्यांचं काही सांगता येत नाही . कधी कुणाचा बकरा करतील नेम नाही ....
" अरे वा .... आज दोघेही एकत्र ....? " मी भरतकडे पहात म्हणालो .
" एकत्र कुठे ...? तो आधी आलाय " भरत शरदकड़े बघत म्हणाला .
" चला उशीर होतोय ..." मी पुढे जात म्हणालो . ते दोघे माझ्या मागून यायला लागले . माझ्या मागे ते काहीतरी कुजबुजत असल्याचं मला जाणवलं . मी मागे बघितलं तर एकदम गप्प झाले . नक्कीच काहीतरी शिजतंय ... मी आणखी सावध !
मी तसाच पुढे निघालो . थोडं पुढे गेल्यावर शरद मागून आला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला .
" अरे काय यार मध्या , एवढा काय पळतोयस ? गाडीला अजुन बराच टाईम आहे . " तो म्हणाला . मी त्याच्याकडे पाहिलं . डोळ्यात काही मिश्किल भाव आहेत का हे मला पहायचं होतं .पण तसं काही जाणवलं नाही . माझ्या दुसऱ्या बाजूने भरत माझ्याजवळ आला . ' आयला , हे डाकू लोक करणार तरी काय आहेत ? ' मी विचार करु लागलो . पण मला जास्त विचार करायची गरज पडली नाही . शरदने लगेच मला विचारलंच . , " अरे मध्या , तुला ज़रा विचारायचं होतं . "
" बोल ना ..." आता काय विचारेल देव जाणे ...
" काल तू म्हणालास की आम्ही तुला काही सांगत नाही , तसं काही नाही यार .... तुझा काहीतरी गैरसमज झालाय ...तू तसं काही मनात ठेऊ नकोस ... " शरद कसनुसं तोंड करुन म्हणाला .अच्छा ... ! म्हणजे हे लोक कालच्या गोष्टीबद्दल बोलतायत तर .... ओके , मग ठीक आहे .... मला तर आधी वाटलं की अँटी व्हायरस बद्दल विचारतात की काय ?
" तुला माहित आहे का , आम्ही कुणाबद्दल बोलत होतो ..." भरत विचारु लागला . मी हो म्हटल्यावर तर ते दोघे एकदम काळजीत पडल्यासारखे वाटले . काल मी सहज खडा मारून पाहिला आणि तो बरोबर लागला होता . शरद - भरत जिग्नेस बद्दलच बोलत होते .
" होय , तुम्ही जिग्नेसबद्दल बोलत होतात ना .... मला माहित आहे ...." मी पुन्हा ठोकून दिलं .
" अरे यार , तेच तुला आम्ही सांगायला आलोय की , आम्ही जे पाहिलं ते खरं असेलच असं नाही ... म्हणजे आमचा पण गैरसमज झाला असेल ... " शरद गोंधळल्यासारखा वाटू लागला .
" तुम्ही जे पाहिलं म्हणजे ? असं काय पाहिलंत तुम्ही ? " मी गडबडित विचारुन गेलो . आणि लगेच चूक माझ्या लक्षात आली .
" बघ , तुला बोललो होतो ना ...? ह्याला काही माहित नाही म्हणून ... तू उगाच मला पण टेंशन दिलंस ... चु ... " शरद भरतवर घसरला .
" अरे पण काल हा इतक्या कॉन्फिडंटली बोलत होता ... मला वाटलं ह्याला माहित झालं सगळं ..." भरत त्याची बाजू सावरत म्हणाला .
" सोड आता , चल ... " असं म्हणत दोघे पुढे जाऊ लागले . म्हणजे जिग्नेसची ह्यांना माहीत असलेली एखादी गुप्त बातमी मला माहीत आहे की नाही हे तपासण्यासाठी हे डाकू आले होते तर .... ! पण ऐनवेळी माझ्या मुर्खपणामुळे मी फसलो . भेळ खाऊन झाल्यावर त्याचा कागद जसा फेकून देतात तसे ते मला टाकून पुढे निघुन गेले .
" शरद , थांब शरद ..... जिग्नेसचं काय झालं .... तुम्ही काय पाहिलंत ...? " मी त्याला थांबवत विचारलं . तर तो काहीच सांगेना ... तसाच पुढे जायला लागला . " शरद , यार सांग ना काय झालं ते ... काय भाव खातोय एवढा ....? "
" तुला माहीत नाही तेच बरं आहे , आणि असंही आम्हाला अजुन नक्की काय ते कळालं नाही ... त्यामुळे तुला काही सांगू शकत नाही . सॉरी .... " शरद म्हणाला .
" काही सिरिअस प्रॉब्लेम आहे का ? मी नाही सांगणार कुणाला ... प्लीज सांग ना ...." मी चेहऱ्यावर अजिजी आणत म्हणालो . पण त्याचा काही उपयोग झाला नाही . ते मला काही सांगणार नव्हते .
" ठीक आहे , मी जिग्नेसलाच विचारतो काय मॅटर आहे ते ....!" मी असं निर्वाणीचं म्हणाल्यावर ते दोघे होते तिथेच थांबले . परत येऊन शरद माझ्याकडे रोखून बघत म्हणाला , " मध्या , ही मस्करी नाही . एखाद्याच्या आयुष्याच्या प्रश्न आहे . तू उगाच बावळटासारखं काहीतरी विचारुन वाट लावशील . त्यामुळे शांत रहा . वेळ आली की आम्ही तुला सांगू सगळं ... पण आता त्याला काही विचारायला जाऊ नकोस ... काही प्रॉब्लेम झाला तर त्याला तूच जबाबदार रहाशील … समजलं … ? "
" सॉरी , पण खरंच काही मोठा प्रॉब्लेम आहे का ? " शरदच्या गंभीर चेहऱ्याकड़े बघत मी विचारलं
" हो बहुतेक .... ! " भरत म्हणाला .
" तसं काही नसेलही .... आम्ही उगाच असा विचार करीत असू ... जाऊ दे ... मध्या आम्ही तुला योग्य वेळ आल्यावर नक्की सांगू ... पण आता त्याला काही विचारु नको , प्लीज ...." शरद म्हणाला .
" ठीक आहे ... मी नाही काही विचारणार ... चला ...." आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा गाडी आधीच आली होती . आमच्या दोन - तीन जागा त्याच्यामुळे गेल्या . आत आल्या आल्या जिग्नेस आमच्यावर खेकसला , " अरे किदर थे तुम लोग ... गयी ना जगा अब ..."
" जाने दे जिग्नेस ... एक दिन जगा नहीं मिली तो क्या फर्क पड़ता है …? थाना के बाद बैठते है .... तू बैठ आरामसे ..." शरदला जिग्नेसशी इतकं चांगलं बोलताना मी पहिल्यांदा पहात होतो . हे म्हणजे वाघ बकरीकड़े दयाभावनेने पहात असल्यासारखं झालं ... इतर वेळी तो जिग्नेसला अगदी नको नको करुन सोडतो . नक्कीच मोठा प्रॉब्लेम असावा ....
सावंत आज आले नव्हते . त्यांनी आज सुट्टी घेतली होती . काल तसे ते मला म्हणालेही होते . पडत्या फळाची आज्ञा समजून ते आज शकुंतलाबाईंना त्यांच्या घरी घेऊन जाणार होते . तसं मीच त्यांना सांगितलं होतं . कुणी सांगावं , त्यांच्या मिसेसचा निर्णय पुन्हा बदलला तर ! सावंत खरेच नशीबवान ! आपल्या बायकोबरोबर आणि प्रेयसीबरोबर ते एकाच घरात राहणार होते ... भारिच ...!
अँटी व्हायरस समोर उभी होती . मी तिच्याकडे पाहिलं . तिनेही ओळखीचं हसून प्रतिसाद दिला . बऱ्याच वेळा ती जीन्स आणि टॉप घालायची पण आज तिने मरून कलरचा चूड़ीदार घातला होता . मॅचिंग बांगड्या , कानात मॅचिंग इअर रिंग्स , मॅचिंग टिकली . तिच्या मुळच्या गोऱ्या वर्णावर हे अगदीच खुलुन दिसत होतं . सगळं अगदी परफेक्ट ... आणि तितकंच सुंदर ... उभ्या उभ्याच मला तरंगल्यासारखं वाटायला लागलं . मी सगळं काही विसरुन तिच्याकडे बघत राहिलो . तिच्याही ते लक्षात आलं असेल .... तिही ओठातल्या ओठात हसत होती . त्यावरचा तो तीळ तर जीवघेणाच होता .... कधी एकदा भायखळा येतय असं मला झालं .
" हाय ... आज काय स्पेशल ...? " उतरल्या उतरल्या मी तिला गाठलं .
" नाही .... काही खास नाही ... असंच .... " तिच्या कानातले मॅचिंग इयर रिंग्स लयीत हलले ....
" नाही म्हणजे , आज वेगळी ड्रेसिंग आहे म्हणून विचारलं ... ऑफिसमधे काही फंक्शन आहे का ? "
" नाही ... असंच थोडा चेंज म्हणून घातला हा ड्रेस ..."
" तुम्हाला एक कॉम्प्लीमेंट देऊ का ....? "
" ह्म्म ....? " मी काय बोलणार हे तिने आधीच ओळखलं असावं .
" तुम्ही आज फारच सुंदर दिसताय ... "
" हो .... मला माहीत आहे ते ..." असं म्हणून ती समजुतीने हसली ., " आणि , तुम्हाला वेळ असेलच , तेव्हा ... " असं म्हणून तिने आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटकडे खुण केली . खरं तर आज मला बिलकुल वेळ नव्हता . ऑफिसमधे लवकर जायचं होतं . आज उशीर झाला तर महिन्यातला आजचा माझा तिसरा लेट मार्क लागणार होता . पण आता त्याची पर्वा कुणाला आहे ....! गेली सुट्टी तर गेली उडत ...!
" चला , मला तर नेहमीच वेळ असतो ...." ऑफिसचा विषय तात्पुरता बाजूला ठेऊन मी उत्साहात तिला म्हणालो अन आम्ही दोघे निघालो . रेस्टॉरंटमधे गेल्यावर पुन्हा काऊंटरवरच्या मालकाचं औपचारिक हास्य आणि ऑर्डर घेणाऱ्या पोऱ्याने न सांगता बन मस्का आणि चहा आणून देणं हे झालंच !
" ह्याला न सांगता सुद्धा हा आपली ऑर्डर कशी काय आणतो ...? " वेटर चहा आणि बन मस्का टेबलावर ठेऊन गेल्यावर तिने आश्चर्याने विचारलं .
" ती तुमचीच जादू आहे ... "
" माझी जादू ... ? कायतरिच काय ...? "
" हो ... खरंच .... तुम्हाला असं वाटतं का , की तो माझ्याकडे बघुन ही असली ट्रीटमेंट देत असेल ...? " त्यावर ती खुलुन हसली . दुरवरच्या मंदिरात घंटानाद झाल्यासारखं मला वाटलं .
" मे बी, आपण बऱ्याच वेळा इथे येऊन हीच ऑर्डर देतो म्हणून असेल कदाचित ..."
" तसंही असेल कदाचित ... पण त्याला तसा लक्षात राहण्याजोगा माणूस लागतो ... तुम्ही तशाच आहात ..." मी एक डायलॉग बोलून गेलो .
" फिल्मी आहात तुम्ही अगदी ... चहा घ्या ... ठंड होतोय .... "
" एक सांगू का …. तुम्ही मला अहो-जाहो नका करु .... कसंतरीच वाटतं ... "
" बरं .... नाही करत ... पण तुम्हीसुद्धा मग हा नियम पाळला पाहिजे ..."
" बघा परत तुम्ही ...! " मी तिला शब्दात पकडलं . पुन्हा दुरवरच्या मंदिरात घंटानाद झाला .
" सॉरी , तू ....तू पण हा नियम पाळायला पाहिजे ..."
" मला काही प्रॉब्लम नाही ...." मी असं म्हणत असताना माझी नजर तिच्या उजव्या हाताच्या बोटांवर पडली . तिच्या अनामिकेत अंगठी नव्हती . मला लगेच परवाचा प्रसंग आठवला . आम्हा दोघांना एकत्र बघुन तिचा होणारा नवरा तिच्यावर रागावून निघुन गेला होता . त्याच्याशी तिचं भांडण वगैरे झालं नाही ना ...? मी तिच्या बोटांकडे बघत असा विचार करत होतो हे तिच्या लक्षात आलं होतं बहुतेक ! ती लगेच म्हणाली , " अंगठी शोधतोयस का ? काढून ठेवली .... ती जास्त सैल होते म्हणून काढून ठेवली ... उगाच कुठे पडायला नको म्हणून...."
" ओह ...! मला वाटलं ...."
" तुला वाटलं की, माझं लग्न मोडलं .... ! " ती फटकन बोलून गेली .
" नाही ग ... तसं नाही ... माझं सहज लक्ष गेलं .... म्हणून ....." मला काय बोलायचं ते सुचेना . त्यावर ती औपचारिक हसली . हिचा स्वाभाव जरा वेगळाच आहे . मनात येतं तसं लगेच बोलून मोकळी होते , पुढचा मागचा विचार न करता .... तसा मला आधीही त्याचा अनुभव होताच . आमच्या पहिल्या भेटीत ती अशीच माझ्यावर खेकसली होती . मनाला येईल तसं बोलून मोकळी झाली होती . पण मला आवडतात अशी माणसं . ! मनात काही ठेवत नाहीत . जे मनात , तेच ओठांवर ... माझं लक्ष पुन्हा तिच्या ओठांवरच्या तिळावर गेलं . माणसांच्या नजरेतून येणाऱ्या व्हायरससाठी इफेक्टिव अँटी व्हायरस ...! काय नाव सापडलंय ....! अँटी व्हायरस .... वा ...!
क्रमशः ...
क्रमशः ...
माझे " बांद्रा west " हे ईबुक आता अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे . त्याची लिंक खाली दिली आहे . वाचून आपला अभिप्राय जरूर द्यावा .
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7
https://www.amazon.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-west-Marathi-Milind-Mahangade-ebook/dp/B07XH2QVHG/ref=sr_1_7?keywords=bandra&qid=1567958743&s=digital-text&sr=1-7